नवीन लेखन...

बाह्य अडथळे

एकाच दिशेने जातां, प्रभू मिळेल सत्वरी, रेंगाळत बसाल तर, गमवाल तो श्री हरी ।।१।। तुम्ही चालत असतां, अडथळे येती फार, चालण्यातील तुमचे, लक्ष ते विचलणार ।।२।। ऐष आरामी चमक, शरिराला सुखावते, प्रेम, लोभ, मोह, माया, मनाला ती आनंदते ।।३।। शरिराचा दाह करी, राग द्वेष अहंकार मन करण्या क्षीण, षड् रिपू हे विकार ।।४।। सुख असो वा […]

सुप्त शक्ती

खोलीमध्ये कोंडूनी मांजर,  हाती घेई काठी  । मारून टाकण्यासाठी तीला,  लागला तो पाठी  ।। अतिशय भीत्री असूनी ती,  जीवासाठी पळे  । हतबल होता पळून जाण्या,  मार्ग तो ना मिळे  ।। उपाय नसता हाती कांहीं,  चमत्कार घडे  । सर्व शक्तीनी त्याच्यावरती,  तुटून ती पडे  ।। उडी मारूनी नरडे धरले,  दोन्ही पंजानी  । मृत्यूचाच तिने गळा घोटला, शक्ती […]

दिन दिन दिवाळी…

दिन दिन दिवाळी… गायी म्हशी ओवाळी… वसु बारसला ।।१।। दिन दिन दिवाळी… आरोग्य सांभाळी… धन त्रयोदशीला ।।२।। दिन दिन दिवाळी… दुःखाला पिटाळी… नरक चतुर्दशीला ।।३।। दिन दिन दिवाळी… लक्ष्मीला सांभाळी… अश्विन अमावस्येला ।।४।। दिन दिन दिवाळी… नववर्षाची नवाळी… बळी प्रतिपदेला ।।५।। दिन दिन दिवाळी… भावाला ओवाळी… यम द्वितियेला (भाऊबीज) ।।६।।

रामरक्षा आणि Android

रामरक्षेची जागा आता Android ने घेतली, त्या नादातच आजकालची कार्टी ऊशिरा झोपली…. माहीत नाही सीता कोण,भगवदगीता कोण, मात्र प्रत्येक हातात Latest आय फोन…. पुस्तकाची PDF झाली, रोज वेगळा BF अन रोज नवी GF आली… प्रगती होतेय सांगत घडणारी / बिघडणारी नवीन Online पीढ़ी आली… अंगठे दुखतायत आता Type करून मानसं भेटतायतं आता Skype वरुन… पाहुण्यांना भेटणं,पत्र […]

हिशोबातील शिल्लक

हिशोबाची वही घेवूनी बसलो, हिशोब करण्यासाठीं  । जमाखार्च तो करित होतो, जीवनाच्या सरत्या काठीं  ।। घोड दौड ती चालूं असतां, सुख दु:खानी भरले क्षण  । प्रसंग कांहीं असेही गेले, सदैव त्याची राही आठवण  ।। कष्ट करूनी जे कमविले, थोडे धन या देहाकरिता  । उपयोग नव्हता त्याचा कांहीं, जग सोडूनी देह जाता  ।। कधी काळचा निवांतपणा, घालविला […]

काजवा

आभाळ आपल आपणच पेलायच आपल्या वाटेवर आपणच चालायच कुणाची काठी हवी कशाला मनगटातली ताकद दिसू दे जगाला बसतील कधीतरी उन्हाच्या झळा अन् वाहेल मध्येच बेभान वारा सावली तेंव्हा तू शोधु नकोस आडोशाला जाऊन बसु नकोस उन्हाच्या झळांमध्ये तू रापुन जा बेभान वाऱ्यामध्ये तू मिसळून जा सोन नाही का विस्तावात चमकत सुगंध नाही का वाऱ्याने पसरत निर्भीड […]

दोन मनें दे प्रभू

इच्छा आहे प्रभू , तुझ्या नामस्मरणाची ऐकून घे कहाणी,  अडचणींची   ।। नाम घ्यावे मुखीं, एकचित्ताने सार्थक होईल तेव्हां तप:साधने   ।। संसार पाठी, लावलास तूं गुरफटून त्यांत,  साध्य न होई हेतू  ।। मला पाहिजे दोन्हीं, संसार नि ईश्वर एकात गुंततां मन, दुसरे न होई साकार  ।। दे प्रभू ,मनाची एक जोडी संसारांत राहून , घेईन प्रभूत गोडी   […]

जनटीका

घोड्यावरती बसू देईना,  चालू देईना पायी जगाची ही रीत ,  कशी समजत नाही ..१, सज्जनतेची वस्त्रे लेवूनी,  निर्मळ जीवन आले आपण बरे नि काम बरे,  तत्व अंगीकारले…२, मोठा झाला शिष्ठ समजोनी,  वाळीत टाकीले मला दुष्कृत्यामध्ये साथ हवी,  त्यातील कांहीं व्यक्तीला…३, जीवन जगणे कठीण होता,  मार्ग तो बदलला आगळी धडपड करूनी,  यश मिळाले मला….४, मिसळत होतो सर्वामध्ये, […]

आत्म गुरू

गुरूचा महीमा थोर | उघडूनी जीवनाचे द्वार सांगूनी आयुष्याचे सार | मार्ग दाखविती तुम्हां  १ वाटाड्या बनूनी | भटकणे थांबवूनी मार्गासी लावूनी | ध्येय दाखवी तुम्हां  २ न कळला ईश | न उमगले आयुष्य दु:ख देती जीवन पाश | बिना गुरू मुळे  ३ अंधारातील पाऊल वाट | ठेचाळण्याची शक्यता दाट प्रकाशाचा किरण झोत | योग्य रस्ता […]

रेणूके जगदंबे आई

रेणुके जगदंबे आई    दर्शन दे मजला तुझ्या मंदिरी आलो   पावन हो तू भक्तिला    ।।धृ।।   तुझे अजाण बालक    करितो खोड्या अनेक न होई चित्त एक तूंच समजोनी घेई    मम चंचल मनाला   ।।१।। रेणूके जगदंबे आई, दर्शन दे मजला   जमदग्नीची कांता    परशूरामाची तूं माता मनीं तुजला भजतां आशिर्वाद तूं देई     आनंदानें सर्वांला  ।।२।। रेणूके जगदंबे आई […]

1 341 342 343 344 345 437
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..