कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
रसिक श्रेष्ठ
कवि होणें सुलभ असावे रसिक होण्यापरि जिवंत ठेविती कवितेला हीच मंडळी खरी भावनेचे उठतां वादळ व्यक्त होई शब्दानीं भाव शब्दांचा हार दिसतो काव्य ते बनूनी भाव येणे सहज गुण तो मानवी मनाचा परि बंदिस्त त्याला करणे खेळ हा कवीचा शब्द पिंजरा नि भाव पक्षी ओळखी को रसिक कवि मनाशीं ‘स्व’ भावांचे करी जुळवणूक कविते […]
मातीचा पुतळा
मातीचा पुतळा एक फोडला कुण्या वेड्यानी जीवंत पुतळे अनेक जाळून टाकले शहाण्यानी ।। एक करि तो पिसाट ठरवी वेडा त्याला अनेकाची उसळता लाट धर्माभिमानी ठरविला ।। अशी आहे रीत नाहीं समजली मना करुन विचारावर मात श्रेष्ठ ठरे भावना ।। डॉ. भगवान नागापूरकर संपर्क – ९००४०७९८५० bknagapurkar@gmail.com
काहीही झालं तरीही….
काहीही झालं तरीही…. लोकलची गर्दी कमी होणार नाही….,. कितीही कायदा कडक केला तरी….. सरकारी कर्मचाऱ्यांच लाच घ्यायच कमी होणार नाही… कितीही जागृती अभियान राबवले तरीही… सुशिक्षितांचा मतदानाचा “आळस” कमी होणार नाही…. प्रामाणिकपणे भरगच्च कर भरला तरीही …,, सरकारकडुन करांचा छळ कमी होणार नाही… कितीही लांब जायच झाला तरीही.., .,, स्त्रियांच्या मेकअपची वेळ कमी होणार नाही.. लग्न […]
माते दुर्गे चंडिके
जय दुर्गे चंडिके माते, हे दुर्गे चंडिके तुझ्या वरदहस्ताविण, माते, जग ना चालुं शके ।। तूं चामुंडा, काली माता अंबा, ‘शेरोंवाली’ माता वेगवेगळें रूप तुझें भक्तांच्या मनिं झळके ।। रुंड चेचशी पायाखालीं मुंडमालिका कंठीं घाली शूल नि खड्गावरुन करींच्या खलशोणित टपके ।। तुझ्या कृपेनें जीवन फळतें विश्व तुझ्या इच्छेनें पळतें आज्ञेनेच तुझ्या, रविशशिनें […]
जीवन घटते सतत
क्षणा क्षणाला घटते जीवन । जाण त्याची येईल कोठून ।। मोठे प्रसंग जेंव्हा टिपतो । तेच सारे लक्षांत ठेवतो ।। जीवनाच्या पायऱ्या मोजता । मना विचारा काय राहता ।। ढोबळतेचा विचार येता । सूक्ष्मपणाला विसरूनी जातो ।। मृत्यू येई हर घडीला । जाण नसते त्याची कुणाला ।। गेला क्षण परत न येई । आयुष्य तेवढेच व्यर्थ […]
देह समजा सोय
जेव्हां मी म्हणतो माझे, सोय माझी असते त्यांत, देह जगविण्या कामीं, प्रयत्न हे सारे होतात ।।१।। देह वाटते साधन, प्रभूकडे त्या जाण्याचे, त्यासी ठेवतां चांगले, होते चिंतन तयाचे ।।२।। भजन करा प्रभूचे, सुख देवूनी देहाला परि केवल सुखासाठीं, विसरूं नका हो त्याला ।।३।। देह चांगला म्हणजे, ऐष आरामीं नसावे, ती एक सोय असूनी, […]
आई म्हणायची…
आई म्हणायची ‘श्री’ लिहावे नव्या पानावरती, वापरावी नवी वस्तू, कुंकू लावल्या वरती. आई म्हणायची संध्याकाळची, झोपी जातात झाडे, अजून फुलं तोडायला हात होत नाहीत पुढे. आई म्हणायची मिळतेच यश, तुम्ही करत रहा काम, भीती वाटली कि फक्त म्हणावे, राम,राम,राम. आई म्हणायची काहीही असो, होतो सत्याचाच जय, अजूनही खरं बोलायला वाटत नाही भय. आई म्हणायची ठेवा श्रद्धा […]
जेवण आणी राशीचे स्वभाव
थोडेसेच जेवण का असेना मेष आवडीने खाणार.. गरम, चमचमीत पदार्थांवर यांची पहिली नजर जाणार.. ।।१।। वृषभेची व्यक्ती दिलखुलास पणे दाद देऊन जाते.. लोणची-पापडासारखे पदार्थही अगदी चवीचवीने खाते.. ।।२।। कधी मारुनी मिटक्या, कधी नन्नाचा चाले पाढा.. मिथुनाचे कौतुक मधाळ तर टीका कडवट काढा.. ।।३।। ‘अन्न हे पूर्णब्रह्म’ म्हणत कर्केचे होते पूर्ण जेवण.. रुचकर पण थंड अन्नही हे […]