१० – वरद गणपती गुणद गणपती
वरद गणपती, गुणद गणपती, सुखद गणपती रे तव शुभ नामें बिकट पथा निष्कंटक करती रे ।। चिवट दाट भवतापकर्दमीं जीवनशकट रुते कुटिल भयप्रद संकट भेसुर विकटकास्य करते नतद्रष्ट विघ्नांचें सावट, विकटा, हटव पुरें ।। दुष्ट-कष्ट करतोस नष्ट तूं, हे मंगलमूर्ती दासांच्या आशांची अविरत तूं करसी पूर्ती क्लेशमुक्त होतात भक्तगण तव-गुण गाणारे ।। पापाचरणीं […]