नवीन लेखन...

सार्थक

जगती जन्म हा हिशेब गतजन्मांचा प्रारब्धभोग पुर्वसंचिताचे….. कधी सुखदा, कधी दुःख वेदनां हेच खेळ सारे मूक साहण्याचे…. पराधीनता जगती सकल जीवाजीवांची अनामिका हाती दोर कठपुतळीचे….. दैवी प्रीतभावनां भाग्य ते भाळीचे वात्सल्य अमृती कृपासिंधु मातेचे…. तोच कृपाळू एक सत्य ! शाश्वताचे त्याला नित्य स्मरावे हे सार्थक जीवनाचे…. –वि.ग.सातपुते.( भावकवी ) 9766544908 रचना क्र.१९० ६/८/२०२२

जगावेगळी

त्यांचं वेड जगावेगळंच , अनाकलनीय आहे सगळंच. विचार वेगळा वेगळंच जगणं, कृतीत प्रत्यक्ष, न पोकळ बोलणं. मुके प्राणी यांचे सोबती, जगच यांचं त्यांच्या भोवती. हृदयात माणुसकी मनात निष्ठा, मुक्या जगाचा हा पाणवठा. पुढचा मागचा न विचार मनात, चमकण्याची न इच्छा जनात. निगुतीने करत राहायचं काम , त्यांच्या कार्याला खरंच सलाम. मुक्याना इथे मुक्त वावर, अहो, वस्तीला […]

काजळ गाली

सख्या, तुझ्या आठवात मी, चालते संथ पाऊली सांजवर्खी या सांजवेळी ओघळले, काजळ गाली…. संगती तीच वाट निरंतरी तुझ्याच स्पर्शात नाहलेली नेत्री दाटता अस्तिव तुझे ओघळले, काजळ गाली…. ही नित्याची साक्ष अंतरी पाहता, उमललेली कळी अनवट मोहक वाटेवरचा तूच नटखट माझ्या भाळी…. तुज मी स्मरता वेळोवेळी ओघळले, काजळ गाली तुझा असा असह्य दुरावा ओघळते, काजळ गाली…. –वि.ग.सातपुते.(भावकवी) […]

अदुबाळा

ये अदुबाळा ये लडिवाळा माझ्या प्राजक्ताच्या फुला आसुसतो मी, आतुरतो मी तुझ्या गोड, बोबड्या बोला लावतात लळा मला तुझ्या लडिवाळ लीला पाहून तुझा गोजिरवाणा चाळा ओंजारण्या तुला, गोंजारण्या तुला उचंबळून येतो जीवाचा जिव्हाळा नाजूक साजूक मोहक क्षणांचा या भरवावा आनंदमेळा उधळावे आयुष्याचे संचित त्यावरुन ओवाळून गोळा – यतीन सामंत

सुंदर सत्य

जीवन हा श्वास आहे स्मरणगंधी ध्यास आहे… कळीकळीने उमलावे फुलांनी दरवळणे आहे… सभोवारी गंधाळावे सत्कर्मी आव्हान आहे… सुखदुःखांच्या सरोवरी मुक्त असे डुंबणे आहे… प्रवाहा विरुद्ध पोहणे पुरुषार्थाची कमाल आहे… विवेकाची साथ असावी अप्राप्यही, प्राप्त आहे… मनामनांत नित्य रहावे तीच खरी मन:शांती आहे… द्वैत, अद्वैत एकरूपता निर्मलतेचे प्रतिबिंब आहे… कानी मंजुळ धुन मुरलीची आत्मानंदी सुंदर सत्य आहे… […]

भावुक मनांतर

आले कोवळे किरण कांचनी चराचर सारे , सुखात नाहले… भावनांच्या कळ्या उमलल्या अधरी शब्दलाघव ते प्रसवले… रिमझिमणाऱ्या, श्रावणधारी कृष्णमेघ सावळे बरसबरसले हिरवळलेल्या या तृणांकुरातून चैतन्य जीवा तोषवित राहिले… लागताच चाहुल विश्वंभराची रूप ब्रह्मांडाचेही भारावुन गेले… झरझरता श्रावण आत्मरंगला स्वर शब्दमार्दवी दाटुनी आले… व्याकुळता, अंतरीची निरागस मन दिगंतरी सारे भावुक झाले… –वि.ग.सातपुते .(भावकवी) 9766544908 रचना क्र. १८७ […]

अंतिम सत्य

गर्व बाळगावा ज्याचा असं आपलं आपल्याशी काही नसतं जे आहे ते कधीच नव्हतं का हे फारच उशीरा कळतं माझं माझं असं माझं माझ्यापाशी काहीच नव्हतं रुपापासून गुणापर्यंत आयुष्य सारं उसनं असतं माझं, असं माझ्यापाशी होतं का, कधी काही गुणसूत्रांची उसनवारी ही आयुष्याची नोंदवही -यतीन सामंत

क्षण

क्षण तोच धुंद , बेभान अस्तित्वा हरवुनी गेला मी , तू सहज विसरूनी मिठितच गुंतवुनी गेला तो सोहळाच प्रीतस्पर्शी अंतरंगी विर्घळूनी गेला तादात्म्य ! भाव निर्मळी स्वत्वास ! समर्पूनी गेला तोच अवीट स्पर्शानंद श्वासास सजवुनी गेला खेळ साराच संचिताचा जन्म , हा कृतार्थ झाला –वि.ग.सातपुते ( भावकवी ) 9766544908 रचना क्र.१८६ ३/८/२०२२

अनामिक हुरहुर

सौख्य, समृद्धीच्या पंखाखाली जरी निश्चिंती, मी सदैव जगलो… तरीही अव्यक्त हुरहुर अनामिक स्मरणगंध सारे उसवित राहिलो… उसवीणे ते, आनंदी आत्मरंगले धागे सारे शब्दात गुंफित राहिलो… प्रीतभावनांचे पदर ते दवभरलेले गीतात, नित्य आळवित राहिलो… तरीही अजुनही हुरहुर अनामिक आत्मारामा अंतरी शोधित राहिलो… हुरहुर जरी ती, तरीही शांती सुंदर मनास माझ्या समजावित राहिलो… साक्षी, उभी अंगणी प्रसन्न बकुळी […]

अनामिक

मी आजही अलवार जीवापाड कुरवाळतो काहुर अव्यक्त वेदनांचे मनोमनी शांत सुखावतो.. जे लाभले भाग्य ललाटी ते निमुटपणे मी भोगतो घेवुनीया व्रत सत्कर्माचे मी जगती विवेके जगतो.. जन्म गतजन्मांचेच कर्म ओंजळीत घेवुनी जगतो हिशेब साराच पापपुण्णी चित्रगुप्त तो चोख ठेवतो.. कावडीच सुखदुःखांच्या सोबती घेवुनी मी चालतो सरतातही क्षण जीवनाचे नकळे मज कोण सावरतो.. सारेसारेच अगम्य अतर्क्य केवळ […]

1 33 34 35 36 37 437
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..