नवीन लेखन...

(काव्य) : प्राउड टु बी अॅन् इंडियन (?)

(न्यू यॉर्कमध्ये ‘इंडिया डे’ साजरा झाला, त्यानिमित्तानें ) ‘आय् अॅम् प्राउड टु बी अॅन् इंडियन ! कम ऑऽन, से द सेऽम इव्हरीवन्’ . १ आमचा शेजारी-देश आमचा घास गिळतो आणि नंतर आम्हालाच छळतो आम्हाला कळतंय् त्याचं तंत्र पण जपतोय् ना आम्ही ‘अहिंसेचा मंत्र’ ! अहो, कुणाला कशी द्यायची उत्तरं हें आधी ठरवा तर खरं अन् मग […]

कृष्णजन्माष्टमीनिमित्त : गोकुळ – (१ ) : कान्हा अवतरला

पुराणिक वर्णन करत आहे : मध्यरात्र तेजानें उजळे, भास्कर झळमळला देवकी-वसुदेवाच्या पोटीं कान्हा अवतरला ।। मध्यरात्रिची घटिका भरली देवकिची काया थरथरली कारागृह-कोठडित अलौकिक-प्रकाश झगमगला ।। हर्षित-अति वसुदेव होतसे लगेच भीती ठाव घेतसे कंसभयानें पिता सुतासाठी मनिं तळमळला ।। क्षणीं उचललें श्यामल बाळा टोपलीत घालून निघाला गळुन शृंखलांच्या खळखळुनी पडल्या जड माळा ।। आपोआप उघडली दारें झोपी […]

झीज

रात्रंदिनी कष्ट करूनी, झिजवत होता आपले हात, जीवनांतल्या धडपडीमध्यें, दिसे त्याची स्थितीवर मात ।।१।।   पर्वा नव्हती स्व-देहाची, झिजवत असता हात ते, जाण होती परि ती त्याला, हेच कष्ट  जगवित होते ।।२।।   श्रम आणि भाकरी मिळूनी, ऊर्जा देई तिच शरीराला, ऊर्जेनेच तो देह वाढवी, समाधान जे मिळे त्याला ।।३।।   डॉ. भगवान नागापूरकर संपर्क – […]

कर्ममुक्ती

न राही तुमचे ते कर्म, ज्यात प्रभू इच्छा अंतीम….१,   प्रत्येक घटनेचे अंग, त्यात मुख्य ईश्वरी भाग….२   तुमच्या मार्फतच होई त्याचा इशारा कोण पाही….३,   सर्व समजे मीच केले अहंकाराने मन भरले….४,   षडरिपू असे साधन खेळविता यावे म्हणून…५,   राग,लोभ, मोह मायादी ठेवती वाटते आनंदी….६,   परि याच्याच शक्तीने प्रभू खेळ चाले युक्तीने….७,   […]

आठवण

अनामिक जे होते पूर्वी, साद प्रेमाची ऐकू आली  । योग्य वेळ येतां क्षणी, हृदये त्यांची जूळूनी गेली  ।।१।।   शंका भीती आणि तगमग, असंख्य भाव उमटती मनी  । विजयी झाले ऋणानुबंध, बांधले होते हृदयानी  ।।२।।   उचंबळूनी दाटूनी आला, हृदयामधला ओलावा  । स्नेह मिळता प्रेम मिळाले, जगण्यासाठी दुवा ठरावा  ।।३।।   मनी वसविल्या घर करूनी, क्षणीक […]

मन तुझे कां गहिवरले ?

भाळी नसता कुंकंम तुझ्या गे विरचक्र हे हातीं आले मरणोत्तर हा किताब मळतां मन तुझे कां गहिवरले ?   शुर विराची अर्धांगिनी तू युद्धभूमिवर त्यास धाडीले ओवाळूनी निरोप देतां मन तुझे कां गहिवरले ?   देश सेवेत कामी यावे ब्रिद त्याचे मनी ठसविले सांगत असतां हेच दुजांना मन तुझे कां गहिवरले ?   सुर्वणाक्षरीं वाचून गाथा […]

स्वातंत्र्यदिन-गीत – (३) : वाढदिवस स्वातंत्र्याचा ..

वाढदिवस स्वातंत्र्याचा, जो-तो बघ गात आहे – ‘सर्व लोक खूष येथें , सर्व सुशेगात आहे’ ।। पुढे पुढे काळ चाले, पुढे पुढे दुनिया जाई आणि पहा देश अपुला कसा कुठे जात आहे ! कोटि-कोटि देव ठाकत धनवंताच्यासाठी कोण इथें दीनासाठी ? तो पुरा अनाथ आहे ।। महापूर-भूकंपांनी जनजीवन नासे पुरतें फक्त एवढेंच ? बाकी सर्व-सर्व शांत […]

अविवेकी कष्ट

विश्वास होता एक मनी, ते घरटी बांधीत असतांना, कसे सुंदर होईल घरटे,  रंगवित होते कल्पना ।।१।।   खिडकीवरल्या कपारीमध्ये,  शोधला होता एक निवारा, निवाऱ्यात त्या घरटी बांधण्या,  आणीत होते काडीकचरा ।।२।।   उजाडता कुणी खिडकी उघडे,  चिमण्या बांधीत घरटी, सांज समयी बंद झापडे,  ठेवी त्यांना एकटी ।।३।।   नित्य दिनी प्रात: समयी,  कुणीतरी फेकी कचरा समजूनी, […]

स्वातंत्र्यदिन-गीत – (२) : सुंबरान मांडलं ऽ

स्वातंत्र्याच्या वाढदिवशीं सुंबरान मांडलं ऽ आजपुरतं आनंदाला आवतान धाडलं ऽ ।। रोज-रोज रडन्याचा कट्टाळा आला रं येका दिवसापुरतं दु:ख खोलखोल गाडलं ऽ ।। आयतं मिळालं म्हनुन, किंमत न्हाई रं त्याची ठाऊक हाये कां रं, रगत किती सांडलं ऽ ? धर्माच्या कुर्‍हाडीनं आईचं तुकडं कां ? सांग की रं, कशासाठी भाऊ-भाऊ भांडलं ऽ ? जातपात अन् जमात, […]

स्वातंत्र्यदिन-गीत – (१) : पुढे काय ?

स्वातंत्र्य मिळालें, पुढें काय ? चालेल पुढें हें मढें काय ? स्वातंत्र्यासाठी फुकटच लाखों पडले अम्हि-तुम्हि घेतले धडे काय ? सत्तर वर्षें स्वातंत्र्याला होतिल रे गाजण्यांयोग्य पण घडे काय ? सांडलें रक्त हें खरेंच आहे, परी अविरत त्याचे चौघडे काय ! राज्यावर शिवबांच्या बाजिराव-दुसरा ! मग राज्य बुडालें, अडे काय ? जो खाली, तो तर खाली-खाली […]

1 349 350 351 352 353 437
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..