नवीन लेखन...

बचाव

सरडा चढला झाडावरती, सर् सर् सर्, करीत  । लक्ष्य त्यांचे फूलपाखरू, फुलाभोवती होते खेळत ।।१।।   भक्ष्यकाची चाहूल मिळतां, भर् भर् भर् गेले उडूनी  । शोषीत असता गंध फुलांतील, चंचल होते नजर ठेवूनी ।।२।।   व्याघ्र मावशी मनी  , म्याँव म्याँव करीत आली  । उंदीर मामा दिसता तिजला, झेप घेण्या टपून बसली ।।३।।   शंका येता त्याला […]

आयुष्य लढा

चोखपणे हिशोब राहू दे, आपल्या जीवन कर्माचा, कुण्याही क्षणी पाढा वाचणे, भाग बनेल तो नशीबाचा ।।१।।   घीरट्या घालीत फिरत राही, आवतीभवती काळ, क्षणात टिपून उचलून घेतो, साधूनी घेता अवचित वेळ ।।२।।   सदैव तुमच्या देहाभवती, त्या देहाचे कर्मही फिरते, आत्मा जाता शरीरही जाई, कर्मवलय परि येथेच घुमते ।।३।।   पडसाद उमटती त्या कर्माचे, सभोवतालच्या वातावरणी, […]

स्मृतिकाव्य : तूं अजुन-जगीं-असण्याचा दिनरात भास होतो

संभ्रम तुझ्या हंसण्याचा नित काळजास होतो तूं अजुन-जगीं-असण्याचा दिनरात भास होतो ।। १ हलकीशी झुळूक गंधित अंगावरून जाई कुठुनी हा सोनचाफा उधळत सुगंध राही ? स्मृतिचा, मनात माझ्या अविरत सुवास होतो ।। २ मज कोण बोलवी हें , कां नेत्र ओलवी हे ? कंठात हुंदका कां दाटुन उगीच राहे ? संसर्ग विकलतेचा, आहत-मनास होतो ।। ३ […]

मशाल

श्री गुरू दत्ताचे अवतार, अवतरले या भूमिवर  । विविध नामे परि,  दुर्बलांची करण्या कामे  ।१। अक्कलकोटचे निवासी, स्वामी समर्थ आले उदयासी  । दैवी शक्ती अंगी,  अंधारी चमकली ठिणगी  ।२। मशाल घेवून हाती,  आला धावत पुढती  । अति वेगाने, सर्वांची उजळीत मने  ।३। कर्म योग आणि भक्ती,  ह्या तीन ईश्वरी शक्ती  । एकत्र जाहल्या,  मशालीत त्या समावल्या  […]

समाधानाची बिजे

दाही दिशांनी फिरत होतो मनी बाळगुनी तळमळ ती कसे मिळेल समाधान ते विवंचना ही एकच होती   धन दौलत ही हातीं असतां धुंडाळल्या त्या बाजार पेठा न मिळे समाधीन कोठें थकली पाऊले चालून वाटा   देखिले निसर्गरम्य शिखरे आणिक कांहीं प्रार्थना स्थळे शिलकीमध्यें दिसे निराशा कारण त्याचे कांहीं न कळे   भावनेमधली विविध अंगे येऊं लागली […]

दु:खात सर्व शिकतो

दु:खातची शिकतो सारे, उघडोनी मनाची द्वारे  । दु:खा परी नसे कुणी, जो सांगे अनुभवाने  ।।१।।   दु:ख मनावरी बिंबविते, वस्तुस्थितीची जाणीव देते  । दुसऱ्या परि आस्था देई, जाणीव ठेवूनी कार्य करते  ।।२।।   अधिकाराने माज चढतो, खालच्यांना तुच्छ लेखतो  । जाता हातातूनी अधिकार, माणूसकी काय? हे कळणार  ।।३।।   कष्ट करण्याची वृत्ती येते, सर्वांना समावून घेते  […]

व्योमातुन अवतरला गजमुख

अंतराळ-यायित्राकासारखा धारुन गणवेश व्योमातुन अवतरला गजमुख, देव-गणाधीश ।। १ सोंडेसम भासतो मुखवटा, ‘प्राणवायु’ पुरवी संरक्षक अवकाश-कवच त्या तुंदिलतनु बनवी ध्वनिसंवर्धक मुखाजवळ, जणुं हस्तिदंत एक शूर्पकर्णसम बशीमधे केंद्रित ध्वनि प्रत्येक अश्वहीन रथ मूषक भासे, पुच्छ धूम्ररेष ।। व्योमातुन अवतरला गजमुख देव-गणाधीश ।। २ प्रकाशगतिनें कुठून आला लक्ष-लोक लांघुनी भूवर कधि, कितिदा अवतरला, नच जाणे कोणी कोटिकोटि मानव-जन्मांच्या […]

आनंदमय जाग

हलके हलके निशा जाऊनी, उषेचे ते आगमन होई, निद्रेमधल्या गर्भामध्यें, रवि किरणांची चाहूल येई ।।१।।   त्या किरणांचे कर पसरती, नयना वरल्या पाकळ्यावरी, ऊब मिळता मग किरणांची, नयन पुष्पें फुलती सत्वरी ।।२।।   जागविती ते घालवूनी धुंदी, चैत्यन्यमय जीवन करी, जादूचा हा स्पर्श असूनी, न भासे किमया दुजापरी ।।३।।   डॉ. भगवान नागापूरकर  ९००४०७९८५० bknagapurkar@gmail.com   […]

मिष्किल तारे

चमकत होते अगणित तारे, आकाशी लुकलुकणारे । लक्ष्य वेधूनी घेतां घेतां, फसवित होते आम्हांस सारे ।।१।।   कधी जाती चटकन मिटूनी, केंव्हां केंव्हां दिसती चमकूनी । खेळ तयांचा बघतां बघतां, चित्त सारे गेले हरपूनी ।।२।।   एक एक जमती नभांगी, धरणीवरल्या मांडवी अंगीं । संख्या त्यांची वाढतां वाढतां, दिसून येती अनेक रांगांनी ।।३।।   हसतो कुणीतरी […]

1 351 352 353 354 355 437
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..