कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
तल्लीनतेत आहे ईश्वर
श्रीकृष्णाचे जीवन बनली एक गाथा, यशस्वी होई तुमचे जीवन चिंतन त्याचे करिता ।।१।। तल्लीनतेच्या गुणामध्यें लपला आहे ईश्वर, तल्लीनतेचा आनंद लुटा शिकवी तुम्हा मुरलीधर ।।२।। बालपणीच्या खेळामध्ये जमविले सारे सवंगडी, एकाग्रतेने खेळवूनी आनंद पदरीं पाडी ।।३।। मुरलीचा तो नाद मधूर मन गेले हरपूनी, डोलूं लागले सारे भवतीं मग्न झाल्या गौळणी ।।४।। टिपऱ्या घेवूनी नाच नाचला गोपी […]
चि. पल्लवीस
भरून आले डोळे जेंव्हां, कढ मायेचे उचंबळले, हृदयामधल्या भावनेला, अचानकपणे मार्ग मिळाले ।।१।। प्रेमळ निर्मळ तसेच सात्वीक, लोभसवाणे रूप मनोहर, आपुलकीने मने जिंकलीस, आनंदूनी सान थोर ।।२।। वागणुकीत दिसते किमया, हवी हवीसची तू सर्वांना, टिकवूनी ठेव गुणविशेष हा, यशस्वी करील तव जीवना ।।३।। डॉ. भगवान नागापूरकर ९००४०७९८५० bknagapurkar@gmail.com
आज-उद्या
‘उद्या’ साठी जगतो आम्हीं राहून मृत्युच्या दाढी । भविष्यांतील सुख कल्पूनी आज सारे कष्ट काढी ।। ‘आज’ राहतो नजिक सदैव ‘उद्या’ चालतो पुढे पुढे । आज नि उद्या यांची संगत कधीही एकत्र न पडे ।। कष्ट ‘आज’ चे शिरीं वाहूनी ध्येय ‘उद्या’ चे बघती । हातीं न कांही पडते तेव्हां निराश सारे होती ।। समाधान चित्तीं आणण्या […]
एकापेक्षा एक
‘झी’ ने एक अनाऊन्समेंट केली, ऐकून मनाची चलबिचल झाली, भाग घ्यायची मी तयारीच केली, कारण स्पर्धा होती …. एकापेक्षा एक “आजी” आली | हे आणि मुल म्हणे, अग वयाच सोड, तुझ वजन तरी बघ, ‘महागुरुंच्या’ डोळ्यात मावेल कां हा ‘ढग’ ? पण नातवंडांचा मला मिळाला सपोर्ट, म्हणून ऑडिशनचा केला दिव्य खटाटोप | काय नशिब पहा, चक्क […]
तुझे तुलाच देवून मोठेपण
वेडे आम्ही सारे, तुझेच घेवूनी तुला देतो, त्यातच मोठेपण मिरवितो…१, जाण आहे याची सर्व जगाला चकमा देतो, स्वत:लाही फसविता असतो….२, फुले बागेमधली तोडून तुजला वाहतो, हार त्यांचे करूनी घालतो….३, गंगेतील थोडे पाणी, अर्घ्य आम्ही तुला देतो, भक्तीभावाने अर्पण करितो….४, सारे असूनी तुझे, मीपणा हा सतत राहतो, परी हा भाव दुजासाठी असतो…५ डॉ. भगवान नागापूरकर ९००४०७९८५० bknagapurkar@gmail.com
नको नको रे.. झोपु
मस्त झोपलाय देश, झोप त्याची मोडू नका “ गोळीबार बॉम्ब इथे फोडू नका, मस्त झोपलाय देश झोप त्याची मोडू नका ll भ्रष्टाचार पसरतोय.. पसरु दे रुपया घसरतोय.. घसरु दे अंगावरचे पांघरुण उगाचच ओढू नका, मस्त झोपलाय देश झोप त्याची मोडू नका ll ll लुटालूट, बलात्कार.. बघूच नका रांगेमध्ये उभे रहा.. बोलूच नका नेत्यांचेच पाय धरा बोल […]
आत्म्याचे बोल
काय आणि कसे बोलतो, त्यांना माहीत नव्हते, सहजपणे सुचणारे, संभाषण ते असते ।।१।। शिक्षण नव्हते कांहीं, अभ्यासाचा तो अभाव, परि मौलिक शब्दांनी, दुजावरी पडे प्रभाव ।।२।। जे कांहीं वदती थोडे, अनुभवी सारे वाटे, या आत्म्याच्या बोलामध्ये, ईश्वरी सत्य उमटे ।।३।। डॉ. भगवान नागापूरकर ९००४०७९८५० bknagapurkar@gmail.com