नवीन लेखन...

जपमाळ कशास हवी, सखये ? (स्मृतिकाव्य )

जपमाळ कशास हवी, सखये ? न हवे रुद्राक्षमणी, सखये जप करतो आहे तुझाच, माळेविणाच मी सखये ।। ईशप्राप्तिसाठी ऋषीमुनी जपतप करती खूप ऋषी न मी, करि तुजसाठी जपतप परी, सखये ।। जप केल्यानें प्रसन्न होउन, देई दर्शन देव तुझ्या दर्शना मी आतुर, देशील कधी, सखये ? उघड्या नेत्रीं वसतें कायम तुझेंच रूप, प्रिये जपात, मिटल्या नयनां […]

छत्रपती शिवराय : बाजी – पावनखिंडीतला ढाण्या वाघ

शाहीर पहिला : ( प्रास्ताविक ) : पन्हाळ्याहुनी शिवबाराजे पळत विशाळगडीं अंधारातुन सोबत करती मर्द मावळेगडी दुश्मनास चकवून धावती चिखला तुडवत पायीं सुखरुप राजांना न्यायाची या वाघांना घाई पहाट होतां दिसे पायथा, मागुन दुश्मन धावे ‘आतां कैसें पुढला वेढा फोडुन वरती जावें ?’ बोलत बाजी, ”थांबूं आम्ही, खिंडिस लढवत राहूं निजदेहांचे बांध बनवुनी दुश्मन अडवत राहूं […]

तूच माझा ईश्वर

मनांत ठसले रूप तुझे,  येते नयना पुढे  । रात्रंदिन मज चैन ना पडे…..।।धृ।। शरीर जरी सुंदर मिळे  । प्रयत्नांनी तूंच कमविले  ।। चपलता ही छाप पाडीते  । लक्ष्य खेचूनी तुझ्याकडे मनी ठसविले रूप तुझे येत नयना पुढे  ।१। हासणे खेळणें आणि चालणें  । ‘ढंगदार’  तुझे बोलणे  ।। शरीरामधल्या हालचालींना  । सहजपणाचे वळण पडे मनी ठसविले रूप […]

‘एवढे दे पांडुरंगा..’

सुरेश भटांची “एवढे दे पांडुरंगा..” ही कविता अगदी मन लावून वाचा.. मनात कुठेतरी जाणवेल की, दान तर उदात्त असतेच पण ‘मागणं’ देखील किती उदात्त असू शकते..!! माझिया गीतात वेडे दु:ख संतांचे भिनावे; वाळल्या वेलीस माझ्या अमॄताचे फूल यावे ! आशयांच्या अंबरांनी टंच माझा शब्द व्हावा; कोरडा माझा उमाळा रोज माधुर्यात न्हावा ! स्पंदने ज्ञानेश्वराची माझिया वक्षांत […]

पंढरीचा राणा – ११ : माझा सखा पांडुरंग

उठतां बसतां भेटे मज सारखा पांडुरंग माझा सखा पांडुरंग ।। नेत्र पाहती मूर्ती श्यामल जिव्हा जपते ‘विठ्ठल विठ्ठल’ गातो हृदयाचा प्रत्येकच ठोका ‘पांडुरंग’ ।। काम-क्रोध-मद-मोह बांधती लोभ नि मत्सर हरती शांती नाशतसे त्या सहा रिपूंचा धोका पांडुरंग ।। संकटांचिया काट्यांमधुनी नेई विठ्ठल बोट पकडुनी दूर करितसे चिंता-भीती-शोका पांडुरंग ।। अज्ञानाची अवस काज़ळी विठू न येऊं देतो […]

पंढरीचा राणा – १० : प्राणांत पांडुरंग

भजनांत पांडुरंग , नयनांत पांडुरंग शर बनुन खोल रुतला प्राणांत पांडुरंग ।। आसक्ति जीवनीं ना, तरि श्वास हवा वाटे प्रत्येक क्षणिं मिसळतो श्वासांत पांडुरंग ।। ना ठावकी कुणाला, ना कल्पना मनाही पाप्याचिया कसा या हृदयात पांडुरंग ? खाऊन मत्त लाथा, जरि विसर्जिला गाथा देतो पुनश्च गाथा हातांत पांडुरंग ।। प्रतिमा बघे विटेवर, गहिवर गळ्यात दाटे नि:शब्द […]

विस्तृमी जगवी आनंद

स्मृतिदोषचि आम्हां शिकवी, जीवन सुसह्य बनविण्याते, अटळ असूनी प्रसंग कांहीं, दुर्लक्ष करीतो त्याते ।।१।। माझ्यातची ईश्वर आहे, आम्हास जाणीव याची नसते, शोधांत राहूनी त्याच्या, जीवन सारे फुलत राहते ।।२।। मृत्यू घटना कुणा न चुकली, परि आठवण येई न त्याची, विस्तृत योजना मनी आंखतां, काळजी नसते पूर्णत्वाची ।।३।। विसरूनी जाऊनी त्या मृत्यूला, जीवनांत तो रंग भरी, प्रेम […]

स्मृतीगंध

इतिहासाच्या पानामध्ये दडल्या गूढ कथा त्यातुन काही उचलून आणि मानवतेच्या व्यथा अवगत तुजला असतील आता यातील काही गोष्टी फिरत फिरत ही अवनी आहे बदलत आहे सृष्टी ।।१।। उचलून घे तू मित्रा आता यातील काही दाणे बदलत आहे धरती सारखी हेच आमुचे गाणे नको पाहु तू मागे वळुनी पुन्हा – पुन्हा जेणे जुन्या स्मृतीच्या पायावरती हे तर […]

पंढरीचा राणा – ८ : पंढरीची वाट

भक्तमनीं कैवल्याची इथें गळाभेट रे पंढरीत मोक्ष दावी पंढरिची वाट रे ।। आस एक – पुण्यद पाहिन नदी चंद्रभागा ध्यास एकमात्र – मोक्षद बघिन पांडुरंगा एकमात्र भास – दिसतें रूपडें अवीट रे ।। स्वप्नवत् जहालें – गेलो पंढरिनगरात मी भारुन, कर जोडुन, ठाके विठूमंदिरात मी मंत्रमुग्ध होउन पाही विठ्ठलपदिं वीट रे ।। तेज आगळें विठूच्या सावळ्या […]

पंढरीचा राणा – ९ : मज हवी पंढरीवारी

यात्रा चारीधाम नको, मज हवी पंढरीवारी देवांचाही देव तिथें विठु , भक्तांचा कैवारी ।। नेत्र मिटुनही अंत:चक्षू रूप पाहती त्याचें झोपेमध्येसुद्धां विठ्ठलमूर्ती  नयनीं नाचे अखंड विठ्ठलमहिमा गाती या वाचा चत्वारी ।। भान हरपलें, पाण हरखले, येतां भीमाकाठा मान पळे, अभिमान गळाला, उरला नाहीं ताठा पोचे चिन्मय-आनंदाच्या अक्षय मी कोठारीं ।। हवी कशाला नश्वर दुनिया, हवी कशाला […]

1 354 355 356 357 358 437
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..