नवीन लेखन...

प्राणवायू – शिवशक्ती

सारेच आहे प्रभूमय, अणूपासून ब्रह्मांड होय…१, ब्रह्मांड भाग तो ईश्वराचा, आकाश भाग हा ब्रह्मांडाचा….२, सर्वत्र व्यापले आकाश, न जाणती त्याचे पाश, ….३, वायूचा होवून संचार, जीव जंतू जगविणार….४ वायू असे शक्तीचे रूप, पेटवी तो प्राणदीप….५, प्राण आपल्या अंतरी, तेच असे रूप ईश्वरी….६ जसे शिव आणि शक्ती, तसे प्राण व वायू असती…७, बाहेरची वायू शक्ती, अंतरिच्या प्राणास […]

निसर्गाचे मार्ग वेगळे

मार्ग निसर्गाचे सदा, निश्चित आणि अढळ  । चालतो त्याच दिशेने,  जसजशी येते वेळ ।।१।। चालत आसता थांबे,  भटके वाट सोडूनी  । करूया काही आगळे  ठरवी  विचारांनी ।।२।। आगळे वेगळे काय, त्याला जे वाटत असे  । नियतीची वाट मात्र,  त्या दिशेने जात नसे ।।३।। परिस्थितीचे कुंपण,  टाकले जाते भोवती  । कळत वा नकळत,  मार्गी त्यास खेचती ।।४।। […]

पंढरीचा राणा – ६ : विठ्ठलमंदिर राहिल उघडें

चोविस तासहि विठ्ठलमंदिर राहिल हें उघडें ना भक्तांना दर्शन घेण्यां आतां कष्ट पडे ।। १ जेव्हां जेव्हां विठ्ठल झोपे मूर्ती दारामागुती लपे भलीथोरली वारकर्‍यांची दारीं रांग अडे ।। २ पांडुरंग अन् भक्तांमधलें हवें कशाला अंतर असलें ? दार उघडुनी बडवे करती पुण्यकार्य तगडें ।। ३ आतां विठुला निद्रा नाहीं अष्टप्रहर तो दर्शन देई आतां त्याला भेटायाला […]

पंढरीचा राणा – ७ : उघडें मंदिर आहे

सर्व थरांतिल नारि-नरांना उघडें मंदिर आहे विठुरायाच्या वारकर्‍यांना उघडें मंदिर आहे ।। विठुराया ज्यांचा सांगाती नाहीं त्यांना ज़ातीपाती उच्च-नीच नाहीं, सार्‍यांना उघडें मंदिर आहे ।। उभे पुजारी-सेवक-बडवे कुणि न विठूच्या भक्तां अडवे अष्टप्रहर, साती वारांना उघडें मंदिर आहे ।। प्रपंच विसरुन केलिस वारी अजुन थबकसी कां बाहेरी ? कड्याकुलुप नाहीं दारांना, उघडें मंदिर आहे ।। हातांमध्ये […]

अतृप्त भूक

चंद्रा तुझे रूप कसे रे, गोंडसवाने छान टक लावूनी बघता, हरपूनी जाते भान मधूर शुभ्र नभी चंद्र तो, जणू चांदीची थाली अगणीत वाट्या विखूरलेल्या, दिसे भोवताली टपोर चांदणे वाहूनी जाते, त्या थाली मधूनी स्वाद लूटता धुंद होतो, घेता ते झेलूनी रिक्त होते एक वाटी ती, भरूनी जाई दुजी प्राशन करिता सीमा नसे मग, आनंदा माजी अतृप्त […]

आत्म्याचे मिलन

आत्म्याचे मिलन परमात्म्याशी, हेच जीवनाचे ध्येय असे, आत्मा ईश्वरी अंश असूनी, त्यालाच मिळण्या उत्सुक असे ।।१।।   देह पिंजऱ्यांत अडकता, बाहेर येण्या झेप घेई तो, अवचित साधूनी वेळ ती, कुडी तोडूनी निघून जातो ।।२।।   कार्य आत्म्याचे अपूरे होता, पुनरपी पडते बंधन, चक्र आत्म्याचे चालत राही, मुक्त होण्याचा येई तो क्षण ।।३।।   डॉ. भगवान नागापूरकर  […]

पंढरीचा राणा – ५ : अविरत भक्त करत वारी

अविरत भक्त करत वारी, हॅटस् ऑऽऽफ् टु देम् अथक जन ज़ात विठूदारीं, हॅटस् ऑऽऽफ् टु देम् ।। ऊन नि पाउस यांची नाहीं एकाला पर्वा ध्यास एकची लागे सर्वां – तो विठ्ठल बरवा भारले सारे वारकरी, हॅटस् ऑऽऽफ् टु देम् ।। कठिण शेकडो मैल तुडवती मराठदेशातले अखंड नाचत भक्त शेकडो, कुणिही नच दमले देइ चैतन्य मनां पंढरी, […]

काव्य कलश

ही दया कुणाची झाली, सापडे शब्दांचा झरा, उपसतो जरी सतत, होत नसे निचरा….१, गोड पाणी शब्दांचे, ओठी अमृत वाटे, पेला भरता काठोकाठ, काव्य हृदयी उमटे….२, पेला पेला जमवूनी, कलश भरून आला, नाहून जाता त्यात, देह भान विसरला….३, सांडता पाणी वाहे, पसरते चोहीकडे, आस्वाद घेई जो जो, विसर जगाचा पडे….४ — डॉ. भगवान नागापूरकर ९००४०७९८५० bknagapurkar@gmail.com

पंढरीचा राणा – ४ : चला रे जाऊं पंढरिला

ज्ञानदेव : चला रे जाऊं पंढरिला तिथें कधीचा अपुल्याकरितां श्रीहरि खोळंबला ।। ज्ञाना ज़रि हठयोगी आहे परी हृदय श्रीहरीस पाहे योगेश्वर आनंदसिंधु तो, हें ठावें मज़ला ।। कुणी तया म्हणती श्रीरंग कुणि विठ्ठल, कुणि पांडूरंग स्वयम् द्वारकानाथ आपुल्या पंढरीस आला ।। मुगुट विराजे तोच शिरावर मंद-हास्यही तेंच मुखावर तीच रुळे वक्षावर मोहक वैजयंतिमाला ।। पुंडलिकाचें निमित्त […]

सुख दु:खाचे चक्र

सतत फिरे चक्र निसर्गाचे सुख दु:खाचे…१, एका मागूनी दुसरा असती पाठोपाठ येती…२, प्रत्येक वस्तूची छाया असते पाठलाग करीते….३, सुखाचे जाता काही क्षण आनंदी समाधानाची होई गर्दी….४ लगेच अनुभव येतो दु:खाचा काळ जाई निराशेचा…५, पुनरपी येता सारे सुख विसरूनी जातो दु:ख….६, जे होत असते ते बऱ्यासाठी म्हणती समाधाना पोटी…७, समाधान शोधणे हेही सुख त्यातच  जगती अनेक…८   […]

1 355 356 357 358 359 437
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..