हा दुरावा साहवेना (स्मृतिकाव्य)
हा दुरावा साहवेना, संपवी क्षणभर स्वयें एकदा स्वप्नांत तरि ये, एकदा तरि ज़वळ ये ।। कां अशी गेलीस सखये प्रेमबंधन तोडुनी ? कां अशी गेलीस सखये एकला मज सोडुनी ? सात-जन्मीं-साथिचें तें वचन मजला आठवे ।। काय झालें सांग, मजवर एकदम रुसलिस अशी काय आलें सांग, जगतां त्यागुनी गेलिस कशी ? जन्मभरचे पाश तुटणें , चांगलें […]