नवीन लेखन...

पाऊस

दुष्काळानंतरचा पाऊस गारवा देणारा असतो, प्रेयसीने प्रियकराच्या जखमेवर प्रेमाने फुंकर घालावी तसा… तापलेली जमिन पावसाने थंड झाल्यावर आनंदाने हिरवा शालू नेसते, साखरपुड्यात नववधू नेसते तसा… सृष्टीचे हे बदलेले रूप शेतकरी डोळेभरून पाहातो, प्रियकर आपल्या प्रेयसीचे अप्रतीम सौंदर्य चोरून पाहातो तसा… शेतकर्‍याच्या स्वप्नांना पावसात नवीन पालवी फुटून तो आनंदी होतो, प्रेयसीशीच लग्न ठरल्यावर प्रियकर होतो तसा… कवी […]

सर्वात तोच आहे

अगणित तारे जीव जीवाणूं  । अथांग विश्व अणू रेणू  ।। रंगरूप हे नेत्री दिसती  । भिन्न भिन्न राहूनी जगती  ।। रस गंध दरवळे चोहीकडे  । जगण्याचा तो मार्ग सापडे  ।। हे जर आहे रूप ईश्वरी  । बघती त्याला आमुच्या नजरी  ।। सुख दु:ख ही त्याची निर्मिती  । फिरे सदा आमचे भोवती  ।। निराकार निर्गुण,  म्हणती त्याला  […]

अर्जून दुर्योधन कृष्णाकडे

दोघेही येती एकाच वेळीं  श्रीकृष्णाच्या भेटीला, अर्जून उभा चरणाजवळी  दुर्योधन बसे उशाला ।।१।।   प्रथम दर्शनी नेत्र उघडता  नजर गेली अर्जूनावरी, प्रभूकडे तो आला होता  आशीर्वाद त्याचे घेण्यापरी ।।२।।   दुर्योधन दिसे बघता पाठी  अहंकाराने होता भरला, मदत करण्या युद्धासाठी  विनंती करी तो हरिला ।।३।।   युद्धामध्ये भाग न घेई  सांगेन गोष्टी उपदेशाच्या, परि सारे त्याचे […]

मनी प्रेम कर

तारूण्याच्या उंबरठ्यावरी, ज्योत प्रेमाची पेटून जाते, बाह्यांगाचे आकर्षण परि, वयांत त्या भुरळ घालते ।।१।।   प्रेमामधली काव्य कल्पना, शरीर सुखाच्या नजीक ती, किंचित होतां देह दुर्बल त्याच प्रेमाची घृणा वाटती ।।२।।   प्रेम हवे तर प्रेम कर तूं, मूळे असावी अंतर्यामी, मना मधली ओढ खरी ती, येईल अखेर तीच कामीं ।।३।।   अंतर्मनातील प्रेम बंधन, नाते […]

ये ज़वळ बस (स्मृतिकाव्य)

‘ये, जवळ बस’ म्हणालीस तूं, मी बसलोही क्षीण तुझा कर करीं घेउनी सुखावलोही . नव्हतें माहित, ‘उद्या’ परंतू काय व्हायचें होतें ‘उद्या’च येथुन कायमचें तुज दूर ज़ायचें होतें. – – – ( दिवंगत प्रियपत्नी डॉ. स्नेहलता हिच्या आठवणीत ) — सुभाष स. नाईक

शक्य आहे का ते ?

आज हे आकाश मजला, थोटके का भासते  । झेप घेण्या पंख फुटतां, हाती येईल काय ते ?।।१।।   उंच हा गिरीराज देखूनी, शिखर चढावे वाटते  । चार पावले टाकतां क्षणी, चढणे सोपे काय ते ? ।।२।।   अथांग सागर खोल जरी , डूबकी घ्यावी वाटते  । जलतरण कला अवगत होता, सूर मारणें जमेल कां ते? ।।३।।   काव्य […]

कोण हा कलाकार ?

न पोंहचे झेप विचारांची,   टिपण्या त्याचेच सौंदर्य अप्रतीम सृष्टीचा तो कर्ता,   शोधण्या तयासी मन जाय थवेच्या थवे उडत जातां,   पक्षी दिसती आकाशीं विहंगम ते दृष्य भासे,   आनंदूनी टाकती मनासी बघतां संथ नदीकडे,   लय लागूनी जात असे प्रचंड बघूनी धबधबा,   चकीत सारे होत असे ऐटदार तो मयुर पक्षीं,   आकर्षक ते नृत्य दाखवी सप्तरंगाचे इंद्रधनुष्य,   काळजाचा ठाव घेई […]

जगण्याची नाहीं शक्ती (गझल)

जगण्याची नाहीं शक्ती मरण्याची आहे सक्ती ।। कारा जग, मी तडफडतो पण मिळतच नाहीं मुक्ती ।। परमेश्वर साह्य करेना तरि ढळे न माझी भक्ती ।। काळास चकविण्याची मज कळली ना अजुनी युक्ती ।। लढलोही असतो रे, पण हिंमतच मुळी ना रक्तीं ।। नर हतबल भाग्यापुढती मी सार्थ ठरवली उक्ती ।। स्तुति दो शब्दांतच संपे त्यातही असे […]

वेड लावतोस तूं कुणां कुणां !

हे मुरलीधर मनमोहना, वेड लावतोस तूं कुणां कुणां ? //धृ//   तुझ्या भोवती नाचती गौळणी, भान त्या तर गेल्या हरपूनी, थकूनी गेल्या नाच नाचूनी, विसरुनी गेल्या घरदारानां, वेड लावतोस तूं कुणां कुणां ? हे मुरलीधर मनमोहना ।।१।।   रमले सारे गोकूळवासी, पेंद्या, गोंद्या, सख्या, बन्सी, बागडती सारें तव सहवासी, करमत नाही तुजविण त्यांना, वेड लावतोस तू […]

वाढले आजार हल्ली (गझल)

माणसें बेजार हल्ली वाढले आजार हल्ली . देव, गुरु, अध्यात्म, सिद्धी मांडला बाजार हल्ली . धर्म वेदी, माणसें अज म्हणुन हा गोंजार हल्ली . एक नुरला कार्यकर्ता मात्र, नेते फार हल्ली . लोपल्या पर्जन्यधारा आसवांची धार हल्ली . शत्रुची आतां न भीती दोस्त करतो वार हल्ली . माणसा माणूसकीचा सोसवेना भार हल्ली . ‘भक्त‘ म्हणवत, जन […]

1 357 358 359 360 361 437
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..