न मागितलेल्या वेदना
काही बाण खूप खोलवर, जिव्हारी लागतात भरलेल्या भासूनही जखमा विव्हळत रहातात काही क्षण अश्वत्थाम्याची जखम होतात आयुष्य सरल्यावरही वेदनांना जिवंत ठेवतात एकाकीपण झाकायला आपल्या सावल्या पसरत जातात नि शरमेची टांगती शवं सारायला हात तोकडे पडतात हातांनी झाकला तरी चेहेरा स्वतःला खिजवत रहातो स्वत:पासून पळायचं असूनही पाय थिजवून ठेवतो वास्तवाची नग्नता रहाते सारं आभाळ व्यापून ‘सुखी माणसाचा […]