रंग दुनियेचे . . (गझल)
हात जेव्हां हे जळाया लागले रंग दुनियेचे कळाया लागले . ठाकतां संकट, पळाल्या वल्गना पायही मागे पळाया लागले . जग दगा देताच, देती नयनही रोखलें, तरिही गळाया लागले . पाप किंवा पुण्य ना गतजन्मिंचें येथलें येथें फळाया लागलें . शुभ्र वसनें, डाग वर इवलाहि ना आंतुनी पण मन मळाया लागलें . पीठ खाण्यां सज्ज कुत्रे राजसी […]