काव्यानुभव
फळ आज हे मधूर भासते, तपोबलातील अर्क असे, कष्ट सोसले शरिर मनानें, चीज त्याचे झाले दिसे ।।१।। बसत होतो सांज सकाळी, व्यवसाय करण्या नियमाने, यश ना पडले पदरी. पाठ फिरविली नशीबाने ।।२।। निराश मन सदैव राहूनी, मनीं भावना लहरी उठती, शब्दांना आकार देवूनी, लेखणी मधूनी वाहू लागती ।।३।। लिहिता असता भाव बदलले, त्यात गुरफटलो पुरता, छंद […]