म्हणूं नका
लक्षच लागेना कृतीत, करतोहे म्हणुन चुका ! मनस्थिती जाणा, ‘कामातुन गेला’ म्हणूं नका ।। खिन्नपणा असुनही स्मिताचा यत्न स्तुत्य नच कां ? राखा रे सन्मान ज़रा, ‘रडवेला’ म्हणूं नका ।। नयनांचा ओलसर असे पडदा, तो नुरे सुका तरि या विरहार्ता, ‘डोळे भरलेला’ म्हणूं नका ।। अश्रूंचा पाझर हलकासा, दिसत नसे इतुका पण, हळव्याला, ‘धीर मनी धरलेला’ […]