नवीन लेखन...

जीवन आनंद

ह्या जीवनाच्या अस्तित्वाचे,  ध्येय कोणते खरे  । उत्तर याचे कुणा मिळेना, आज पावतो बरे  ।। संतसाधू आणि ज्ञानीजन,  बहूत ते झाले  । समाधानी परि एक मताचे,  उत्तर नाही दिले  ।। खेळखेळणे उड्या मारणे,  अन् खाणे पिणे  । बालपणीच्या आनंदाला,  नव्हते काही उणे  ।। विसरून जाता खेळ उड्या अन् , प्रेम करू लागलो  । यौवनाच्या उंबरठ्यावरी,  बहरून […]

मिळविण्यातील आनंद

आंस राहते सतत मनीं मिळत नसते त्याचे साठी प्रयत्न सारे होत असती हाती नाही ते मिळविण्यापोटीं प्रयत्न्यांत तो आनंद होता धडपड होती, होती शंका मिळविण्याच्या त्या लयीमध्यें जिद्द मनाची आणिक हेका यश मिळते जेव्हां पदरीं धडपड सारी थंडावते ज्याच्या करिता सारे सोशिले त्यातील उर्मी निघून जाते यशांत नाहीं आनंद तेवढा मिळविण्यांत जो दिसून येई कांहीं तरी […]

मुंगी

मग्न राही सतत   आपल्याच कामीं अन्नासाठी तूं    फिरे दाही दिशानी जमवितेस कणकण    एकत्र करुनी दूर द्दष्टीचा स्वभाव    दिला तुज कुणी सुंदर तुझी वास्तूकला   वारुळ केले छान सहस्त्रांच्या संखे     राहतेस आनंदानं कष्ट करण्याचा गुण    दाखवी साऱ्याना कष्टाला पर्याय      नसे ह्या जीवना   — डॉ. भगवान नागापूरकर 9004079850 bknagapurkar@gmail.com

अन विठोबाचे पहिले दर्शन घेतो मुख्यमंत्री

व्हॉटसअॅप वरुन आलेली एक हृदयस्पर्शी कविता. जास्तित जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी येथे पोस्ट केली आहे. केस अर्पण करून कुठे पुण्य मिळते नारळ अर्पण करून कुठे भाग्य उजळते केस अन् नारळ विकुनी होतो व्यापार सोनं- चांदी अर्पण करून कुठे काय मिळते सोने -चांदीच्या दागिन्यांचा होतो लिलाव काय उपयोग सांग मानवा अशा या दान धर्माचा ?? कधी शेतक-याला बियाणं […]

पुण्य संचय करा

ज्या ज्या वेळी येई संकट, धांव घेत असे प्रभूकडे  । संकट निवारण करण्यासाठीं, घालीत होता सांकडे  ।।१।।   चिंतन पूजन करूनी, करीत होता प्रभू सेवा  । लाभत होती त्याची दया, त्याला थोडी केव्हां केव्हां  ।।२।।   संकटी येता करी पूजन, उपयोग होईना त्याचा  । कामी येईल पुण्य , विचार करीतां भविष्याचा  ।।३।।   संचित पुण्य आजवरचे, […]

श्री कृष्ण जन्मी सेवेसाठी स्पर्धा

चालली स्पर्धा साऱ्यांची,  प्रभूची सेवा करण्याची….।।धृ।। निशाराणी संचारी निद्रीत जाई पहारेकरी खट्याळ वारे धावूनी दारे दिली उघडूनी विज चमकूनी आकाशी   मदत होई वसुदेवाची….१ चालली स्पर्धा साऱ्यांची प्रभूची सेवा करण्याची   पावसाच्या पडती सरी पक्षी नाचती तालावरी कोकीळेचे सुरेल गान आनंदाने वातावरण नागराजा फना काढूनी   काळजी घेई नव बाळाची….२ चालली स्पर्धा साऱ्यांची प्रभूची सेवा करण्याची   स्पर्श […]

दृष्टी बदल

नवा चित्रपट बघण्या गेलो,   कुटुंबासह चित्र मंदिरी चित्रगृह ते भरले असतां,   प्रवेश मिळाला कसातरी….१, चित्रपट तो बघत असतां,  आश्चर्य वाटले जल्लोशाचे टाळ्या, शिट्या देवून प्रेक्षक,  कौतूक करी नटनट्यांचे….२ वास्तवतेला सोडूनी,   रटाळपणे वाहत होते, वैताग येवूनी त्या चित्राचा,   सोडून आलो मधेच मी ते….३, घरी येवूनी शांत जाहलो,  आठवू लागलो बालपण अशीच होती छायाचित्रे,  ज्यांत आमचे रमले मन….४ […]

जीवन मृत्यू खेळ

सर्व दिशांनी घेरूनी येतो, मृत्यू तुमचे जवळीं सही सलामत निसटून जाणें, हीच कला आगळी….१, भक्ष्य त्याचे बनून जाणें, चुकत नाही कुणा, काळाची ती भूक असूनी,  माहीत असते सर्वांना….२, अविरत चालू लपंडाव ,  जगण्या मरण्याचा शेवट हा जरी निश्चीत असला,  हक्क तुम्हां खेळण्याचा….३, खेळती काही तन्मयतेने,  रिझविती इतरजणां, खेळामधले नांव करूनी, आदर्श ठरती जीवनां….४   — डॉ. […]

सोड मागणी

मागत होता प्रभूला    हात जोडूनी कांही भक्तिभाव बघूनी त्याचे     मिळत ते जाई एका मागून एक मिळे    मागणी होता त्याची निराश करणे न लगे     इच्छा होता भक्ताची जे जे बघे भोवती       घेतले होते मागुनी कशांत दडले सुख     उमज येईना मनीं देरे बुद्धि देवा मजला    योग्य मागण्यासाठी समाधानी मी होईन      तुझ्या कृपे पोटी ज्ञान झाले गंमतीचे    सांगे सोड […]

1 366 367 368 369 370 437
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..