स्फूर्ती दाता
तुम्ही गेला आणि गेले सुकूनी माझे काव्य, समजूनी आले रूप तुमचे होते जे दिव्य ।।१।। तुमच्या अस्तित्वाने मजला येत असे स्फूर्ती, प्रफुल्लीत ते भाव सारे ओठावर वाहती ।।२।। कोकीळ गाते गाणे जेंव्हां वसंत फुलतो वनी, मोर नाचे तालावरती श्रावण मेघ बघूनी ।।३।। हासत डोलत कळी उमलते प्रात: समयी, दवबिंदूच्या वर्षावाची किमया सारी ।।४।। […]