नवीन लेखन...

कालाय तस्मै नमः

हल्ली एक सगळीकडे – नवीनच फॅड झालंय, भावनांना समाजाच्या – खूप महत्त्व आलंय. कशामुळे दुखावतील त्या – नाही सांगता यायचं , शक्यतो आपण आपलं – सांभाळून बोलायचं. जाती पक्ष नेते – So called आदराची स्थानं, कुणाहिसाठी कडवी होतात – यांची बेताल मनं. दुखावली की चालून येते – झुंड अविचारी अंगावर, सपशेल शरणागतीशिवाय पर्याय – काहीच नसतो […]

पाच बाय दहाची खोली

त्या पाच बाय दहाच्या खोलीत – एक लोखंडी कॉट रहाते, अगदी त्याच खुराड्यात – एक कपाट रहाते, त्यामध्येच अंग चोरुन – चिंचोळी मोरीही रहाते, मोरीशेजारीच वस्तीला – जुनाट टेबल रहाते. राहिल्या जागी मोजक्या – भांडी ट्रंका रहातात. या जुनेऱ्यामध्ये चकचकीत – टीव्ही पण वसतो. फिरणारा पंखा गरमी – खोलीभर फिरवतो. डगडगणाऱ्या खुर्चीवर – श्वास छातीतच कोंडतो. […]

पावित्र्य

सांगु कसे मनांतरीचे अव्यक्त, ते गुज मी तुझ्या साऱ्या आठवांचे क्षण स्मरतो सदैव मी श्वासात या भास तुझा स्वप्नातही जागतो मी छळते मज रात्र सारी विरघळतो तुझ्यात मी जाहलाच सराव आता तुजवीणही जगतो मी घायाळ अंतरीचे उसासे तवस्मृतीत, सावरतो मी नि:शब्दी जरी भावप्रीती जाणतो मौनी पावित्र्य मी — वि.ग.सातपुते ( भावकवी ) 9766544908 रचना क्र.१७५ २१ […]

बाबा

लग्न झालं अन् – ती सासरी निघाली, त्याची मात्र खूप – घालमेल होऊ लागली. काय होतंय नेमकं – त्याला काही कळेना, अस्वस्थपणा जीवाचा – कमी कुठे होईना. खूप वर्षांपूर्वीची ती – आठवण जागी झाली, तशीच एक बारीक कळ – आता हृदयातून गेली. आतली तडफड चेहेऱ्यावर – उमटत नव्हती काही, दुराव्याचे कढ मात्र – फुटत होते तरीही. […]

उपचार सारे

हात अनेक भवती एक काळजाला भिडत नाही नाती झाली उदंड, तरी जिवाभावाची साथ नाही गर्दीचे संमेलन केवढे, पण कोण कुणाला सामील नाही भेटीगाठींचा वर्षाव सारा, आतड्याला कुणाच्या पीळ नाही विलगणारे ओठ अगणित. पण हास्याची लकेर नाही बिलगणाऱ्या शरीरांचा कधी अंत:करणाला स्पर्श नाही शब्दांचा पाऊस भरपूर पण भिजलेला एकही नाही विचारांचा वर्षाव तरीही मनाला स्पर्शून नाही. आण्यांचे […]

चक्र ऋतुंचे

जगायचे ते जगले नाही काही राहीले श्वासही भगवंताचे नाही काही आपुले जन्म, मृत्यु प्रवास ते भ्रमणही आपुले बाहुले, कळसूत्रीचे चक्र ऋतुंचे चालले दशदिशा भारलेल्या नेत्री दृष्टांत रंगलेले भोगणेच संचिताचे या जन्मी लाभलेले पसरूनी दोन्ही बाहु क्षणक्षण ते झेललेले हेच सत्य साक्षात्कारी अस्ताचली सांज रंगले — वि.ग.सातपुते.(भावकवी ) 9766544908 रचना क्र.१७४ २०/७/२०२२

गप्पा निळाईशी

असेच एका सायंकाळी, सहजी पाहिले आकाशी, निरभ्र निळाईमध्ये न्हाऊनी, बोलू म्हटले देवाशी. उलगडलो उघड्या जमिनीवरती, अनं हाताची केली उशी, निरभ्र निळाईमध्ये न्हाऊनी, बोलू म्हटले देवाशी. आंथरलेला होता वरती, मैलोगणती गालीचा , चमचमणारी नक्षी त्यावरी, वापर केला ताऱ्यांचा. रेलायाला बैठकीवरी, मऊशार ढगांची केली उशी, निरभ्र निळाईमध्ये न्हाऊनी, बोलू म्हटले देवाशी. एकेरीवर आलो अनं मी, साद घातली देवाला […]

शेवट असावा असा..

शेवट असावा असा. नुकताच दारात . कवडसा आलेला जसा. झरकन नाहिसा होतो तसा… शेवट असावा असा पहाटे गवतावरचा दवबिंदू असतो जसा. एका क्षणात नाहिसा होतो तसा.. शेवट असावा असा. आळवावरचा थेंब असतो अगदी जसा. मोती मोती म्हणेपर्यंत घरंगळून जातो तसा. शेवट असावा असा. पावसाच्या रेशिम. धाग्यासारखा. ओंजळीत न येताच वाहून जातो तसा.. शेवट असावा असा. प्राजक्ता […]

आधारवड

गारेगार सावलीचा, भला थोरला आधारवड. पारंब्या झुलवत – अलवार कुरवाळणारा. मनसोक्त खेळलोय, अंगाखांद्यावर त्याच्या. गाढ झोपून गेलोय – मांडीवर पाराच्या. उन्हाळा पावसाळा थंडी – सकाळ सायंकाळ, मग्न व्रतस्थासारखा – वावर तिन्हीत्रिकाळ. मोठा झालोय खेळता खेळता, त्याच्याच सावलीत, तो सतत उभाय आम्हाला – आवर्षणापासून वाचवित. आधारवड आता थकलाय, पानापानांतून सुकलाय. मूळ कुडीतुनच पूर्ण – वृद्धत्वाकडे झुकलाय. निखळलेल्या […]

शापित आत्मे

स्वयंप्रेरित, स्वयंप्रेषित हे सदा आपल्या जोषात आभाळओझे घेऊन खांद्यावर धावधावती कैफात नाही साथ कुणाची, नाही कसली सहानुभूती तरीही चिंता जगाची, आसक्तीची करुन सक्ती कुणी वंदा कुणी निंदा, करे कुणी वा वंचना नादावलेल्या कर्मयोग्यांची असे व्रतस्थ आराधना अशक्याचा हव्यास त्यांना, अचूकतेचा ध्यास केवढा सौख्याशी करुन वाकडे, पुकारत स्वत:शी स्वत:चा लढा आत्यंतिकाची अस्वस्थता सततच्या जणू प्रसूतिवेणा अखंड असे […]

1 35 36 37 38 39 437
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..