नवीन लेखन...

जागतिक महिला दिन

झालाही असेल कदाचित जन्म एका स्त्रिचा पुरूषापासून पण विश्वातील तो एक पुरूष सोडला तर समग्र पुरूष जातीला जन्म स्त्रियांनीच दिला… स्त्रिला जन्म देताना पुरूषाला वेदना झाल्या असतील – नसतील ही पण पुरूषांना जन्म देताना स्त्रियांना होणार्‍या वेदना पुरूष वर्षानुवर्षे पाहतच आला… स्त्रियांनी पुरूषांना फक्त जन्मच दिला नाही तर खायला दाणा, राहायला आसरा, प्रेम, जिव्हाळा आणि संस्कारही […]

महाशिवरात्री

शिवापासून वेगळा झालेला जीव पुन्हा शिवात विलीन होण्यापर्यंतचा काळ म्ह्णजे जीवन… पण जीव रमतो जगण्यातील मजा लुटण्यात आणि गुंतून पडतो असंख्य मोहात… शिवाला विसरलेल्या जीवाला पुन्हा शिवाकडे वळविण्यासाठीच कदाचित युगानुयुगे साजरी केली जातेय महाशिवरात्री आपल्या संस्कृतीत… कवी- निलेश बामणे

भक्ष्य

नदीकाठच्या कपारीमध्ये, बेडूक बसला दबा धरूनी, उडणाऱ्या माशीवरते, लक्ष सारे केंद्रीत करूनी ।।१।। नजीक येऊनी त्या माशीचे, भक्ष त्याने करूनी टाकले, परि दुर्दैव त्याचे बघा कसे, सर्पानेही त्यास पकडले ।।२।। बेडूक गिळूनी सर्प चालला, हलके हलके वनामधूनी, झेप मारूनी आकाशी नेले, घारीने त्याला चोंचित धरूनी ।।३।। ‘भक्ष्य बनने’ दुजा करीता, मृत्यूची ही चालते श्रृखंला, जनक असता […]

जाळी

धागा धागा विणून, केली तयार जाळी । गोलाकार नि बहुकोनी घरे, पडली निर निराळी ।।१।। स्थिर सुबक घरे, जसा स्थितप्रज्ञ वाटे । सर्व दिशांचा तणाव, न दिसे कुणा कोठे ।।२।। तुटेल फुटेल तरी, सैलपणा येणे नाही । जर ढिला झालाच तर, जाळी दिसणार नाही ।।३।। जगे तो अभिमानानें, मान ठेवूनीया ताठ । संसारामधील क्लेश, झेलीत होती […]

दु:खाने शिकवले

रंग बदलले ढंग बदलले, साऱ्या जीवनाचे । बदलणाऱ्या परिस्थितीने, तत्व शिकवले जगण्याचे ।।१।। कैफ चढूनी झेपावलो, नभात स्वच्छंदे । यश पायऱ्या चढत असतां, नाचे मनीं आनंदे ।।२।। धुंदीमध्यें असता एका, अर्थ न कळला जीवनाचा । आले संकट दाखवूनी देई, खरा हेतू जगण्याचा ।।३।। दु:खामध्ये होरपळून जाता, धावलो इतरांपाठीं । अनेक दु:खे दिसून येता, झालो अतिशय कष्टी […]

फुलझाडाचे स्वातंत्र

उगवले होते जंगलात ते उंच माळावरी रंग आकषर्क फुलझाडांचे मन प्रसन्न करी ।। जरी होता उग्रवास तयाला मधूरता आगळी खेचित होते सौंदर्याने फुलपांखरे जवळी ।। वनराईचा पुष्कराज तो डोलत होता आनंदे ऐकत होता मान हलवूनी कोकिळेची पदें ।। वर्षा विपूल प्रकाश विपूल आणिक तो वारा स्वच्छंदाचे भाव उमटवित वाढवी स्वैर पसारा ।। कुणीतरी आला वाटसरु तो […]

प्रभूची धांवपळ

चकीत झालो बघूनी, प्रभूला दारावरी, त्रिशूळ घेऊनी हातीं, आला होता जटाधारी ।।१।। क्षणीक थांबूनी दारावरती, गेला तो निघूनी, बहूत वेळ येत राहिला, दार ना ओलांडले त्यांनी ।।२।। कळले नाहीं मजला, ही त्याची रीत, विचार करीता मनी, जाणली मी ही गम्मत ।।३।। उपास तापास करुनी, देह शुद्ध केला, भजन पूजन करुनी, तप मिळाले मजला ।।४।। गुंतले होते […]

समाधानी वृत्ती

कशांत दडले समाधान ते, शोधत असतो सदैव आम्ही, धडपड सारी व्यर्थ होऊनी, प्रयत्न ठरती कुचकामी ।।१।। बाह्य जगातील वस्तू पासूनी, देह मिळवितो सदैव सुख, क्षणीकतेच्या गुणधर्माने, निराशपणाचे राहते दुःख ।।२।। ‘समाधान’ ही वृत्ती असूनी, सुख दुःखातही दिसून येती, चित्त तुमचे जागृत असतां, समाधान ते सदैव मिळते ।।३।। सावधतेने प्रसंग टिपता, समाधान ते येईल हाती, सुख दुःखाला […]

लोभस चांदणे

चंद्र आज एकला नभी उगवला । रात पुनवेची मधूर भासला ।। मेघांचा गालीचा आज नाहीं दिसला । शितल वारा अंगी झोंबू लागला ।। उलटून गेली रात्र मध्यावरती । लुक लुकणारे तारे आतां दिसती ।। पेटल्या गगनीं असंख्य फुलवाती । तीव्र-मंद प्रकाशानें त्या चमकती ।। त्या असंख्यात चंद्रमा एकची सापडे । जो लोभसवाणा म्हणूनी सर्वा आवडे ।। […]

पाषाणाच्या देवा

हादरून गेलो मनात पूरता, ऐकून त्याची करूण कहानी । केवळ एका दु:खी जीवाने, हृदय दाटूनी आणीले पाणी ।।१।। असंख्य सारे जगांत येथे, प्रत्येकाचे दु:ख निराळे । सहन करिल का भार येवढा, ऐकूनी घेता कुणी सगळे ।।२।। सर्व दुखांचा पडता डोंगर, काळीज त्याचे जाईल फाटूनी । कसाही असो निर्दयी कठोर, आघात होता जाईल पिळवटूनी ।।३।। मर्म जाणीले […]

1 370 371 372 373 374 437
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..