नवीन लेखन...

असामान्य व्यक्ती

सामान्यांतून असामान्य निर्मिती, ध्येय असावे खरे, कोळशाच्या खाणीत सांपडती, चमचमणारे हिरे ।।१।। उदार होऊनी निसर्ग देतो, समान संधी सर्वा, परि तेच घेती खेचूनी तिजला, सोडूनी जीवन पर्वा……२, जीवन म्हणजे अमूल्य देणगी, समज असते काहींना व्यर्थ न दवडावे सहजपणें, विचार असे क्षणाक्षणा……३, जीवन कोडे नाहीं उमगले, कुणास आजवरी अर्थ आगळे अन् ध्येय निराळे, काढती आपल्या परी….४, निर्जीव […]

खूप झाली adjustment…

मी असतो online पण ती जाते offline म्हणुन तर विस्कळीत होते माझी line करतो नेहमी तिला hi पण ती करत नाही साधा bye म्हणून बोलतोय करायचा काय आहे free चा Wi-Fi करतो तिच्या photos ना like पण ती नेहमीच करते मला dislike म्हणून म्हणतोय आता करायची काय आहे new bike करतो तिच्या link ला share पण […]

अतिरेकी सरकार

जखमा उरांत माझ्या, आहेत अजूनी ताज्या, शासनकर्त्या नाकर्त्या तू हो आता तरी जागा गेंडयाच्या तव कातडीची तू, कुठवर राखशी नीगा? त्यापरीस ह्या हल्ल्यांचा तू काढ शोधूनी धागा स्फोट मालिका सदाच घडती, मुंबापुरीच्या कुशीत, निद्रीस्त सुरक्षा तुझी, घुसती अतिरेकी वेशीत पूरे जाहले नाटक तुमचे, समिती-चौकशी–खटल्याचे, वरातीमागून धावत येते, घोडे तुमचे नित्याचे जनतेच्या मग पैशावरती, दान वाटिता लाखाचे […]

खारूताई

खारूताई लबाड पाहिलीत का तुम्ही आत्ता होती इथे, लगेच गेली कुठे गोंडेदार शेपटीवाली चालते तुरु तुरु झाडावर चढते सुरु सुरु सुरु पानाआड लपते, लपाछपी खेळते चलाख खारूताई अैटीत बसते मुलांना बघून खुष होते — सुधा नांदेडकर

एक हळव प्रेम

आज आमच्या आजोबांचा काही वेगळाच होता नूर आजीला म्हणती चल जाऊया, फिरायला खूप दूर काठी सोडून हाती घेतला तिचा सुरकुतलेला हात तिच्या इश्श मध्ये कळली, तिची अंतरीची साथ नाना-नानी पार्क सोडून धरली चौपाटीची वाट जूने दिवस आठवले, पाहून झेपावणारी लाट ओलसर वाळूचा बसायला घेतला पाट दुखत नव्हते आता, कंबर-ढोपे-पाठ अहो दात नाहीत तरी घेतले चणे-दाणे चघळायला […]

खरा आस्तिक

नास्तिक असूनी श्रद्धा नव्हती, ईश्वराचे ठायीं विज्ञानाची कास धरुनी ती, भटकत तो जायी // चार पुस्तके वाचूनी त्याचे, तर्कज्ञान वाढले दृष्य अदृष्य तत्वांमधले , भेद जाणवले // नसेल त्याचे आस्तित्व कसे , तर्काला सोडूनी समजूनी ह्याला “अंध विश्वास” , देई फेटाळूनी // आधुनिक होते विचार त्याचे, कलाकार तो होता पृथ्वीवरील घटणाना परि , योग म्हणत होता […]

बिच्चारा नवरा

कांही म्हणा आम्हां नवर्‍यांचा जन्मच वाईट मिडीयासारखा बायको घेते येताजाता बाईट लग्नाआधी बरी वाटायची, साधी आणि भोळी एका गजर्‍यात देखील हिची, खुलायची खळी माझ्या आईला पाहूनही हिच्या गाली पडायची खळी निवड नाही चुकली आपली, वाटायच त्यावेळी, पुढे चित्रच बदलेल सार हे नव्हत मला माहित आम्हां नवर्‍यांचा जन्मच वाईट सप्तपदीपुरतीच माझ्या मागे मागे चालली, नंतर कळलच नाही […]

श्री कृष्णाची भक्ताला मदत

घटना घडली एके दिवशी प्रभू बसले जेवण्या, रुख्मिणी त्यांचे जवळी होती वाढण्या ।।१।। चट्कन उठूनी ताटावरुनी धावत गेले दारीं, क्षणिक थांबूनी तेथे येऊनी बसले पाटावरी ।।२।। प्रश्न पडला रुखमिणीस काय गडबड झाली, श्रीकृष्णाची धावपळ तिजला नाही कळली ।।३।। चौकशी करतां कृष्ण बदले कहाणी एका भक्ताची, हरिनाम मुखी नाचत होता काळजी नव्हती लोकांची ।।४।। वेडा समजोनी त्यासी […]

निवृत्तीची वृती

माझे म्हणूनी जे मी धरले, दूर होई ते मजपासूनी, दूर ही जावूनी खंत न वाटे, घडत असते कसे मनी ।।१।। बहुत वेळ तो घालविला, फुल बाग ती करण्यामध्ये, विविध फुलांची रोपे लावूनी, मनास रमविले आनंदे ।।२।। कौतुकाने बांधी घरकूल, तेच समजूनी ध्येय सारे, कष्ट करूनी मिळवी धन, खर्चिले ते ह्याच उभारे ।।३।। संसार करूनी वंश वाढवी, […]

श्रीरामाची शिवपूजा

हरि हराचे पुजन करतो । दृष्य दिसे बहुत आगळे ।। प्रभूकडूनी प्रभूची सेवा । सर्वजणां ही किमया न कळे ।। शिवलिंगापुढती ध्यान लावी । डोळे मिटूनी प्रभू श्रीराम ।। सुंदर सुबक चित्रामध्ये । व्यक्त होई ह्रदयातील प्रेम ।। श्रीराम प्रभूच्या पूजेवेळीं । आत्मरुप उजळून आले ।। शिवलिंगातील रामस्वरुप । एक होऊनी मग गेले ।। कोण भक्त […]

1 373 374 375 376 377 437
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..