नवीन लेखन...

दर्पण

चित्र दिसते दर्पणी , जसे असेल तसे, धूळ साचता त्यावरी, अस्पष्ट ते होतसे ।।१।। दर्पणा परि निर्मळ मन, बागडते सदैव आनंदी, दूषितपणा येई त्याला, भावविचारांनी कधी कधी ।।२।। निर्मळ ठेवा मन आपले, झटकून द्या लोभ अहंकार, मनाच्या त्या पवित्रपणाने, जीवन होत असे साकार ।।३।। — डॉ. भगवान नागापूरकर संपर्क – ९००४०७९८५० bknagapurkar@gmail.com

साक्षीदार

‘घटना’ जेव्हां घडली अघटित । कुणीही नव्हते शेजारी ।। कां उगाच रुख रुख वाटते । दडपण येवूनी उरीं ।। जाणून बुजून दुर्लक्ष केले । नैतिकतेच्या कल्पनेला ।। एकटाच आहे समजूनी । स्वार्थी भाव मनी आला ।। नीच कृत्य जे घडले हातून । कुणीतरी बघत होता ।। सर्वत्र दिशेनें तो व्यापूनी आहे । हेच सारे सुचवित होता […]

हेवा

पेन्शनची शिदोरी.FDचाही ठेवा जेष्ठ नागरिकांच्या देवा, करती सारे हेवा…. बॅंकेमध्ये ह्यांच्यासाठी, वाढीव व्याज दर रेल्वे,ST तिकीटावर ती, सवलतही फार सरावले आता सारे, सरावले आता सारे खावया हा मावा, जेष्ठ नागरिकांचा हेवा…… पर्यटनच्या ऑफीसांमध्ये, ह्यांच्या दिसती रांगा ह्यांच्या दारी चैतन्याची, उत्साहाची गंगा देशोदेशी फिरुनी येता, देशोदेशी फिरुनी येता मनी येई गारवा, जेष्ठ नागरिकांचा हेवा……. निसटलेले क्षण जगण्याचा, […]

सुदाम्याला ऐश्वर्य

गरीब सुदामा बालमित्र , आला हरीच्या भेटीला, बालपणातील मित्रत्वाची, ओढी मनाला ।।१।। छोटी पिशवी घेवून हाती, पोहे घेतले त्यात, फूल ना फुलाची पाकळी घ्यावी, हीच भावना मनांत ।।२।। काय दिले वहिनींनी मजला, चौकशी केली कृष्णाने, झडप घालूनी पिशवी घेई, खाई पोहे आवडीने ।।३।। बालपणातील अतूट होते, मित्रत्वाचे त्यांचे नाते, मूल्यमापन कसे करावे, उमगले नाही कृष्णाते ।।४।। […]

विधी कर्मांना सोडा

रूद्राक्षाच्या माळा घालूनी, भस्म लाविले सर्वांगाला, वेषभूषा साधू जनाची, शोभूनी दिसली शरीराला ।।१।। खर्ची घातला बहूत वेळ, रूप सजविण्या साधूचे, एक चित्त झाला होता, देहा भोंवती लक्ष तयाचे ।।२।। शरीरांनी जरी निर्मळ होता, चंचल होते मन त्याचे, प्रभू मार्गास महत्त्व देतां, विसरे तोच चरण प्रभूचे ।।३।। विधी कर्मात वेळ दवडता, प्रभू सेवेसी राहील काय ?, देहाच्या […]

काव्यातील गुरु

एकलव्यापरीं शिकलो विद्या, गुरुद्रोणा विना । काव्यामधल्या जाणून घेतल्या, साऱ्या खाणाखुणा ।।१।। शोधू लागलो प्रथम गुरुला, पद्य रचनेसाठीं । कुणी न शिकवी कला श्रेष्ठ ही, राहून माझे पाठी ।।२।। उठत होती भाव तरंगे, अन आकाशी भिडती । शब्दांनी परि पकड न येता, निष्टूनी ती जाती ।।३।। मार्गदर्शक तो भेटत नाही, खंत लागे मना आता । व्याकूळ […]

पुरुषत्व

रस्त्याने चालताना तिच्या मागून ती वार्‍याची झुळूक होऊन माझ्या मेंदूत शिरताच मला तिच्या सौंदर्याची नशा चढून मी ढकलायला लागताच मला एक पुरुष सावरतो पुरुषी अहंकार नाव असलेला… मग शोधू लागतो माझ्यातील पुरूष तिच्या सौंदर्यात दडलेल्या उणिवा आणि तिच्या कपडयांवर जागोजागी पडलेल्या छिद्रांना ज्या छिद्रांतून तो पाहतो तिला संपूर्ण त्याला ह्वे तसे, मी तिला कधीच विचारत नाही […]

खोटा शिक्का

कसे आले कुणास ठाऊक नाणे माझे हाती गर्दीमधल्या कुण्या प्रसंगी खोटा शिक्का येती प्रयत्न सारे व्यर्थ जाऊनी कुणी घेईना त्यातें कसा आला नशिबी निराशा मनी येते अंध व्यक्तीचे स्टॉल बघूनी तिकीट एक घेतले लॉटरीसाठी घातला रुपया अंधाचे हाती दिले मनी चरकलो शब्द ऐकूनी त्या अंध व्यक्तीचे नशीब तुमचे थोर असूनी यश येईल तिकीटाचे केवळ त्याने स्पर्श […]

चेतना

ओठावरले गीत माझे, आज कसे हे रुकून गेले, गीतामधले शब्द रूकता, ओठ कसे हे सुकून गेले….।। धृ ।। आकाशातील थवे पाहूनी, चंचल माझी नजर झाली, भिर भिरणाऱ्या दृष्टी पटावर असंख्य चित्रे उमटूनी गेली । चित्र बघूनी जे मन नाचे, पाषाणा परी स्थिर कां झाले….१ ओठावरले गीत माझे आज कसे हे रुकून गेले गीतामधले शब्द रूकता ओठ […]

कॅालेज कट्टा

आजच्या कॅालेजियन्सचा ट्रेंडच आगळा त्यांचं कॅालेज जीवन म्हणजे, एक अजब सोहळा फ्रेंडशिप डे, ट्रेडिशनल डे, रोझ डे, उरलाच वेळ तर स्टडी डे कॉलेजात निवडणूकांचे, वाजवीपेक्षा प्रस्थ, युवामहोत्सव, नाटयमहोत्सव, घरच्या कार्यापेक्षा जास्त बापाच्या पॉकेटमनीवर खर्चाची मदार, पोरींना घेऊन पोरं बाईकवर स्वार SMS चा चाळा, फॅशनचा लळा, हेच ह्यांचं रुटीन अड्डयासाठी कॉलेजचा कट्टा आणि कॅटीन नावापुरता असतो ह्यांचा, वर्गामध्ये अॅटेंडन्स, […]

1 375 376 377 378 379 437
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..