नवीन लेखन...

सद्‌गुरु

भटकत जातो वाटसरू , जंगलामधील अज्ञात स्थळी, आंस लागते जाण्याकरिता, दूरवरच्या दिव्या जवळी ।।१।। मार्ग जाण्याचे अज्ञात असूनी, निराशेने वेळ दवडितो, ध्येय दिसत असून देखील, मार्गामुळे अडून पडतो ।।२।। अज्ञानाच्या अंधारात , शोधत असतो असेच त्याला मार्गदर्शन सद्‌गुरुचे, न लाभता ध्येय मिळे कुणाला ।।३।। वाट दाखवी सद्‌गुरु , प्रभूचरणी जाण्याचा, दुवा साधतो आमच्यामध्ये, त्यात एकरूप होण्याचा […]

आत्मविश्वास

आत्मविश्वास जागृत ठेवूनी, कार्य घेवूनी तडीस नेती । कधीही न राही अवलंबूनी, मदतीसाठी दूजा वरती ।। ईश्वर करीतो मदत तयांना, मदत करी जे आपले आपण । आपल्यातची तो ईश्वर आहे, असते याची जयास जाण ।। विश्वासाने हुरूप येई, जागृत करीती अंतर चेतना । लक्ष्य सारे केंद्रीत होता, यश चमकते प्रयत्नांना ।। डॉ. भगवान नागापूरकर संपर्क – […]

भावशक्तीची देणगी

भावशक्तीची देत देणगी, उपकार तुझे झाले, करण्यास तव जवळीक, कामास तेच आले ।।१।। जिंकून घेई राधा तुजला, उत्कठ करुनी प्रेम, उचंबळून त्या भावना, साधियले तेच कर्म ।।२।। भक्तीभावाची करीता बात, ती तर असे आगळी, पावन करण्या धाऊन जाती, सर्व संत मंडळी ।।३।। भजनांत मिरा रंगली, ध्यास तुझा घेऊन, नाचत गांत राहिली, केले तुज पावन ।।४।। दया […]

वेळेची ढिलाई , काळाची किमया

हपालेल्या निष्ठूर काळा, समाधानी तू कसा होशील, बळी घेण्याचे सत्र तुझे ते, केंव्हां बरे तू थांबवशील ? ।।१।। नित्य तुला भक्ष्य लागते, वेध घेई टिपूनी त्याचा, मिस्कीलतेने हासत जातो, गर्व होई स्वकृत्याचा ।।२।। अवचित कशी ही भूक वाढली, मात करूनी त्या वेळेवरी, सूडानें पेटूनी जावूनी, बळी घेतले गरीबांचे परी ।।३।। काळ येई परि वेळ न आली, […]

सासरी जाताना

हास्यमुखाने निरोप दे ग, प्रेमाने भरला विसरावी मी ओढ येथली, जाता सासरला…. ।। धृ ।। खूप दिले तू प्रेम आजवरी, सदैव ठेवीत पदर शिरी, पंखांना परि शक्ती देवूनी, सांग मला ग घेण्या भरारी सैल कर तू पाश आपला…१, हास्य मुखाने निरोप दे ग प्रेमाने भरला, संसारातील धडे देवूनी, केलीस तयार कष्ट घेवूनी कुठे लोपला आज विश्वास […]

आईचे ऋण

मूर्तिमंत वाटे देवी लक्ष्मी प्रेमळ स्वरूप माझे आई धन्य जहलो जन्म मिळूनी उदरामाजी तुझिया ठायी प्रेमाचा तो सागर देखिला तुझ्याच ह्रदयाजवळी जावूनी निकटपणाचा आनंद घेत नऊ मास मी उदरी राहुनी दुग्धामृत पाजून मजला वाढवी अंकुर काळजीने घास भरवण्या काढून ठेवी उपाशी राहून आनंदाने निद्रा न लागे तुजला तेंव्हा आजारी जेंव्हा मी पडलो पाणी दिसले तुझ्या नयनी […]

बालपण

“देवबाप्पा” देव्हार्‍यांत तू, नुसताच असतोस ना बसून ? मग माझी ‘हरवलेली’ गोष्ट तेवढी, दे ना रे शोधून | अरे शोधून शोधून, मी गेलोय थकून, भाऊ नाही, बहीण नाही, कोण येईल धावून ? शाळा आणि ट्यूशनमध्ये, पार गेलोय पिचून, नंबरासाठी अभ्यासही करावा लागतो घोकून | आई बाबां साठी एखाद्या, छंदवर्गाला बसतो जाऊन, मग दोस्तांसाठी खेळायला, सांग वेळ […]

परमार्थ व संसार आहेत एकच

उपास तापास करुनी, शिणवित होतो देहाला, भजन पूजन करुनी, पूजीत होतो देवाला । कथा कीर्तनें ऐकूनी, पुराण मी जाणिले, माळ जप जपूनी, प्रभू नामस्मरण केले । वेचूनी सुमनें सुंदर, वाही प्रभूचे चरणीं, फुलांचे गुंफूनी हार, अर्पण केले कंठमणीं । जाऊनी तीर्थ यात्रेत, दर्शन घेतले तीर्थांचे, प्रसिद्ध देवालयांत, चरण स्पर्षिले मूर्तीचे । मनामध्यें ठेऊन शांती, मूल्यमापन केले […]

Evergreen दादर

लाडाचं कोडाचं आमचं evergreen ‘दादर’ आमच्यासाठी तर ते जणू Godfather | दादर म्हणजे मुंबईच्या ‘पाठीचा कणा’ , टिकून आहे तिथे अजून ‘मराठीबाणा’ | उच्च वर्गिय, उच्च शिक्षितांचा डौल इथला देखणा, मध्यमवर्गीय चाळसंस्कृतीने जपल्यात पाऊलखुणा | ‘शिवाजीपार्क’ म्हणजे आमच्या दादरची ‘जान’ शिवाजीमंदिर, प्लाझा, आमच्या दादरची ‘शान’ | मध्य पश्र्चिम रेल्वेचा ‘केंद्रबिंदू’ दादर दादर T.T., रानडेरोड, चौपाटीचा आम्हां […]

निरोगी देही नामस्मरण

निरोगी असतां तुम्ही, नामस्मरण करा प्रभूचे, ठेवू नका उद्या करीता, महत्व जाणा वेळेचे ।।१।। शरिराच्या नसता व्याधी, राहू शकता आनंदी, आनंदातच होऊ शकते, चित्त एकाग्र ते ।।२।। व्याधीने जरजर होता , चित्त होई अस्थीर, स्थिरतेतत दडला ईश्वर, जाणता येतो होऊनी स्थीर ।।३।। डॉ. भगवान नागापूरकर संपर्क – ९००४०७९८५० bknagapurkar@gmail.com

1 376 377 378 379 380 437
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..