हव्यास
रुसवे फुगवे, तंटे बखेडे हवे कशास लढाई झगडे अतीतटीचे हे हेवेदावे आत्यंतिक द्वेषाचा सोस कशाला? ।। आभाळाच्या मुक्ततेला नाही बंध देवाच्या मायेला ना बंधाचा गंध भिंतीआडच्या कृत्रिम जगाचा तुम्हाआम्हाला मग ध्यास कशाला ॥ जमिनीच्या हक्काच्या तुकड्याला कुंपणात जोखण्याचे ध्येय आम्हाला मुक्त हवा करुन कलुषित या छपराखाली कोंडला श्वास कशाला ॥ आयुष्याची वरात ही रिकामहाती घर भरण्याची […]