नवीन लेखन...

ईश अस्तित्वाची ओढ

उंच उंच जावूनी झाडे चुंबीत होती गगनाला । चंद्र चांदणे, भव्य पर्वत आणिक नदी नाला ।। किती आनंद तो मनी जहाला बघूनी निसर्ग शोभा । गुंग होऊनी नाचू लागलो सुटला चित्त ताबा ।। सुंदर वाटे रूप आपले बिंब बघता दर्पणी । पोंच मिळते समाधानाची केवळ अंतर्मनातूनी ।। पूजा करीता तल्लीन होई मूर्ती बघूनी देवाची । शक्तीमान […]

नातं

रेशमाच्या लडीसारखे, नात्याचे पदर, प्रत्येक नात्याचा वेगळा आदर आईच्या गर्भात नात्याची रुजवात, जन्माला आल्यावर गुंफायला सुरुवात भावनांच्या धाग्यात गुंफली जातात नाती, नात्यांच्या गोफात, ऋणानुबंधाच्या गाठी आयुष्याच्या प्रत्येक, वळणावर एकेक नात नव जुळत असतं, जन्मभराच्या प्रवासात, ते आपली सोबत करतं म्हणून तळहाताच्या फोडासारख, जपाव लागत नात, अन् कळीसारख अलवार, फुलवाव ते लागत नात्यामध्ये श्रेष्ठ, माणूसकीच नातं, गरीब- […]

इतरांतील लाचारी बघे

शक्तीच्या जोरावरती, बघतो इतरांत लाचारी विसरून जातो वेड्या, स्वत:तील न्यूनता खरी ….।।धृ।। पैसे ओढती खोऱ्यानें, परि शरीर भरले रोगानें श्रीमंतीत वाढली कांहीं, गरिबाची लाचारी पाही विसरून देह दुर्बलता, धनाचा अहंकार धरी…१ शक्तीच्या जोरवरती बघतो इतरांत लाचारी शरीर संपदा मिळे, परि अडते पैशामुळे देहाचा ताठा फार, इतरां तुच्छ लेखणार विवंचना ती पैशाची, विसरे शरीर सौख्यापरि….२ शक्तीच्या जोरावरती […]

मैत्री

रक्ताच्या नात्याहूनही आगळी, ह्या नात्याची किमया, ना कोमेजे सुगंधीत ह्या मैत्र फुलाची काया | दु;ख-संकटी सदा पाठीशी,मैत्रीची छाया, मैत्रीसारखी जगी नाही, धन-संपदा-माया | मैत्रीत नाही वजाबाकी, अन् नाही भागाकार, नफा-तोटाही नसे त्यामधी, नच असे व्यवहार | जात-पात ना वय जाणिते, निरपेक्ष-निर्मळ मैत्री, शब्दाविणही मुक्त भावना, दिसून येते नेत्री | विश्वासाने विसावण्याचा, खांदा एक मैत्रीचा, निर्णयासाठी कधी […]

कर्तृत्वाचे कल्पतरू

जीवन गंगा वहाते , फुलवित सारी जीवने । पडेल प्रवाहीं कुणी, लागते त्याला वाहणे ।।१।। काही काळ वाहतो देह, डुबून जाणे अंतीम, कसा वाहतो केंव्हा डुबतो, प्रवाही वेगाचे हे काम ।।२।। बुडूनी जाती देह प्रवाही, कर्मे आतील तरंगती । वाहत वाहत नदी किनारी, स्थीर होऊन काठी राहती ।।३।। देह क्षणाचा जरी, कर्मे राहती निरंतर । कर्तृत्वाच्या […]

मेरा भारत महान

‘देशा तुझीया तिरंग्याचा सार्थ आम्हां ‘अभिमान’ गर्वाने आम्ही सारे म्हणतो, मेरा भारत महान | स्वातंत्र्याचे ‘सेनानी’ अन क्रांतिवीरांना सलाम संग्रामिच्या शूर लढवय्या महिलांनाही प्रणाम | प्राण देऊनी त्यांनीदिधले, ‘स्वातंत्र्याचे’ दान, त्यावेळीच्या राज्यकर्त्यांनी ठेविला तयांचा मान | पण पवित्र देशा, कणखर देशा, सोन्याच्या देशा, काय जाहली बघ तुझी ही, आज अशी ‘दूर्दशा’ | कैसे जडले तुजला देशा […]

पाऊस

अवेळी पाऊस पडला लक्षण काही चांगला नाही | पाऊस म्हणाला माझं की तुमचं ते मला कळत नाही || १ || प्रदूषणाच्या मार्‍याने मी वैतागलोय पुरता निसर्गाला आव्हान देवून माणूस ठाकला उभा | निसर्ग म्हणतो थांब बेट्या ठेवणार नाही एकही जागा || २ || विज्ञनाच्या उंटावरचा तू अति शहाणा | मडके फोडायच्याऐवजी म्हणशील मानच कापा || ३ […]

बागेतल्या तारका

बागेमधला निसर्ग सारा टिपत होतो मी रात्र पडूनी चंद्र आकाशी बाग झाली रिकामी १ बाकावरती बसून एकटा मोजत होतो तारे लुकलुकणारा प्रकाश तो अंक चुकवी सारे २ अगणित बघुनी संख्यावरी प्रसन्न झाले मन किती वेळ तो निघूनी गेला राहिले नाहीं भान ३ शितलेतेच्या वातावरणीं शांत झोप लागली नयन उघडतां बघितले मी पहांट ती झाली ४ गेल्या […]

निसर्गाची आनंदासाठी मदत

कसे मानूं उपकार निसर्गा तूझे मी उघडोनी जीवन द्वार आलास तूं कामी तुझ्या मोरानें दाखविले नृत्य राघूच्या वाणीनें शिकविले सत्य कोकीळेचे गान सप्तसुरांच्या लहरी चित्रकलेचे ज्ञान इंद्रधनुष्या परि मुंग्याची वारुळे दाखवी वास्तूकला कोळ्याची जाळे शिकवी हस्तकला घारीची भरारी स्वछंद केले मनां मैनेच्या उदरीं जाणला प्रेमळपणा विजेची चपळता चंचल बनवी धबधब्याची प्रचंडता श्रेष्ठत्व जाणवी निसर्गातील विवीधता देई […]

एक्सेंज ऑफर (Exchange Offer)

ऐलमा पैलमा गणेश देवा माझा नवरा बदलून दे, करीन तुझी सेवा जन्मोजन्मी कसले, एका जन्मी झाले बोsssर मी नाही गुंडाळायची, वडाला आता दोsssर हरतालकेचा उपासही नाही करणार ऐलमा पैलमा गणेश देवा……. सांगते ऐका तुमचा मी, कां करते धावा संसाराला आता माझ्या, वर्ष झाली तेरा नव्या नवलाईचे वाजले की बारा, नवरा कशा-कशामध्ये लक्ष देखील घालेना, संसाराचा गाडा […]

1 378 379 380 381 382 437
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..