नवीन लेखन...

कल्पकतेमुळे निराशा

निराशेचे बीज पेरतो, आम्हीच आमच्या गुणानें, विचारांना ताण देवूनी, जगा पाही त्याच दिशेने ।।१।। जाणूनी ईश्वरी स्वरूप, प्रतिमा ती मनीं बसवी, धडपड चालते सतत, तशीच प्रतीमा दिसावी ।।२।। तपसाधना ती बघूनी, कित्येकदा मिळे दर्शन, परि केवळ अज्ञानाने, न होई त्याचे अवलोकन ।।३।। सभोवतालच्या वस्तूंमध्यें, जाण तयाची येते, निसर्ग रम्य सौंदर्यात, भावना तशी उमटते ।।४।। अस्तित्वाची जाणीव […]

पर्णहिन

जीवनभर घासुन घेतल्यावर आता म्हणता चंदन आहे | दूर व्हा दष़्टांनो, तुम्हाला माझं वंदन आहे || १ || आता नाही मला कधी चंदन व्हायचं | सहाणच होईन बरी मला नाही झिजायचं || २ || एक एक पान काढलंत फांदी सहित ओरबाडून | व़क्ष झाला पर्णहिन तेव्हा चित्र काढता रेखाटून || ३ || आता कुठला राग नाही […]

मन

मन कुठे असत, कस ते दिसत कधी कळलच नाही कुणा, मात्र पावलोपावली जाणवतात, त्याच्या अस्तित्वाच्या खुणा ! मन इतक मोठ, कि आभाळ त्यात माईना, मनाच्या गाभार्‍यांत अगणित भावना ! कडू-गोड आठवणींचा, मन एक खजिना, भावनांच्या प्रतिमेचा तो सुंदर आईना ! चिंता-भिती-संशयाचा मनी सतत पिंगा भल्याबुर्‍या विचारांचा तिथे भारी दंगा ! मन जस कांही एखाद हटवादी पोर […]

राजमाता कैकयी

अकारण कां नांवे ठेवता सदैव कैकयीला । चित्त देवूनी समजूनी घ्या तुम्ही राजमातेला ।।धृ।। जेव्हां दशरथ युद्धास जाई । कैकयी त्याच्या सेवेत राही ।। राजनीति अन् युद्धनीति ही । अवगत झाली सारी तिजला ।।१।। चित्त देवूनी समजूनी घ्या तुम्हीं राजमातेला नजीकच्या त्या देशामधूनी । रावणादी असुरी शक्ती वाढूनी ।। सामान्य जनाला जर्जर करुनी । हा हाः […]

शून्याचे गणित

समजण आणि असणं याच्यात तिनशे साठ अंशाचा कोन होतो त्यांच्या समीकरणातून माणूस शून्यात जाऊन पोहचतो || कर्तबगारीच्या जमेतून प्रौ़ढीची वजाबाकी करतो त्यावेळी माणूस परत शून्याकडेच वळतो || सत्कर्माच्या गुणाकराला अनितीने भागतो त्यावेळी माणूस परत शून्याकडे वळतो || हरिस्मरणाचे बीजगणीत श्रध्देने सोडवत जातो त्यावेळीही माणूस शून्याकडे जाऊन पोहचतो || — चंदाराणी कोंडाळकर

दयेची बरसात

समर्थ नाहीं कुणी, जाणून घेण्या प्रभूला, थोटके पडतो सारे, घेण्यास त्याच्या दयेला ।।१।। बरसत असे दया, प्रचंड त्या वेगाने, दुर्दैवी असूनी आम्हीं, झेलतो फाटक्या झोळीने ।।२।। असीम होते कृपा, पात्र नसूनी कुणी, तो बरसत राही सतत, परि आहे सारे अज्ञानी ।।३।। दयेच्या तो प्रवाह, वाहात राही नदीसारखा, डुबती कांहीं त्यांत, परि न दिसे अनेकां ।।४।। नशीब […]

देह बंधन – मुक्ती

बंधन मुक्तीसाठीं असतां, बंधनात ते पाडी कर्मफळाचे एक अंग ते, टिपे दुसरे बाकी ।।१।। साध्य करण्या जीवन ध्येय, देह लागतो साधन म्हणूनी, सद्उपयोग करूनी घेतां, साध्य होईल हे घ्या जाणूनी ।।२।। हिशोब तुमचा चुकून जाता, तोच देह बनतो मारक, विनाश करीतो मागें लागतां, मिळविण्यास ते ऐहिक सुख ।।३।। बंधन पडते आत्म्याभोंवती, शरिरांतल्या वासने पायी, वासनेच्या आहारी […]

दैवी देणगी

लुळा पांगळा बसूनी एकटा, गाई सुंदर गाणे । आवाजातील मधूरता, शिकवी त्याला जगणे ।।१।। जगतो देह कशासाठी, हातपाय असता पांगळे । मरण नसता आपले हाती, जगणे हे आले ।।२।। लुळा असला देह जरी, मन सुदृढ होते । जगण्यासाठी सदैव त्याला, उभारी देत होते ।।३।। गीत ऐकता जमे भोवती, रसिक जन सारे । नभास भिडता सूर-ताना, शब्द […]

इ-मेल ( ऑडिओ कविता)

Dear Aai-Baba, Via email, तुमच्याशी वाटतं, Chat होईल perfect deny नका करू, please करा accept तुमच्या बद्दलचं प्रेम, कर्तव्य, जबाबदारी, नका समजू मी टाकलंय trash मध्ये, safe आहे सारं मनाच्या, document आणि draft मध्ये तुमची शिकवण, तुमचा उपदेश, हे तर anti-virus माझ्यासाठी, download केलेत माझ्या, अनुभवांच्या Network साठी आणि हो, तुमचा एकही Message, मी केला नाही […]

अहं ब्रह्मास्मि

एके काळीं हवे होते, मजलाच सारे कांहीं आज दुजाला मिळतां आनंद मनास होई माझ्यातील ‘मी ‘ पणानें विसरलो सारे जग तुझ्यामध्येंही ‘ मी ‘ आहे, जाण येई कशी मग जेंव्हा उलगडा झाला साऱ्या मध्ये असतो ‘मी’ आदर वाटू लागला, जाणता ‘अहं ब्रह्मास्मि’ डॉ. भगवान नागापूरकर संपर्क – ९००४०७९८५० bknagapurkar@gmail.com

1 379 380 381 382 383 437
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..