महती मातीची
पायासाठी चप्पल की चपलेसाठी पाय हेच मी विसरले | माती लागू नये पायाला म्हणून मी ते वेष्टिले || १ || चमचमणार्या लखलखणार्या आभाळाला भाळले | अन्न, वस्त्र, निवारा देणार्या मातीला मी विसरले || २ || या मातीचा स्पर्श नको म्हणून मी स्वत:ला जपले | त्या मंगळाने त्या चंद्राने मलाच दूर फेकले || ३ || त्यावेळी कळाली […]