नवीन लेखन...

प्रभू नामस्मरण

नाम घ्या हो तुम्ही, प्रभूचे सतत नामस्मरण , असू घ्या मुखांत …१ काय सांगावी, नामाची थोरवी दगडही जेथे, तरंगून जाई…२ रोम रोमामध्यें, प्रभूचा संसार बनून कवच, रक्षती शरिर…३ नामाची लयता, मन गुंतवून एक होतां चित्त, जाई आनंदून…४ अंतीम ध्येय, ईश समर्पण नामानी साधती, प्रभू सर्वजण…५ डॉ. भगवान नागापूरकर संपर्क – ९००४०७९८५० bknagapurkar@gmail.com

वस्तूतील आनंद

आनंद दडला वस्तूमध्यें, सुप्त अशा त्या स्थितीत असे सहवासाने आकर्षण ते, होऊन बाहेरी येत दिसे….१ प्रेम वाटते हर वस्तूचे, केवळ त्यातील आनंदाने बाहेर येता नाते जमते, आपुलकीचे पडून बंधने…२ तोच लूटावा आनंद सदैव, अंवती भंवती वस्तूतला दूर न जाता दिसले तुम्हां, आनंदच भोवती जमला…३ जेव्हा कुणीतरी म्हणती, ईश्वर आहे अणू रेणूत वस्तूमधील आनंद बघतां हेच तत्त्व […]

मराठी माणूस

मराठी माणसाची रित लय भारी त्याच्या वागण्याची रितच कांही न्यारी ……..कुणी म्हणतसे …….त्याला खेकडा ………तर कुणी म्हणे ……..हा अपुला बापडा करीतसे गोष्टी फार मोठ्या मोठ्या धाव असे कुंपनापर्यंत फार छोट्या छोट्या ……….व्यवहार करताना ……….भावनेला तो मध्येमध्ये आणि ……….फायद्याच्या गोष्टींवर ……….सोडून देई पाणी भावना जेव्हा आड येई तेव्हा पैसा त्याचा जाई पैशाला पैसा खेचतो याची जाण त्याला […]

उभारी

कोपऱ्यांत तो पडला होता, शरिर जर्जर होऊन जरी झाला हतबल देह, सदैव उत्साही त्याचे मन…१, झगडा देवूनी आयुष्याशीं, जीवनाचे घरकूल बांधले सुख दु:खाच्या विटा चढवूनी, त्याग श्रमाचे लिंपन केले…२, कर्तृत्वाचे शब्द उमटती, घरकूलाच्या भिंती मधूनी जगण्यासाठी उभारी देती, इच्छा शक्तीस जागवूनी…३, गतकाळाच्या आठवणी त्या, जगण्याचा तो ठेवा बनला सार्थकतेच्या जाणीवेनें, अंत दशेतील क्लेश विसरला…४ डॉ. भगवान […]

पुनर्जन्म

संघर्षाची बिजें जळतील, जाणतां तत्व पुनर्जन्माचे । आपसांमधील हेवे-दावे, मिटून जातील कायमचे ।।१।। फिरत असते चक्र भोवती, स्वार्थीपणाचे भाव आणिते । त्यांनाच मिळावे सारे काही, जाणता स्वरक्ताचे नाते ।।२।। उगम झाला जाती धर्माचा, स्वार्थीपणाच्या याच कल्पनी । वाटीत सुटतो प्रेम तयांना, केवळ सारे आपले समजूनी ।।३।। कन्या जेव्हां सासरीं जाते, नाती-गोती नवीन बनती । वाटत होते […]

शुद्धतेत वसे ईश्वर

खिन्न मनानें बसला होता, उन्हांत एका खडकावरी । डबके घाण पाण्याचे, वातावरण दुषित करी ।। किड्या-मुंग्यांचे वारूळ तेथें, आणिक पडला काडी कचरा । नजिक येईना वाटसरूं कुणी, बघूनी सारा गालिच्छ पसारा ।। सोडून देऊनी निवारा , नदीकांठच्या शिखरीं गेला । निर्मळ करूनी जागा, आश्रम त्याने एक बांधला ।। बाग फुलवूनी सुंदर तेथें फळा फुलांना येई बहर […]

ईश्वरी गुप्तधन

होता एक गरीब बिचारा । किडूक मिडूक ते जगण्या चारा ।। कौलारु जुनी पडवी निवारा । जन्म दरिद्री दिसे पसारा ।। परिस्थितीनें गेला गंजूनी । आर्थिक विवंचना पाठी लागूनी ।। शरीर जर्जर झाले रोगांनी । जगण्याची आशा उरे न मनीं ।। अवचित घटना एके दिनीं । धन सापडे जमिनीतूनी ।। मोहरांचा तो होता रांजण । गेले […]

अवमूल्यन

उत्साहाने करित होता, सारे कांहीं इतरांसाठी क्षीण होवूनी जाता शरीर, आधार तयाला झाली काठी…१, धनाचा तो प्रवाह वाहतां, गंगाजळीचे पाणी पाजले दुजाकरिता त्याग करूनी, समाधानी ते इतरा केले….२, धन संपत्तीचे झरे आटतां, प्रेमळपणाचे शब्द राहीले कालक्रमणाच्या ओघामधल्या, दुर्बलतेस कुणी न जाणले…३, अपेक्षा ती सदैव असते, मिळत रहावा सहयोग अवमूल्यन ते केले जाते, दुर्लक्ष करूनी दुर्बल अंग…४ […]

तमोगुण

राज्य तमाचे येथें बाह्य जगावरती, म्हणून दिसे आम्हां, विध्वंसक प्रवृती ।।१।। नाश करण्यासाठीं शक्तीच हवी येथे, हेच रुप शिवाचे, समजण्या अवघड जाते ।।२।। जागा करु देई, नविन घटनांना, चक्र कसे चालेल, न मिटवता त्यांना ।।३।। डॉ. भगवान नागापूरकर संपर्क – ९००४०७९८५० bknagapurkar@gmail.com

चुकीचे तर्क

मोठ-मोठ्याने आरडत ओरडत, स्वत:शीच बोलत होता विचार जरी गतिमान होते, विषय तोच तो घोळत होता…..१ तऱ्हेवाईक बघूनी वागणे, खुळा त्याला समजत होते वेडेपणाचा प्रकार समजूनी, दुर्लक्ष्य त्याजकडे करीत होते…२ वृक्षाखाली बसूनी एकटा, डोळे मिटूनी शांत दिसला त्याच विषयाचा विचार मनी, चक्र गतीने घोळू लागला…३ बाह्यांगाची बघूनी शांतता, ज्ञानी त्यास समजू लागले मतप्रदर्शनी तर्क आधार, चुकीचे घेणारे […]

1 385 386 387 388 389 437
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..