नवीन लेखन...

सुखाची मोहमाया

तप्त लोखंडात, लपली ती आग दिसे लाल लाल, जाळी सर्व भाग…१, सुंदर फूलात, सुंगध तो छान अवती भवती काटे, ते कठीण…२, विजेची ती तार, प्रकाशी दिव्याला, झटका तो देई, स्पर्श होता तिला..३, सुखाच्या पाठीशीं, असे दुःख छाया न दिसे ती आम्हा, असे मोह माया…४ डॉ. भगवान नागापूरकर संपर्क – ९००४०७९८५० bknagapurkar@gmail.com

आत्मा हाच ईश्वर

आत्म्याला ओढ असते ईश्वराच्या मिलनाची जाण सदैव राहते प्रभुमय स्वरुपाची ।।१।। अंशात्मक भाग असे आत्मा हा परमात्म्याचा उत्कंठ ते आकर्षण गुणस्वभाव तो त्याचा ।।२।। आत्म्यास पडले असे बंधन ते शरीराचे जीवन कार्ये करुनी प्रयत्न करी मुक्तीचे ।।३।। मुक्त होई त्या क्षणीं अनंतात समावतो परमेश्वरि रुपांत विलीन होऊन जातो ।।४।। आत्मा मुक्त होत असे देहकर्म फळावर चांगले […]

खेळण्या नसे पर्याय

दु:खाचे तूं देवूनी चटके, सत्वपरिक्षा ही बघतोस प्रतिकूल ती स्थिती करूनी, झगडत आम्हां ठेवतोस… १ खेळामधली रंगत न्यारी, खेळ खेळणे चुके कुणा खेळातूनि अंग काढतां, जगण्याच्या मिटतील खुणा…२ खेळगडी तो असूनी तुम्हीं, मैदानासम विश्व भासते तन्मयतेनें खेळत असतां, खचितच यश तुम्हा येते…३ विना खेळण्या पर्याय नसे, एक चित्त ते करूनी खेळा बसू नका हतबल होवूनी, गमवाल […]

इंद्रियें सेवकासम

खिडकीमधूनी टिपत होतो बाह्य जगाचे द्दष्य आगळे लोभसवाणें चित्र बघण्या आतूर होऊन गेले डोळे नयन नव्हते बघत ते बघत होतो मीच खरा खिडकीसम नयनातूनी द्दष्य उमटते आंत जरा संगीताचे सूर निनादूनी लहरी त्यांच्या उठताती कर्णा मधल्या पडद्यायोगे आनंद मजला देवून जाती मालक असूनी मी देहाचा इंद्रिये सारी असती सेवक ती केवळ साधने असूनी आंतील ‘मीच’ असे […]

अंतर्मनातील आवाज

ध्यान लागतां डुबूनी जाई अंतर्यामीं बाह्य जगाला त्याच क्षणीं विसरतो मी ।।१।। चित्त सारे केंद्रित होई आत्म्याकडे दुर्लक्ष्य होऊनी देहाचा विसर पडे ।।२।। संवाद होता आत्म्याशी विचारा सारे आतून कांहीं ।।३।। आंतल्या आवाजांत सत्याचा भाव भविष्यातील घटणाचा त्यासी ठाव ।।४।। नियमीत ध्यान साधना करती इतर जीवांचे प्रश्न समजती ।।५।। ऋषीमुनींना ध्यान शक्ती अवगत राजाश्रय मिळूनी राज […]

स्वप्नातली अपूरी इच्छा

दुपारचे भोजन करूनी, आडवा झालो थोडासा झोप लागूनी त्याच क्षणी, थंडावल्या साऱ्या नसा….१, वाम कुक्षीच्या आधीन जाता, जग विसरलो सारे स्वप्न पडूनी सुंदर मनी, वाटे आनंद देणारे…..२, पाटी-पुस्तक हाती घेवूनी, पोषाख घाली शाळेचा घेवूनी गेलो कन्येस माझ्या, नाद जिला शिकण्याचा….३, खूप शिकूनी मोठी होईन, बाबा तुमच्या एवढी खावू पुस्तक खेळणी आणा, बडबडीत तिच्या गोडी….४, आई नको, […]

कीटकाचे ब्रह्मांड

कीटक ते लहान असूनी रहात होते फळामध्यें विश्व तयाचे उंबर फळ जीवन घालवी आनंदे……… १ ब्रह्मांडाची त्याची व्याप्ती उंबराच्या नसे पलिकडे ज्यासी ते अथांग समजले बघूनी त्या एका फळाकडे ………..२ माहित नव्हते त्या कीटकाला झाडावरची अगणित फळे सृष्टीतील असंख्य झाडे कशी मग ती त्यास कळे ………….३ आपण देखील रहात असतो अशाच एका फळावरी हीच फळे असंख्य […]

दयेची दिशा

निसर्ग नियमें दया प्रभूची, सदैव बरसत असते । दयेचा तो सागर असता, कमतरता ही पडत नसते ।। अज्ञानी ठरतो आम्हींच सारे, झेलून घेण्या तीच दया । लक्ष्य आमचे विचलित होते, बघून भोवती फसवी माया ।। उपडे धरता पात्र अंगणीं, कसे जमवाल वर्षा जल । प्रयत्न सारे व्यर्थ जाऊनी, निघून जाईल वेळ ।। भरेल भांडे काठोकाठ , […]

आकाशातील कापूस

कपाशीचे ढीग अगणित विखुरले दिसती आकाशीं मानव येथें उघडा असूनी वस्त्र अपुरें दिसे अंगाशी ।।१।। कोठे आहे कापड गिरणी वस्त्र जेथें बनत असें दयावान तूं मालक असतां त्रोटक कापड निघे कसे ।।२।। पाठव तूं तो वस्त्रांचा कोठा लाज राखण्या मानवाची गरीब बिचारा विवस्त्र तो कीव करावी वाटे त्याची ।।३।। डॉ. भगवान नागापूरकर संपर्क – ९००४०७९८५० bknagapurkar@gmail.com

वेळ दवडू नका

रंग भरले जीवनीं, रंगात चालतो खेळ टप्प्या टप्प्याच्या नादानें, जाई निघूनीया काळ….१ शिखरावरचे ध्येय, दुरुनी वाटते गोड लांब लांब वाट दिसे, जाणें तेथे अवघड……२ ठरलेल्या वेळेमध्ये, जातां योग्य दिशेनें यश पदरीं येईल, निश्चींच रहा मनानें….३ रमती गमती कुणी, टप्प्यांत रंगूनी जाती वेळ सारा दवडूनी, निराशा पदरी येती…४ जीवनातील अंगाचे, अनूभव घेत जावे मिळणाऱ्या त्या सुखाला, क्षणीक […]

1 386 387 388 389 390 437
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..