नवीन लेखन...

तन्मयतेत आनंद – प्रभू

सतत गुंतलो आहो सारे शोध घेण्यास त्या ‘आनंदाला’ युगानूयुगे प्रयत्न होतो मिळवण्यासाठींच प्रभूला…१ बाह्य जगाचे सुख आगळे लागले सारे त्याच्या पाठीं ‘देह सुख’ अंतीम वाटे, खरा ‘आनंद’ देण्यापोटी…२ ‘ज्ञानामध्ये’ भरला ‘आनंद’ समजूत झाली ही कांहींना लेखक, कवी, साहीत्यिक हे पाठ त्याची कांहीं सोडीना…३ साधू संत हे थोर महात्मे आनंद शोधूती ‘विश्रमांत’ ‘ध्यान’ लावून एक मनानें शांत […]

एक आरजू- प्रभुकी खोज

मनमे एक आरजू थी के प्रभु मिल जायेगा दिलकी धडकन कहती के उसे अपनेमेंही पायेगा आंख सबतरफ ढूंडती है हर एक कण में फिरभी दृष्टी असमर्थ हैं उसे पहचाननेमें ध्वनी की लहरे हर तरफ गुंज उठती कानोंके सहारे आवाज उसकी ना सुनी जाती महक उठती हवा खुशबूदार गंधोंसे पहचाने उसे कहां बगीचेके फूलोंसे बीती कितनी जींदगीयां […]

निरागस जीवन

प्रफुल्लित भाव वदनी, घेवूनीं उठला सूर्योदयीं गत दिनाच्या आठवणी नव्हत्या, आज त्याच्या मनांत कांहीं…१ खेळत होता दिवसभर , इतर चिमुकल्या मित्रांसंगे खाणें पिणें आणिक खेळणें, हीच तयाची जीवन अंगे…२ सांज होता काळोख येवूनी, निश्चिंतता ही निघूनी गेली भीतीच्या मग वातावरणीं, कूस आईची आधार वाटली..३ निद्रेच्या आधीन होतां, निरोप घेई शांत मनाने येणाऱ्या दिवसा विषयी, अजाण होता […]

सुखाचे मृगजळ

धांवत असे मन आमचे, शोधण्या नेहमीं सुखाला सुख तर आहे मृगजळ, फसवित राही सर्वाला…१ मृगजळाचे धावूनी पाठी, निराशा हाती येत असे, वेडी आशा मनीं बाळगुनी, सुखासाठी तडफडत असे…२, आपल्या हाती नसेल तेथें, सुख आम्हा भासत असे जवळ जातां प्रयत्न करूनी, सुख नसूनी दुःखची भासे…३, खरे सुख कशांत बघतां, तें तुमच्या मनींच वसत बाह्य जगी शोधत असतां […]

विश्रांती

धावपळीचे जीवन सारे, मिळे न कुणा थोडी उसंत विश्रांतीच्या मागे जाता, दिसून येतो त्यातील अंत ।।१।। चैतन्यमयी जीवन असूनी, चक्रापरी ते गतीत राही चक्र थांबता क्षणभर देखील, मृत्यूची ते चाहूल पाही ।।२।। थांबत नसते कधीही जीवन, अंत ना होई केंव्हां त्याचा निद्रा असो वा चीर निद्रा, विश्रांती ही भास मनीचा ।।३।। थकून जाई शरिर जेंव्हां, प्रयत्न […]

किर्तनी झोप

नियमित जाऊनी मंदिरी, श्रवण करी तो किर्तन तन्मयतेनें ऐकत असतां, जाई सदैव तेथे झोपून…१, एकाग्र करिता चित्त प्रभूसी, निद्रेच्या तो आहारी जाई निघूनी जाती सर्व मंडळी, एकटाच तो तेथे राही….२, पवित्रतेच्या वातावरणीं, प्रभू नामाच्या लहरी फिरती झोपीं गेला कोपऱ्यांत तो, परिणाम त्या त्यावरी करती….३, शांत असूनी निद्रीस्त इंद्रीये, शोषूनी घेती त्या लहरी आनंदाचे वलय भोवती, समाधान […]

तीन गुणाचे जीवन

तीन गुणांनीं युक्त असूं द्या, तुमचे जीवन सारे । जीवन यश पताका तुम्हीं, फडकवित रहा रे ।।१।। असती सारे ईश्वरमय, याच भूतला वरचे । प्रथम मान द्या हो प्रभूला, कार्य समजून त्याचे ।।२।। आनंद घेऊनी संसारांचा, लक्ष्य असावे जीवनीं । निसर्गाचे हे चक्र फिरावे, विचार असूं द्या मनी ।।३।। दुसऱ्याचा बघूनी आनंद, दुप्पट होई आपला । […]

खरी पूजा

गेला होता यात्रेसाठी देवीच्या तो पर्वती । श्री जगदंबा ही उंच शिखरी आरूढ होती ।१। भरले होते मन भक्तीने देवीचे ठायी । शरीर कष्ट सोसूनी तो उंच तेथे जाई ।२। प्रसन्न झाले मन तयाचे बघूनी ती मूर्ती । विविध आयुधे धारण करी उभी एक शक्ती ।३। भव्य होते देवालय ते अतिशय सुंदर । पवित्रता भासे तेथे, […]

सूड वलय

उत्साहाने आला होता, मुंबई बघण्याकरिता, रम्य स्थळांना भेट देणे, ही योजना मनी आखता ।।१।। मान्य नव्हती त्याची योजना, नियतीच्या चाकोरीला, पाकीट पळवूनी त्याचे, घाला कुणीतरी घातला ।।२।। धन जाता हाता मधले, योजना ती बारगळली, अवचित त्या घटनेने, निराशा तेथे पसरली ।।३।। जात असता सरळ मार्गी, दुष्टपणाला बळी गेला, समाजाला धडा शिकवण्या, सूडाने तो पेटून गेला ।।४।। […]

बेताल स्वछंदीपणा

काढूनी झाडाच्या सालींचा आडोसा घेतला ज्या कुणीं स्वांतंत्र्याच्या कल्पनेला बंधन पडले त्या क्षणीं ।।१।। नग्नपणें फिरत होता श्र्वानासारखा चोहींकडे सुसंस्कृतीची जाण येतां स्वच्छंदाला बाधा पडे ।।२।। स्वतंत्र असूनी देखील पडते परिघ भोवती जीवन जगण्या करितां बंधने ती कांहीं लागती ।।३।। स्वांतत्र्याची तुमची व्याप्ती असावी दुजांना जाणूनी दिव्य करण्याच्या ईर्षेने संस्कृतीस होइल हानी ।।४।। ओंगळपणाचे चित्रण करती […]

1 387 388 389 390 391 437
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..