नवीन लेखन...

निष्कर्ष जीवनाचा

सांगा, कसे व्यक्त व्हावे निर्जिव भास संवेदनांचा स्पर्शभास सारे मृगजळी हव्यास भौतिक सुखाचा। प्रीतभाव, व्यवहारी सारे खेळ हा लोभी भावनांचा सर्वत्र मुखवटेच ते बेगडी हा अनुभव या जीवनाचा। अनभिज्ञ, सारीच मनांतरे नात्यातही भाव संभ्रमाचा लोपली निकोप, निर्मलता स्वार्थी, निष्कर्ष जीवनाचा। भेटावेत, सज्जनी सत्य चेहरे उमजावा सत्यार्थ मानवतेचा हीच सुखदा सदानंदी चिरंतन रुजावा, बीजांकुर समतेचा। — वि. […]

सुसंवाद भोगवादी

सौख्यसमृद्धीचे रांजण भोगण्यासही पायबंदी क्षण विकलांग पांगळे शब्दभावनां जायबंदी संसारी सर्वार्थी तृप्तता धागे भाळी ऋणानुबंधी सारा फुकाचा विसंवाद सुसंवाद मात्र भोगवादी विवेकाने जगती जगावे दैवयोगे, प्रारब्ध भोगावे शांतीच्याच आंनद डोही जीवनी विनासक्त डुंबावे स्वर्गानंदी, ऐश्वर्यमहाल दुर्लभ, निर्मळ सौख्यांगण दुर्बोधीच अर्थ जीवनाचा व्यर्थ! सौख्यदायी रांजण — वि. ग. सातपुते (भावकवी) 9766544908 रचना क्र. १६५ १५ – ७ […]

आईचा स्पर्श

पुढे पडणाऱ्या प्रत्येक पावलाला एक लयबद्ध ताल आहे जाणिवेच्या तेवत्या ज्योतीला भावनेचं संतत तेल आहे जीवनाच्या अभंगाला, मनाच्या मृदुंगाला आईचा स्पर्श आहे हरएक श्वासात, प्रत्येक निश्वासात आईचा आभास आहे मनाच्या पापुद्रयांना जपणारा नितांत विश्वास आहे हृदयाच्या स्पंदनांना, काळजाच्या वेदनांना, आईचा स्पर्श आहे. आयुष्याच्या विवंचनांची, विटंबनांची, कुचंबणांची चढाओढ आहे निर्ढावलेल्या पाषाणशिळांना उद्धाराची आतुर ओढ आहे आश्वस्त मनांना, […]

शब्दभावार्थ

मी सारे ओळखूनी आहे तुही प्रीतभावार्थ जाणते जरी तू नि:शब्दी अबोल तव अव्यक्त मज उमजते मीच मन मोकळे करतो व्यक्त होतो, तुही जाणते सत्य उरि अबाधित आहे प्रीती, स्पंदनासवे वाहते कधीतरी न्याय देईल ईश्वर हीच भावनां अंतरी जागते प्रीत, निर्मळ, निर्मोही नाते निष्पाप लोचनांतुनी तरळते संकेत, तळहातीचीच रेषा वास्तवतेचे प्रतिबिंब दाविते — वि. ग. सातपुते. (भावकवी) […]

जागती स्पंदने

गवाक्षातुनी डोकाविती रविकिरण सुवर्णकांती प्रहर प्रभाती चैतन्याचा ब्रह्मांडी स्पंदने जागती उजळते रूपरंग सृष्टिचे धरा ल्याली हरितहिरवाई झुळझुळतो गंधितवारा तृणांकुरी , डुलती पाती संथ वाहते गंगा पावन पारावरी झुलतो पिंपळ राऊळ गाभारी विश्वेश्वर तेजाळती मंद फुलवाती गुलमुसलेली सांज पश्चिमी धुळ गोधुळीची आसमंती अधीर ओढ़ ती पाऊलांना ही वात्सल्यप्रीतीची नाती संध्या बिलगते यामिनीला शांत निःशब्द माहोल सारा परिमार्जन […]

आईच्या ६५व्या वाढदिवशी..

‘आई’ ही… चिरंतन आशा अनादि नि सुदैवाने अनंत मानवी आयुष्याला मात्र मर्यादा दुर्देवाने! ही खचितच खंत देवाचा अंश, आई परीसस्पर्श लाभून अवघे आयुष्य पुलकित! खूप काही सांगायला फारसे शब्द लागत नाहीत तुमच्या आमच्या आनंदाला कारणं फारशी लागत नाहीत -यतीन सामंत

आषाढी कार्तिकी एकादशी

परंपरागत दिंडी सोहळा ध्वज वैष्णवांचा चालला ज्ञाना, तुका, नामा, चोखा संतजनांचा मेळा दंगला टाळ, मृदङ्ग, चिपळ्या दिंडया, पताका नाचती डोलतो, पंढरीचा राणा वाळवंटी भक्तिचा सोहळा द्वैतअद्वैत झाले एकरूप नाही कुठेही अपपर भाव मुक्त गळाभेट हरि हराची लोचनी ओघळतो सावळा ब्रह्मांडाचे ब्रह्मरूप अवघे राऊळ गाभारी, कृपावंत कर कटिवर,उभा विटेवर जगन्नाथ, हरि विठुसावळा भाळी अबीर, गंध चंदनी तुळशीमाळा […]

व्याकुळ स्पंदने

कसे? समजवावे स्पंदनांना सदैव ध्यास तुझाच गे त्यांना क्षण क्षण भिरभिरती लोचने व्याकुळ जीव तुज शोधताना सर्वत्र साऱ्या तुझ्याच गं खुणा सांगना कसे विसरु आठवांना अजुनही साऊलीत भास तुझे वाटते तूच सोबती गं चालताना अंतरी भावप्रीतीच्या उतुंग लाटा चिंब चिंब भिजतो मी झेलताना वास्तवता, तुजविण जीवघेणी सांगनां सावरु कसे मी जगताना खुणावे जरी सांज सांजाळलेली तरीही […]

कृतार्थता

ब्रह्म अनामिक कृपाळू जन्मदा वात्सल्य लाघवी असीम पुण्यदा वैभव पंचभुतांचे खेळ ऋतुऋतुंचे चैतन्यरुप सृष्टीचे सौभाग्य जीवनाचे कर्मफल संचिती भोगणे जीवनांती सत्कर्माचे पहाड़ श्वासास सुखावती विवेकी सदभावनां ब्रह्मानंदे जगविती राखावीत मनांतरे लाभतेच मन:शांती चक्रधरी चक्रपाणी विटेवरीचा पांडुरंग वैष्णवासंगे नाचतो विठ्ठल,हरि,पांडुरंग दुथडी गंगाभागीरथी डोह, स्वर्गामृताचा डुंबावे मुक्त निश्चिंती क्षणक्षण कृतार्थतेचा — वि.ग.सातपुते.(भावकवी) 9766544908 रचना क्र. १५६. ५ – […]

आपलं (च) म्हातारपण

म्हातारपण असतं नाजूक साजूक तापून निवणाऱ्या एका काचेप्रमाणे म्हातारपण असतं दुखरं ठुसठुसतं उगा सलणाऱ्या शब्दांच्या वेदनांगत म्हातारपण असतं थकलेलं शीणलेलं दाट कापडाच्या उसवत्या वीणीप्रमाणे मन असतं अस्थिर, भिरभिरणारं तरंगणाऱ्या एका नि:संग पर्णाप्रमाणे म्हातारे डोळे असतात हळवे थोड्याशा प्रकाशाने भिरभिरतात जराशा आपुलकीनेही पाझरतात किंचित तिरीपीने येते तिरीमिरी आधाराला अशावेळी लागतं कुणीतरी म्हातारपण एकटं एकटं असतं आतुरतेने वाटते […]

1 37 38 39 40 41 437
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..