नवीन लेखन...

अवघे ब्रह्म

विठ्ठल, विठ्ठल, विठ्ठल जय हरि पांडुरंग विठ्ठल कनवाळू माय ब्रह्मांडाची सावळा जगजेठी विठ्ठल दंगुनी आषाढ़ी कार्तिकी नाचतो वाळवंटी विठ्ठल पदन्यास तो वैष्णवांचा ध्यास पाऊलांना विठ्ठल गरजता टाळमृदंग चिपळी नाद घुमतो विठ्ठल विठ्ठल नेत्री पाझरते रुपड़े सावळे श्वासाश्वासात भास विठ्ठल नाही कुठे अंतरी भेदभाव द्वैतअद्वैत एकरूप विठ्ठल सुखदुःखाचेच परिमार्जन अवघे ब्रह्म साक्षात विठ्ठल — वि.ग.सातपुते.(भावकवी) 9766544908 रचना […]

सत्य प्रीती

मनाची समजूत कशी घालावी नेत्री साक्ष तुझ्याच अस्तित्वाची सांगना मी तुला गं विसरु कसे हुरहुर मनाला तव प्रीतसुखाची क्षणाक्षणांच्या झुल्यावर झुलते निर्मल, प्रीतगंगा गतआठवांची प्रीतीविना कां? असते जीवन लाभते प्रीती, संचिती सुखाची कोवळ्या कळीत मकरंद मधुर भ्रमरास ओढ़ त्यात मिटण्याची सत्यप्रीती! अवघे मर्म जन्माचे त्याविण नसे, प्रचिती सुखाची भावप्रीतीचेच, निष्पाप चांदणे कृपा सार्थकी, त्या भगवंताची — […]

आठवणींची पिसं

आठवणींचा डोह भासतो वरकरणी शांत नि:संग मात्र डुचमळता उठतात भावकल्लोळाचे अनंत तरंग वरवर वाटतात साऱ्या एका कुळीच्या एक जशा होतात बोलक्या जेव्हा, जाणवे एकमेकींचा अलग ठसा काहींचा केवळ नुसताच भास जवळून काहींचे जाणवतात श्वास काही रांगत्या काही रांगड्या मुकाट काही, काही अखंड बडबड्या काही गोड बोबड्या दुडदुडताना रुणझुणतात मनोपटलावर पुन:पुन्हा काही नव्हाळ, गव्हाळ रंगसाजिऱ्या कुजबुजती अस्पष्ट […]

निश्चिंती निवारा

अशाच सुरम्य संध्याकाळी आत्ममग्नि एकांती निवारा सृष्टिचा हा अगम्य सोहळा लोभस दृष्टांत हा साजिरा निरवतेत इथे हरवुनी जावे उलगडावा , आत्मगाभारा सत्य ! जीव जगतो एकटा या किनारी शाश्वती सहारा लोचनी आज सांजसावळी ओघळे अनामिक तारणारा चराचरी या भास हरिहराचा जीवाजीवा, सदा सावरणारा — वि.ग.सातपुते. (भावकवी) 9766544908 रचना क्र. १५२ १८ – ६ – २०२२

आईच्या ६३व्या वाढदिवशी

वाढदिवसाच्या शुभेच्छा सादर प्रणाम शतवार शब्दांना पहावा पेलतो का भावनांच्या आपला भार लखलखीत रहाव्या उजळीत या आयुष्याच्या ज्योती अमोलिक क्षण अनेक उधळीत आनंदाचे मोती -यतीन सामंत

साठाव्या आठवणी

आयुष्याच्या मध्यान्ही, संध्याछाया झाकोळण्याआधी कधी वाटतं थांबावं, बसावं घडीभर निवांत आठवणींच्या रेशीमघड्या पसराव्या अलगद उलगडत सावलीला आठवणींचा पदर नि घ्यावी क्षणभर उसंत वळवावी नजर दूर मागे, मनाला रग लागेपर्यंत शिरावं मनाच्या पडवीतून भूतकाळाच्या माजघरात उघडावी कवाडं सारी, आजीबाईंच्या कपाटागत धुंडाळावे भ्रमिष्टागत ते सारे क्षण, काने-कोपरे जगाव्या, हुंगाव्या गतस्मृती, होऊन जिवंत क्षण सारे धुडकावून वर्तमानाचे सारे सावध […]

फळाची मजा

आंबा आहे फळांचा राजा मधुर रसदार हापूसची मजा फणसाला बुवा काटेच फार रसाळ पिवळा गरा मात्र चवदार केळी हिरवी, पिवळी किंवा वेलची पौष्टिक गोड, रोजरोज खायची द्राक्ष कशी घोसाला लगडलेली सुमधुर, टपोरी नाशिकवाली आईला म्हणावं फळं रोजच आण चवीला छान नि आरोग्याचीही खाण – यतीन सामंत

पाऊस दाटलेला डोळी

  देह चिंब-चिंब ओला, पाऊस दाटलेला डोळी भिजलेल्या गौरदेही, आरस्पानी ही काचोळी   पावसाळी ऋतु  जणू ,  मेघ मल्हाराची  ताण माती मुल्खाची सुग्रण,पावसाच्या ओठी गाणं   डोळे  भरले  नभाचे,  धरणीच्या  प्रीतिपोटी खुळ्या पावसाची प्रीत,रानपाखरांच्या ओठी   नदी, नाले  आळविती,  पशु-पक्ष्यांची  तहान वृक्ष वल्लरीच्या देही, पहिल्या पावसाची खूण   अरे, पावसा पावसा, आम्ही गातो तुझी गाणी असा […]

कुसुमाग्रजांना श्रद्धांजली

काजव्यांच्या कोलाहलातून भव्य तारा निमाला धरित्रीच्या कुशीमधून आसमंतात झेपावला कोंडलेला श्वास मुक्त झाला, उजाडलं घर अंगण सुनंसुनं झालं सुन्न, उसासलं अवघं तारांगण विध्दलेलं रुद्ध शब्द, श्वास का हा जडावला दाटली श्रद्धा ओठी, डोळ्यांकाठी मोतीहार निखळला – यतीन सामंत

संगमी सांगता

शांत, शीतल गर्द किनारा संथ लहरी प्रवाही सरिता खळाळते प्रतिबिंब नभाचे मनी उचंबळते प्रीतसरिता आठवांची, झालर झुलते थकली जरी ही गात्रे आता अंतरी, स्मृतींची गंगायमुना अखंड वाहते पावन सरिता निर्मोही भावनांची भावगंगा जागविते, हॄदयी भावगीता भावप्रीतीचे, सरोवर सुंदर मिलना, आतुरलेली सरिता तृप्ततेचा साक्षात्कार लाघवी सागरसरिता, संगमी सांगता — वि.ग.सातपुते. (भावकवी) 9766544908 रचना क्र. १५० ११ – […]

1 38 39 40 41 42 437
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..