बघूनी सू्र्यपूजा पावन झालो
हासत आली सूर्य किरणे, झरोक्यातून देव्हाऱयात न्हाऊ घालूनी जगदंबेला, केली किरणांची बरसात पूजा केली किरणांनी, जगन्माता देवीची प्रकाश स्पर्शूनी चरणाला, केली उधळण सुवर्णाची तेजोमय दिसूं लागले, मुखकमल जगदंबेचे मधूर हास्य केले वदनीं, पूजन स्विकारते सूर्याचे रोज सकाळी प्रातःकाळीं, येऊनी पूजा तो करितो भाव भक्तिने दर्शन घेऊनी, सृष्टीवर किरणे उधळितो कोटी कोटी किरणांनी, तो देवीची पूजा करितो […]