नवीन लेखन...

घनमेघ

बरसत, बरसत ये रे घना चिंब चिंब भिजव रे मना आसक्त,अधीर प्रीतभाव बरसत, बरसत ये रे घना सांग कसे, मीच रे सावरुं हे निळ्या सावळ्या घना तुझ्यात रे स्पर्षतो सावळा बरसत, बरसत ये रे घना हेच गगन, हीच वसुंधरा उताविळ, मिलना रे घना तूच रे, चैतन्य या सृष्टिचे ये सजवित ब्रह्मांडा रे घना — वि.ग.सातपुते (भावकवी) […]

काय गंमत आहे पहा!

आयुष्याचे कण कण क्षण साठले कुणी कोठल्या पेढीवरती व्याज राहो मुद्दलही होई झपाट्याने ती केवळ रिती खालती नसे पासबुक नसे स्टेटमेंट तुमच्या आमच्या शिलकीपोटी निर्वाणीची निर्वाणनोटीस येते अचानक जेव्हा हाती तेव्हाच उमगते (काय फायदा?) नव्हती उरली शिल्लक खाती -यतीन सामंत

गरीबी हटाव

(सुशीलकुमार शिंदे मुख्यमंत्री झाल्यावर म्हणाले मी मुख्यमंत्री झालो आता मी गरिबांची पूजा बांधणार -) स्वातंत्र्य मिळाले तेव्हा ते म्हणाले गरिबी हटाव! त्यानंतर कित्येक पंतप्रधानांनी आपली गरिबी हटवली त्यानंतर कित्येक मुख्यमंत्र्यांनी आपली गरिबी हटवली त्यानंतर कित्येक मंत्र्यांनी आपली गरिबी हटवली त्यानंतर कित्येक आमदाराने खासदारांनी आपली गरिबी हटवली त्यानंतर त्यांच्या कित्येक बगल बच्यांनी आपली गरिबी हटवली स्वातंत्र्य मिळून […]

पाऊसधारा

क्षणक्षण सारे होता धुसर पापण्यातूनी दाटती पाझर व्याकुळ,कृष्णमेघ सावळे त्या ओढ़ वसुंधरेची निरंतर सृष्टिचे रूप अवीट मनोहर तोषवीणारा मृदगंध अनावर लपंडाव तो उन सावल्यांचा मोहवितो मनामनास निरंतर चिंबचिंब ओल्या पाऊसधारा सुखद सरिंची रिमझिम सुंदर आसक्त, ओढ़ प्रीतसखीची तनमन हृदया लागे चिरंतर जरी सुखदु:ख्खदी मेघडंबरी प्रीतभावनांचे अंतरी गहिवर ऋतुऋतुंचे सोहळेच लाघवी कृपाळू, कृपावंत तो दिगंबर — वि.ग.सातपुते […]

सत्तेची खुर्ची

(सत्तेची खुर्ची एक वेगळी मजबूत होती. चार पायांवर भक्कम उभी होती. आताची खुर्ची – ?) एक खुर्ची चार पाई भक्कम मजबूत एके ठाई एक खुर्ची तीन पाय एक गळाला कळलं नाय एक खुर्ची दोन पाय दोन गळाले, खुर्ची तर हाय एक खुर्ची एक पाय काय बिगडलं फिरती हाय कुटं बी वळीवलं तर काय बी बिगडत नाय […]

सत्य प्रीती

मनाची समजूत कशी घालावी नेत्री साक्ष तुझ्याच अस्तित्वाची सांगना मी तुला गं विसरु कसे हुरहुर मनाला तव प्रीतसुखाची क्षणाक्षणांच्या झुल्यावर झुलते निर्मल, प्रीतगंगा गतआठवांची प्रीतीविना कां? असते जीवन लाभते प्रीती, संचिती सुखाची कोवळ्या कळीत मकरंद मधुर भ्रमरास ओढ़ त्यात मिटण्याची सत्यप्रीती! अवघे मर्म जन्माचे त्याविण नसे, प्रचिती सुखाची भावप्रीतीचेच, निष्पाप चांदणे कृपा सार्थकी, त्या भगवंताची — […]

नमनाचं तेल

करेन कोटी, करेन कोटी करेन कोट्या कोटी कोटी सांभाळीन त्या छातीच्या कोटी केवळ अस्सल एक ना खोटी सरस्वती थैमाने ओठी कोटीला मग कसली खोटी – यतीन सामंत

आयुष्य

आयुष्य संपत जाते, पण प्रेम संपत नाही किती करा परमार्थ, पण क्रोध आटपत नाही आधी कष्टे स्वतःसाठी, मग कुटुंबासाठी भरुन भांड ओसंडे, तरी लोभ सुटत नाही पैसा-अडका, जमीन-जुमला, घराण्याचा गर्व जववर असे दैव अनुकुल, मद हा हटत नाही सकाळ, दुपार, संध्याकाळ – देई शिव्या अपार एक दिवशीही मत्सर, केल्याविना दिसत नाही कुणावरही विश्र्वास न करी, सर्व […]

जिणे (वृद्धत्वाची  व्यथा)

एक होता कप एक होती बशी दोघांची जमली गट्टी खाशी पांढरा शुभ्र त्यांचा रंग चमकदार त्यावर नाजूक फुलांची नक्षी झोकदार दिसायचे ऐटदार आणि आकार डौलदार सकाळ-संध्याकाळ गोड किणकिण चालायची फार कपाने ओतायचा बशीत चहा सुगंधी तिने हळूहळू प्यायची साधायची संधी एक दिवशी फुटली बशी झाले तिचे तुकडे कपाचा ही कान तुटला गेले त्याचे रुपडे बशीचे तुकडे दिले […]

केश कर्तनालयात

न्हाव्याने  विचारले साहेब कोणता कट मारू? मी म्हणालो कोणताही मार पण कटकट नको करू! न्हाव्याने विचारले साहेब गोविंदा कट का सचिन कट? मी म्हणालो कोणताही चालेल पण कर सगळं सफाचट न्हाव्याने विचारले साहेब दाढी मिशी पण करू? मी म्हणालो दाढी भादर पण मिशीला नको लावू कातर! न्हाव्याने विचारले साहेब करू का मालिश चांगला? मी म्हणालो करायचं तर […]

1 39 40 41 42 43 437
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..