कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
कवितेचा कवी
कवितेचा कवी कविते आहेस प्राण तू या वेडया कविचा कवितेविणा चालेल कसा श्वास या वेडया कविचा कवितेसाठीच आहे देह जगी या वेडया कविचा कवितेमुळेच होतो कवितेचा कवी म्ह्णोनी सन्मान कविचा ! © कवी – निलेश बामणे ( एन.डी. )
ज्ञानाग्नि पेटवा
कृष्ण कमळ-
मुक्तीसाठीं
रुजला पाहीजे विचार मनांत सारेच प्रभुचे असे ह्या जगांत जो वरी आहे मी माझे येथे असे त्या क्षणापर्यंत स्वार्थ मनीं वसे स्वार्थयुक्त मन मुक्त होत नसे मुक्ती येई पर्यंत पुनर्जन्म असे बिंबता मनांत माझे नाहीं कांहीं प्रभूचे समजता आत्मा मुक्त होई डॉ. भगवान नागापूरकर ९००४०७९८५० bknagapurkar@gmail.com
देवकी माता !
काय म्हणू ग तुजला देवकी भाग्यवान की अभागी ईश्वर तुझीया उदरी येवूनी सुख न लाभले तुजलागी // जन्मोजन्मीचे पुण्यसाचुनी मात्रत्व लाभे स्त्रिजन्माला तु तर असता जननी प्रभूची तुजविण श्रेष्ठ म्हणू कुणाला // राज वैभवी वरात निघता कारागृही तुज घेवून गेले अवताराची चाहूल असूनी दुःखी सारे जीवन गेले // कंसाने तव मुले मारीली निष्ठूर होऊनी स्वार्थापोटी तु […]