कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
विजेचे दुःख
चमकत लपकत आली कडकडाट करुनी गेली प्रकाशमान केले जगासी दूर केले अंधारासी भयाण होता अंधःकार लख्ख प्रकाश देई आधार घेई सर्वांच्या मनाचा ठाव भिती असूनही प्रसन्न भाव करुनी शक्तीचे भव्य प्रदर्शन निर्माण झाला मनी अभिमान परि दुःखी होते तीचे मन ‘क्षणिक’ लाभले तिला जीवन डॉ. भगवान नागापूरकर ९००४०७९८५० e-mail- bknagapurkar@gmail.com
जीवन प्रवासी
बागेतील तारका-
[…]
शबरीचे निर्मळ प्रेम
कृष्ण कमळ-
चि. मानसीस
थांबव मानसी, चक्र वाढीचे कळ्यातूनी तू फुलताना हासत खेळत तुरु तुरु चालणे शिशू म्हणूनी जगताना कौतुकाने ऐकतो तुज शब्द बोबडे बोलताना हरखूनी जातो चाल बघूनी हलके पाऊल पडताना आनंद पसरे सभोवताली इवल्या त्या प्रयत्नानी बदलूनी जाईल क्षणात सारे रुळलेल्या तव हालचालीनी तुझ्यासाठी जे नवीन होते प्रयत्न तुझा शिकून घेणे अपूर्णतेची आमुची गोडी लोप पावेल पूर्णत्वाने डॉ. […]
आणखी एक बॉम्बस्फोट
आणखी एक बॉम्बस्फोट
शांततेच काळीज चिरून गेला
पुन्हा एकदा निरपराध्यांच रक्त चाखून गेला
आणखी एक बॉम्बस्फोट
सर्वसामान्यांची झोप उडवून गेला
संपूर्ण देशात भयाच सावट पसरवून गेलां
आणखी एक बॉम्बस्फोट
पुन्हा तोच प्रश्न विचारून गेला
ज्याच उत्तर देण्यापूर्वी ईश्वरही झोपी गेला
आणखी एक बॉम्बस्फोट
मानवतेला काळिमा फासून गेला
डोळ्यातील अश्रुनैवजी रक्त गोठवून गेला
आणखी एक बॉम्बस्फोट
डोक बधिर करून गेलां
जीवनात जगण्याची खात्री नाही हे पटवून गेला
कवी – निलेश बामणे
[…]
संत संगती
ललाटी ज्यांच्या जे जे लिहीले संत जाणती दिव्य दृष्टीने नियतीच्या ह्या हलचालीना दिली जाती आवाहने जाणून घेता भविष्यवाणी जीवन मार्ग हे ज्याना कळती तपशक्तीने संत महात्मे योग्य मार्ग ते दाखवूनी देती कर्माने जरी भाग्य ठरते सुख दुखःच्या गुंत्या भोवती त्या गुंत्यातील धागा शोधुनी सुसाह्य त्याचे जीवन करीती कृपा होता संत जनाची चुकला-मुकला जाई ठिकाणी घनदाट त्या […]
देह देव
हाडे, मांस, रक्ताने, शरीर बनविले छान, सौंदर्य खुलते त्या देहाचे, जर असेल तेथे प्राण ।।१।। प्राण नसे कुणी दुजा हा, परि आत्मा हेची अंग, विश्वाचा जो चालक, त्या परमात्म्याचा भाग ।।२।। ईश्वरी सेवा, संकल्प मनीं, प्रेमभरे देह भजावा, अंतर बाह्य शुद्धता राखी, समर्पणाचा भाव असावा ।।३।। डॉ. भगवान नागापूरकर ९००४०७९८५० bknagapurkar@gmail.com