नवीन लेखन...

आला उन्हाळा

आला उन्हाळा आला घेऊन गरम गरम हवेच्या झळा अंगाची करीत लाही जीवाची करीत काहिली घामाच्या घेऊन धारा पंख्याचा शीतल वारा तहानेने पाणी-पाणी शीतपेयांची आणीबाणी सरबतांचा शितल मारा सगळे फ्रीजमध्ये सारा आइस्क्रीमचा चाटा मलिदा सोबत थंडगार फालुदा पेप्सी आणि कोकची जोडी  गुलाबजाम वर कुल्फीची उडी सर्दी खोकल्याची जोड गोळी उन्हाळ्याची दोस्तमंडळी घराघरातून रहदारी उन्हाळी औषधांची घुसखोरी डॉक्टरांची पायरी पाय ठेवायला […]

उखाणे- नव्या नवरा-नवरीसाठी

इकडं आड अन् तिकडं विहीर इकडं सासूबाई अन् तिकडं वसंतरावांची घाई स्वयंपाकघरात सासूबाई दिवाणाखान्यात मामंजी दाराच्या फटीतून वसंतराव करतात अजीजी! कडक इस्त्रीची पँट चकचकीत बूट त्यावर रुबाबदार शर्ट आणि टाय कामावर निघाले वसंतराव परतले का बरं? विसरले काय? पोळीभाजीचा डबा बिसलेरीची बाटली आणि रेल्वेचा पास बॅगेत भरुन निघाले वसंतराव लांबून करतात किस पास! लग्नात देऊन जिलेबीचा […]

मायेचा हात

पहाटे जाग येते तेव्हा खिडकीतून चंद्रप्रकाश अंगभर पसरलेला असतो जणू आईच्या मायेची अंगभर चादर पसरतो शीतल शांत निराकार आईची कुशी उबदार जावेसे वाटते फार चंद्रा तिच्या मायेच्या मांडीवर चंद्रा तुझ्या शितल चांदण्याचा स्पर्श जणू मायेने तोंडावर फिरतोय आईचा हस्त आहे ना रे आई माझी तुझ्या संगे देवापाशी? तिच्या मायेचा हात असेच येऊ दे तुझ्या किरणात! — विनायक […]

गाणारे झाड

(आमच्या झोपायच्या खोलीच्या खिडकी समोर उंबराचे झाड आहे. त्यावर चिमण्या राहतात. पहाटे साडेचार पाच वाजल्यापासून त्यांची चिवचिव चालू होते.  जाग आल्यावर वाटते झाडच जणू गात आहे. हे गाणे दोन-तीन तास चालू असते.) उंबराच्या झाडाच्या गाण्याने पहाटे जाग येते तेव्हा वाटते जणू कोणी नर्तक पायात  बांधून घुंगरांचा साज करतोय सुंदर पदन्यास उंबराच्या झाडात म्हणे असतो सद्गुरूंचा वावर म्हणूनच […]

दिगंबर

(दिगंबर म्हणजे दिग्+अंबर. आकाश हेच ज्याचे वस्त्र तो भगवान महावीर दिगंबर. ज्याला एका वस्त्राचाही मोहन नाही. त्याच्या नावाने  चाललेले श्रीमंती वैभवाचे प्रदर्शन,  ओंगळवाणे अभिरुचीहीन पाहून या महान अवताराच्या भक्तांची कीव येते, अशाच एका समारंभाचा मंडप पाहून-) भलंमोठं नक्षीदार प्रवेशद्वार आज वैभवशाली मंडप झोकदार छताला लखलखीत झुंबरं दिमाखदार बसायला गाद्या टेकायला लोड त्यावर पांढऱ्या शुभ्र चादरी चमकदार लाऊड स्पीकर […]

पणजीचा पहिला मान

गोरं गोरं पान फुला सारखं छान घरी येणार आहे आता गोडूल सान बाळाला आणायला बाबाची नवी गाडी गाडीत बसणार आज्जी आजोबाची जोडी गाडीची लकेर आणि सुंदर पाहून ती शान घरी येणार आहे गोडूल सान बाळाला घालायला रेशमी कुंची मी शिवणार बारीक मोत्याची सुंदर सुबक झालर लावणार कपाळावर येईलच मग सोन्याचे पिंपळपान घरी येणार आहे गोडूल सान […]

सोबत

कोणते हे रस्ते कुठले हे वळण कसल्या या जाणीवा कसले हे स्पंदन पहाटेचे दवबिंदू हळूच जातील घसरून ओंजळीतल्या रेतीचे कण जातील निसटून माहित आहे जरी स्वप्न हे नाही खरे तुझ्या सोबतीचे स्वप्नही असते पुरे… — आनंद पाटणकर.

पोस्टाची खिडकी

पोस्टाची खिडकी टपालासाठी रेल्वे ची खिडकी तिकिटासाठी सिनेमाची खिडकी हाऊसफुल्ल साठी नाटकाची खिडकी श्री. सौ. साठी खिडक्याच खिडक्या त्यांना काय तोटा कुठे जाल तिथे पडेल त्यांच्याशी गाठ सापडेल का कुठे? कल्पवृक्षाची खिडकी? सापडलीच तर एकच वाटते खंत पाळी येईल तेव्हा ती होऊ नये बंद! — विनायक अत्रे.

गांडूळ

(मुंबई महानगरपालिकेने कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी गांडूळ शेती प्रकल्प राबवला. हे गांडूळ खादाड आणि जाडजाड असतात आणि कचऱ्याचा फडशा पाडतात. कौतुकाने प्रकल्प बघायला गेलेल्यांना मात्र तिथे कचऱ्याचे ढिगारे आणि भिकारी सापडले, गांडुळे मात्र बेपत्ता! कुठे होते ते?) महानगरपालिकेने राबवला गांडूळ शेतीचा प्रकल्प हे गांडूळ असतात खादाड आणि दिसायला जाड जाड लोक गेले तिथं पहायला गंमत दिसले त्यांना […]

डबक्यातले बेडूकराव

(भारताने न्यूझीलंडमध्ये सपाटून मार खाल्ला. साउथ आफ्रिकेत चालू असणाऱ्या वर्ल्ड कप २००३च्या पहिल्याच सामन्यात आपल्या टीमने ऑस्ट्रेलियाकडून पुन्हा नामुष्कीचा पराभव खाल्ला. काय म्हणावे या कर्माला?) वाघाची डरकाळी सिंहाची गर्जना कागदी वाघ करतात वल्गना चिखलातले बेडूकराव करतात डराव डराव तट्ट फुगले तर काय नंदीश्वर होतील काय? गाढवाने पांघरले वाघाचे कातडे म्हणून काय त्याचे लपेल ओरडणे? आपलाच डंका […]

1 40 41 42 43 44 437
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..