नवीन लेखन...

न्याहरीची तऱ्हा न्यारी

दोसा असतो कसा छान जाळीदार मन मोकळे जसे असते त्याचे आरपार इडली सदाच टम्म फुगलेली. साधीदार सांबार नसला की असते रुसलेली खमंग खुसखुशीत आप्पे गोल गोल गरम गरम असतानाच खाणार किती बोलबोल आंबट ताकातली खमंग फोडणीत उकड शिजते रटरटा डोळे मिचकावत खायचे मस्त गटगटा कुणी म्हणतात उप्पीट तर कुणी ऊपमा या साठी बऱेच पदार्थ करावे लागतात […]

दिवाळी

अनघा प्रकाशन दिवाळी अंक २०१८ मध्ये लिहिलेली ही कविता आली दिवाळी आली दिवाळी दिव्या दिव्यांच्या लावून ओळी रंगा रंगाने खुलवु रांगोळी आली दिवाळी आली दिवाळी… ।। १ ।। लाडू करंजी ती कडबोळी शेव चिवडा अन् शंकरपाळी काटेरी चकलीची मजा निराळी आली दिवाळी आली दिवाळी… ।। २ ।। अभ्यंगस्नान पहाटेच्या वेळी उटण्याचा आलेप गंध दरवळी सुरसुऱ्या फुलबाजी […]

आमची शाळा

गिरगावातील रस्त्यावरी दोन देवळांच्या शेजारी ‘आर्यन’ आहे आमची शाळा जेथे ज्ञान मिळते बाळा नाव शाळेचे लहान आहे लहानथोरांच्या मुखी आहे येथून शिक्षण घेऊन गेले देशमुखांदी मोठे झाले आम्हीही शिक्षण घेऊन जाऊ परंपरा त्यांची पुढे चालवू सर्वांना जी समान मानते ती शाळा मला खूप भावते शाळा ही आवडती असे अभिमान तिचा हृदयी वसे -यतीन सामंत ऋणानुबंध या […]

शांततेचे स्वप्न

जिथे नसावा गलबला, गलका, कोलाहल काही काळालाही शाप नसावा, लगबग वा घिसाडघाई मनस्ताप वा कसली चिंता, गोंगाटही नाही शांततेला मग धीर यावा, नीरवता जिवंत व्हावी ॥ असावी शांततेला एक वात्सल्याची झाक काळालाही नसावा वेळेचा काही धाक ऐकू यावी अंतरीची केवळ हळूवार हाक समाधि लागावी या जगाची न उरे जाग ।। जिथे विहरावा वारा मुक्त आपुलकीचा आज […]

तुझ्या मिठीत मी

तुझ्या मिठीत मी अलवार गंधाळून गेले, बंध मलमली सारे हे भास तुझा अंतरी असा रे.. घेता तू घट्ट मिठीत मग चांदणे नभात चमचमे, सैलावेल गात्रे तुझ्यात माझी हलकेच समर्पित मी होता रे.. स्पर्श तू अलगद करता जाईल मी मोहरुन रे, ओठ तू अलवार टिपता गोड होईल साखर चुंबन रे.. अत्तराचा गंध केतकी काया अधर जरा बहरते, […]

का पुन्हा पुन्हा मी

का पुन्हा पुन्हा मी गुंतून जात आहे, कशी ओढ ही मग तुझ्याकडे ओढते आहे.. नको होते मोहक तुझी आठवण ती, परी होते रोज मग तुझी गोड साठवण ती.. न विसरले तुला मी न विसरल्या भावना, अबोल वेदना हृदयात उरल्या आठवणी पुन्हा.. मन दुःखी होते असे ओढाळ होतात भावना, नको गुंतणे मग हे विरतात नाजूक जाणिवा.. — […]

जाई जुईचं अलगद बहरण

जाई जुईचं अलगद बहरण की मंद निशिगंधाच दरवळण, गुलाबाच टवटवीत होणं की प्राजक्ताचं दवात ओलं भिजणं.. कमळाच पाण्यात भावणं की मोगऱ्याच गंधित होणं, जास्वंदीचं तरारुन उमलण की झेंडूच भरभरुन डवरण.. तगरीच साधस दिसणं की चाफ्याच गंध धुंद करणं, शेवंतीच नाजूक ते फुलणं की बकुळीच अबोल होणं.. रातराणीच धुंद आल्हाद होणं की अबोलीच अबोल लाजण, फ़ुलांचं हे […]

जीवनातील प्रश्न

वर्षावती अखंड जीवनी परागकण छोटे छोटे अगणित असे चैतन्यकण अमोलिक असतो अविरत अपूर्व आनंद जपण्यात जगण्यातले सारे इवलेपण इवल्या गोजिऱ्या हळव्या कळ्या नाजूक निष्पाप कोवळ्या पाकळ्या फुलतानाही बिचकत दचकत अवघडलेल्या उबदारशा एका ओंजळीस आसुसलेल्या निर्माल्यणापूर्वी हृदयी धरुन येतील फुलवता मळे का? अथक, अखंड ध्यास हव्यासाचा धडपड मी माझा जोपासण्याचा सोडून भास मृगजळ गाठण्याचा का न वहावा […]

उपरती

नाही केली कधीच वारी नाही देखिली कधीही पंढरी नाही घडले स्नान भिवरेच्या थडी बांधत राहिलो मजले आणि माडी हाती नाही घेतले टाळ ना आले मुखी अभंग संसारात करीत राहिले नाना रंग आणि ढंग ना दान ना धर्म ना दाखविली माणुसकी आता कोण दाखविल कशाला मला आपुलकी या महामारीने उपरती झाली म्हणून आलो मी शरण नाही सोडणार […]

मुलगी शिकली

स्वयंपाकघरापासून शेजघरापर्यंत, तिचं आयुष्य जडलं होतं. जन्म देणं अन् रांधून वाढणं, इतकंच तिचं कर्म होतं. किंमत तिच्या शब्दाला नव्हती, शिकण्याची गरज वाटत नव्हती. अबला अबला म्हणून आधाराने, जगत ती रहात होती. तिला शिकून करायचंय काय?, घरातच राहणार तिचा पाय. तोंड तिने उघडायचं नाय, दोन वेळचं जेवण,वर्षाकाठी लुगडं – जगायला आणखी लागतंय काय? गृहलक्ष्मीच्या हातातच लक्ष्मी नव्हती, […]

1 42 43 44 45 46 437
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..