प्रेम करावे कणाकणाने
प्रेम करावे मनामनाने, प्रेम करावे क्षणाक्षणाने नसावे ओझे दडपणाने, प्रेम करावे कणाकणाने प्रेम नसावे प्रभावळीचे घनघोर वा वर्षावाचे घुसमटवणारे, गुदमरवणारे बिचकून टाकत दिपवण्याचे प्रेम फुलावे प्राजक्तकळ्यांनी सतत सुगंधित या क्षणांनी प्रेम करावे करांगुलीने, निर्व्याज्य अशा निखळतेने प्रेम ना व्हावे शिकवणुकीने, शिस्तीने – जबरदस्तीने प्रेम वहावे अंतउर्मीने, कळकळ आतुर आपुलकीने प्रेम नाही सोपस्कार, उरकून कोरडा उपचार प्रेम […]