नवीन लेखन...

तुटल्या तारा त्या

तुटल्या तारा त्या झंकारत नाही, अबोल चांदण्यात चंद्र उजळत नाही कोरड्या शब्दांत भाव उमटत नाही, वेदनेतल्या जाणिवांचे कढ दिसतं नाही मिटल्या फुलांचा वास उरतं नाही, तोडल्या मनात सुख उरत नाही झोका स्वप्नातला एक झुलवून गेला, रिक्त मनात आल्हाद जीव पोळला खेळ झाला असा भावना विरल्या, निर्जीव भावली सम खेळ रंगला मन कोमेजले अधर नव्हती कल्पना, कोण […]

हव्यास

हव्यास जीवाला किती असावा माझे तर माझेच एकटयाचे आहे इतरत्र देखील माझा हक्क आहे सांगा कोण काय घेवून जाणार आहे।। बेताल व्यर्थ वक्तव्ये काय कामाची उपकारांची जाणीव संस्कार आहे जनाची नाही मनाची लाज असावी संस्कारहीन स्वार्थ, दुर्बुद्धीच आहे।। माणुस म्हणुनी थोडेसे तरी जगावे जन्म मानवी विवेकी लाभला आहे हव्यासी, लालसी वृत्तीच विनाशी सारे सारेच इथे सोडूनी […]

भान हरपले विठ्ठला

भान हरपले विठ्ठला तुझ्या चरणी देह माझा, भोळ्या भक्तीचा तू भुकेला धाव घेई तू भक्तांच्या साह्याला रुप तुझे सावळे कटीवरी हात असे, मुखी विलसे हास्य सदा सावळ्या तू हरी विठ्ठला पंढरपुरी असे वास वर्णावे काय तुझे चरित्र, धन्य धन्य होतो जीव तुझ्या दर्शनाची आस हृदयी सदा — स्वाती ठोंबरे.

मन हळवं झालय

आजकाल मनावर होतात आघात आतामात्र मन खुपच हळवं झालय खरं तर, सारंकाही सोसलं पाहिजे कळतय तरी देखील कळेना झालय सुखानंदाची व्याख्या बदलली आहे भोगवादी सुखाकडं हे जग धावतय आपलेपणाची जाणीव शून्य झाली नात्यानात्यातली दरी मात्र वाढलीय जन्मदाते, ऋणानुबंध फक्त नावाचेच आस्थे ऐवजी अनास्था रुजु लागलीय खरं तर जसं वारं वहातं तसच वहावं हाच सुखाचा सोपा मार्ग […]

अनंतात नाम तुझे

अनंतात नाम तुझे तुझ्या चरणी माथा, कानडा विठ्ठल तू उभ्या पंढरीचा राजा धाव घेतो तू सत्वरी भोळा भाव भक्तीचा, नामदेवाची खातो खीर काय वर्णावा तुझा सोहळा जनीचे दळतो दळण सावत्या माळ्याचा पिकवी मळा, श्रीखंडया बनून पाणी भरले एकनाथांच्या घरा चंद्रभागेच्या तिरी जमला साऱ्या वैष्णवांचा मळा, तुझ्या नामात तल्लीन होतो भक्तांचा हा मेळा ज्ञानदेवांनी सुरु केली वारीचा […]

व्यक्तता

शब्द थकले, मौनही आज थकले सांगा नां, आज व्यक्त कसे व्हावे भावनांचा श्वास आज गुदमरलेला सांगा नां, जगणे सुलभ कसे व्हावे कधीतरी सहज मनमोकळे करावे कां उगा ? सांजवेळी साशंक व्हावे अव्यक्ताचे, जीवनी अर्थ वेगवेगळे मनीचे सारे सत्य बोलुनी मुक्त व्हावे आज नां, कुठलीच याचना अपेक्षा तरीही, जीवनी निश्चिंत कसे व्हावे तड़जोड जीवनी, हीच मन:शांती हेची […]

चंदन

तू कधी चंदनाचं झाड पाहिलंस का रे? मीही नाही रे पाहिलं आपल्या वाट्याला येतात ते छोटे इवलूशे तुकडे त्यातूनच त्याचा सुगंध हुंगून तृप्त व्हायचे कधीतरी भेटतो तो एखाद्या जवळून गेलेल्या अत्तराप्रमाणे अर्धोन्मीलित अवस्थेत श्वासात सामावून घेतो आपण क्षणभरच.बघू वळून पाहू पण चुटपुट लागते हरवतो तो न जाणो किती दिवस. अगदी अगदी दडून बसतो अवचित मग कधी […]

चेहऱ्याला सजवावे म्हणतो

चेहऱ्याला सजवावे म्हणतो अश्रूंना लपवावे म्हणतो, नव्या ऋतूच्या स्वागताला नव्याने उमलावे म्हणतो. पुन्हा एकदा रुजावे म्हणतो वादळवाऱ्यात तगावे म्हणतो, कोसळणाऱ्या प्रपातातून स्वत:ला वाचवावे म्हणतो. पुन्हा एकदा उडावे म्हणतो आभाळाला भेटावे म्हणतो, सुकलेल्या एका दाण्यासाठी दोन थेंब मागावे म्हणतो. पुन्हा एकदा जगावे म्हणतो ताठ उभे रहावे म्हणतो, खोल ओलाव्याच्या शोधात खोल खोल जावे म्हणतो. झाडांपासून शिकावे म्हणतो […]

काठीला आवाज नसतो

परकिय देतात खूप मोठा मान स्वकिय करतात एकसारखा अपमान परकिय करतात हो खूपच आदर. स्वकियांना नाही मुळीच कसलीही कदर बाहेरचे लावतात किती प्रेमाने माया. घरच्या साठी मात्र जन्म घालवला वाया अनेकंनी जोडली अनेक नाती. नेमकी स्वकियांनी याचीच केली माती पण देवाच्या दारी नसतो कधीच अंधार. कुणाच्या तरी रुपाने देतो तो शाब्दिक आधार आधार देवाच्या काठीला नसतो […]

हे पोष्टमणा

ये रे ये रे पोष्टमणा माहेरच्या आण डाकें मना लागे हुरहुर वरण होई फिके-फिके वाटेकडे तुझ्या डोळे लावून लावून, मला चष्मा लागे चित्त न लागे स्वयंपाकात भातातही खडे लागे पायातली काढून हाणू कारे सुंदर तुझ्या ह्या थोबड्यावरती लक्ष न देताच जातोस मेल्या दारावरुन माझ्या पुढती काय मेले लफडे तुझे शेजारच्या टवळी संगे रोज-रोज कार्डे द्याया तिच्या […]

1 45 46 47 48 49 437
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..