नवीन लेखन...

तुझ्या मलमली मिठीत

तुझ्या मलमली मिठीत मी अलगद मुग्ध व्हावे, ओढ हलकेच तुझी लागता भूल आल्हाद हृदयी जपावे काय असेल तो रम्य क्षण तू मिठीत मज अलवार घेता, लाजेल मी रोमांचित होऊन स्पर्श होईल तुझा नाजूकसा का भूल मला पडली तुझीच आस तुझी अंतरी लागता, ती मिठी उत्कट अबोध व्हावी होतो मोह तुझा अधर भावना किती कितीक समजावू मनाला […]

पाऊलवाटा

वाट, चढणीची गडकोटी सदैव मी तुडवित राहिलो उरली आता चारच पाऊले आता माथ्यावरी पोहचलो आव्हानी पत्थर पाऊलवाटा दुर्दम्य! विश्वासाने चाललो सभोवारी हिरवीगार सुखदा गतस्मृतीं कुरवाळीत राहिलो छेड़ितो शीतल पवन धुंदला झुळझुळ ती झेलित राहिलो नेत्री आठवांचे निर्झर सुंदर जिथे नाहलो, तुडूंब डूंबलो सारिपाट साऱ्या जीवनाचा मी आज उलगडित राहीलो काय मिळवले काय हरवले मी मना समजावित […]

स्वामींची प्रेमळ माया

स्वामींची प्रेमळ माया असेल कृपा छाया, भक्तांना मिळेल सदा मायेचा अथांग ओलावा गजानन महाराजांची कीर्ती करुणाकर प्रेमळ मूर्ती शांत चित्ती भाव मुखी लाभेल कृपा प्रसाद मस्तकी मिळेल निश्चित अनुभूती ठेवावी श्रद्धा अंतकरणी, अक्कलकोट स्वामींची महती शेगाव नगरी पावन ती पंढरी — स्वाती ठोंबरे.

तूच अवीट सुगंधा

तुझ्यात, मीच कधी गुंतलो आज मलाच आठवत नाही पण श्वासातला गंधाळ तुझा दरवळणे कधीच थांबले नाही तू कस्तूरी, तू बकुळी सुगंधा तुज मी कधीच भुललो नाही चराचरातुनी, तुझीच सुरावट गुंजारवी गुणगुण संपली नाही जिथे, तिथे सारेच भास तुझे स्मृतीगंघ कधीच विरला नाही भेटलो तू अन मी ज्या राऊळी ती दीपमाळ मी विसरलो नाही दान, अमरत्वाचे सत्यप्रीतीला […]

वृंदावनी रंगला श्याम माझा

वृंदावनी रंगला शाम माझा, वृंदावनी रंगला राधे मध्ये गुंतला शाम माझा वृंदावनी रंगला लहानपणी एक डाव मांडीला नवरा नवरी लग्न सोहळा भातुकलीच्या खेळा मध्ये राधिकाने राम शोधीला वृंदावनी रंगला शाम माझा, वृंदावनी रंगला राधे मध्ये गुंतला शाम माझा वृंदावनी रंगला गाठ मनाशी मारुनी माझ्या घनशाम तू कुठे निवळला वाट बघते वृंदावनी डोळे मथुरे्च्या बाजारी रमला वृंदावनी […]

पाऊस सरी पडतांना

पाऊस सरी पडतांना गारवा अंगास झोंबतो, मिठीत तू अलवार घेता घन ओथंबून पाऊस येतो मलमली मिठीत मी येता अश्रूंचा बांध अलगद फुटतो, डोळे हलकेच तू पुसता तो पाऊस मनात मोहरतो किती मनोहर हा नजारा डोळ्यांत निसर्ग खुलतो, हा ओला हिरवा गालिचा थेंब पावसाचा हृदयात मिटतो घन व्याकुळ मी होते चिंब पावसाळी नभात या, कधी भेटशील सख्या […]

पावसाचा थेंब तूं

धुवाधार तो घनमेघ बरसता चिंब भिजविणारा पावसाचा थेंब तूं मनह्रदयीच्या पागोळ्यातुनी अलवार रिमझिमणारा प्रीतस्पर्श तूं ओले ओले मृदगंधले मनांगण मनी दरवळणारा पावसाचा थेंब तूं कोसळणाऱ्या, सरिसरितुनी झरझरणाऱ्या, पावसाचा थेंब तूं प्रीतयुगुलांना, हा ऋतुराज हवासा चिंब बरसणाऱ्या पावसाचा थेंब तूं सृष्टिचे रूपरंग, वादळी सप्तरंगले नभा खुलविणारा पावसाचा थेंब तूं प्रीतभारला, मनामना भावणारा अवीट रेशमस्पर्शी पावसाचा थेंब तूं […]

निघून जाते आयुष्य

निघून जाते आयुष्य खिसे आपुले भरताना वेळ जाते निघून दिवस रात्र धावताना हरवून गेले आहे सारे सुख विकत घेताना क्षणभर हसणे सुद्धा महाग झाले लोकांना विसरलीत नातीगोती सारे जवळ असताना धावपळीचे आयुष्य निमूटपणे जगताना आयुष्य आहे सुरेख कुणीच पाहत नाही नुसती दगदग सुरु वेळ कुणाजवळच नाही बसून मित्रांसोबत आज कुणी बोलत नाही सुखामागे धावताना माणूस आज […]

इथं आपल्याला आवडतं

इथं आपल्याला आवडतं ते लोकांना आवडेल असं नाही, लाईकच गणित कळतं नाही इथं तर कमेंट देणं फार दूरस्थ होई कुणी कुणाला विरोध म्हणून दुसऱ्याला लाईक कमेंट देतात, कुणाचा राग ही न बोलता मग इमोजीत व्यक्त करतात कुणाचे किती कौतुक केले तरी लोकं मागचं आठवतात, एकाला कमी लेखण्यासाठी दुसऱ्याचं वारेमाप कौतुक करतात चांगलं लिहलं तुम्ही तरी इथे […]

मन:शांती

जगायचे अजुनही राहिले किती जगुनही जगती या कळले नाही आठविती सारे क्षण ते भोगलेले आसक्ती, लालसा संपली नाही हव्यास, जीवनी असावा किती याचाच अंदाज बांधता येत नाही समाधानी वृत्ती सदा मनी असावी त्यावीण दुजी जगती सुखदा नाही सुखदुःख, आनंद, दान भाळीचे भोगण्याविण दुसरा पर्याय नाही जे जे लाभले ते ते दान भगवंताचे त्याच्या कृपेविण जीवा सद्गती […]

1 46 47 48 49 50 437
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..