नवीन लेखन...

निराशाग्रस्त माणूस

निराशाग्रस्त माणूस बसला होता त्याला मी ओळखत नव्हतो, त्याच्या निराशेला ओळखत होतो, त्यामुळे मी त्याच्या जवळ गेलो मी त्याला हात दिला माझा हात पकडून तो उभा राहिला, तो मला ओळखत नव्हता मी पुढे केलेल्या हाताला तो ओळखत होता आम्ही दोघे एकसाथ चालू लागलो आम्ही एकमेकाला ओळखत नव्हतो दोघे एकसाथ चालण्याला ओळखत होतो ++++ मूळ हिंदी कविता […]

गोकुळातील कृष्ण सखे

वृंदावनात गायींच्या सहवासात असे दह्या दुधाचा मटका कमरेला गोपीकांचा सहवास असे गोकुळातील कृष्ण सखे नटखट नंदलाल असे गोकुळातील कृष्ण सखे भग्वदगीतेच्या उपदेशात दिसे राधेच्या प्रेमात दिसे अन् शत्रुंच्या संहारात ही दिसे गोकुळातील कृष्ण सखे तुझ्या माझ्या प्रेमात ही दीसे ले… उमेश तोडकर

सौंदर्यचा चकवा

लता वृक्ष वेली सा-या नटल्या घालून आभूषणे निसर्ग निर्मित हे दागिने मोहक रत्नजडीत देखणे स्वर्गातील भासती जणू आल्या अप्सरा धरणीवर गर्भरेशमी वस्त्र हिरवे घाली त्यांच्या सौंदर्यात भर कुंतल मोकळे तलम रेशमी झुलती वा-यावर पदन्यास करत धरती ठेका झाडे तालावर झुबे डुलते कानातले थिरकती पायीची पैंजणे करी गारुड मनामनावर यांच्या या रुपाचे चांदणे पांथस्थाला घाली भूल हा […]

शिशिर

आहे मी ऋतू लयाचा शहारता शिशिर सांगतो हिरव्या ओल्या श्वासांना मातीशी जोडून पांगतो… सुस्तावल्या रात्रीस अस्ताव्यस्त पांघरतो आभासी धुक्याचे अस्तर दिवसावर अंथरतो… स्त्रोत चैतन्याचे सारे कवेत घेत..आकसतो भुंड्या झाडदिठ्यांना बोचऱ्या गारव्यात डसतो उत्पत्ती ला आहे इथे शाप लयाचा तो कोसतो रुक्ष देहीच्या गर्भात बीज वसंताचे पोसतो…!!! -सौ विदुला जोगळेकर

अशी कशी कार्टी

अरे राजा ही “कार्टी काळजात घुसली.” चल गड्या बघूया फसली तर फसली “ओळखं ना पाळख” नाही ना रे तिच्याशी कावली तर विचारु तुच ना “मोरूची मावशी” लाजुनी म्हणालीचं “चल तुझं काही तरीच “ सांगेल तिला अजुन “ब्रम्हचारी “आहे मीच नाहीं मी “बहुरूपी “मी तर तुझाच “पाहुणा “ प्रेमवीर तुझा,सांग ना, तू माझी होशील ना “जादु तेरी […]

तो परत आलाय्

तो परत आलाय केरळातून. मान्सून सारखा! मान्सून मित्र म्हणून येतो, हा परत आलाय- आपले यापूर्वीचे सर्व आयुध पचवून, शत्रू म्हणून! … .. आम्ही असतो सरकारी दवाखान्यात रांगेत उभे. तिथला वैद्यकीय अधिकारी देतो आम्हाला ‘ऑगमेंटीन’लिहून. अमॉक्सिसिलीन हे प्रतिजैवक जेव्हा थकतं तेव्हा देण्याचे हे एक उच्चतम प्रतिजैवक -ॲण्टीबायोटिक्स. ( ऑगमेंटीन खरंतर एक मुद्रा नाम. मूळ औषध अमाॅक्सिसिलिन + […]

सूर्य उद्याचा !

चढत्या रात्री द्रव सोनेरी । चषकांमधली नशा बिलंदर । मंद सानुली ज्योत सांगते । हे नच अपुले नवसंवत्सर ।। थाट चालतो माठ जिवांचा । किनाऱ्यावरी गर्दी कलंदर । पश्चिमेकडे झुकता झुकता । दिशादिशांतील वाढे अंतर ।। उगा कशाला सदा वाहता । दास्यवृत्तीची मढी खांद्यावर । रूढी तोडुनी गढी गाडता । अभिमानाने फुलेल अंबर ।। ब्रह्मध्वज हा […]

दृष्टी

व्यास क्रिएशनच्या प्रतिभा दिवाळी २०२० च्या अंकामध्ये प्रकाशित झालेली वैभव दळवी यांची हि कविता रोज देतसे पुन्हा पुन्हा मी, मनास खमकी तंबी; नकोत कुबड्या आधारा वा, जगणे परावलंबी पाय नीतीचे, पाऊल हे ना, कधी पडो वाकडे; हेच घालतो लीन होऊनि, शुभंकरा साकडे हात राबूनी नम्र जुळावे, माणुसकीवर भक्ती; साथ द्यावया त्या बाहुना, ज्ञान-तुक्याची शक्ती धमन्यांमधुनी अखंड […]

आत्मनिर्भर ती, स्वावलंबी ती…

व्यास क्रिएशनच्या प्रतिभा दिवाळी २०२० च्या अंकामध्ये प्रकाशित झालेली प्रतिभा सराफ यांची हि कविता जुन्या पुस्तकातून शिकते नवीन खूप काही भावाच्या शिक्षणासाठी कधी सोडते शाळाही जे मिळते, जसे मिळते, घेते ती… आत्मनिर्भर ती, स्वावलंबी ती का तरीही मग दुःखीकष्टी ती ? चार भांड्यातही चालवते छान संसार बाई ना उरले खाण्यास तरी तिची तक्रार नाही कोंड्याचा मांडा […]

भाषाभगिनी

व्यास क्रिएशनच्या प्रतिभा दिवाळी २०२० च्या अंकामध्ये प्रकाशित झालेली गीतेश शिंदे यांची हि कविता १ ॥ गीत वाहते नसानसांतून तुझ्या ऋतूंचे गीत घेते रंग रूप नवे माझे झडलेले जिवित रुजते माझ्या डोळ्यांत तू पेरलेले आकाश जसे किरणांचे कोंब फुटे पालवी मनास धरतात दाही दिशा छप्पर माझ्या माथ्यावर तुझ्या दिठिचे क्षितिज नेते मला दूरवर रक्ताच्या थेंबातून माझे […]

1 3 4 5 6 7 437
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..