विनती
देव निळाईत न्हाई देव राऊळात न्हाई शोध बापा माणसाच्या अंतरीच्या ठायी ठायी फुलं नि फळं ही सारी त्याच्या रं अंगणाची पुन्ना काय वाहतो तू वीणा भाव ती फुकाची नगं त्यास रं डोलारे सोन्यारुप्याचे मनोरे कशाची रं हाव त्याला त्याला दावू नगं गाजरे देणं घेणं हा व्येव्हार देवा काय रं कामाचा एक शबूद ओलेता डोळा थेंब आनंदाचा […]