निशिगंध
तू जो दिला होतास ना निशिगंध तो आता हरवला आहे पण त्याचा सुगंध येतो नेहमी कुठल्यातरी कोपऱ्यातून… तू दिलेलं प्रत्येक फुल नाही ठेवता आलं जपून पण त्यांचा सुगंध मात्र दरवळतो कुठल्या ना कुठल्या तरी कोपऱ्यातून… — आनंद
तू जो दिला होतास ना निशिगंध तो आता हरवला आहे पण त्याचा सुगंध येतो नेहमी कुठल्यातरी कोपऱ्यातून… तू दिलेलं प्रत्येक फुल नाही ठेवता आलं जपून पण त्यांचा सुगंध मात्र दरवळतो कुठल्या ना कुठल्या तरी कोपऱ्यातून… — आनंद
प्रत्येकाला इथं दुःख असतं असतं फक्त ते दिसतं नसतं, हास्य वरवर सगळीकडे असं म्हणून त्यात ते कळतं नसतं.. गैरसमज करणं इथं तर खूप सोप्प सहज असतं, किंवा गैरसमज करुन घेणं नित्य रोज होतं असतं.. तू मला बोलला मग मी राग तुझ्यावर तो धरेन, दोन शब्द तुला जास्त बोलेन हेच हल्ली मग सगळीकडे दिसतं.. दुसऱ्याला गृहीत धरण […]
चांदण्याना पण साथ हवी असते चंद्राची, सरिता अंतिम सागरात हळुवार विलीन होते. मग स्त्रीला पण हवी असते गरज पुरुषाची.. अपूर्ण आहे दोघे एकमेकांशिवाय, खरं स्त्रीत्वाचे अनेक नाजूक पैलू पुरुषाला खुणावतात.. मग स्त्रीला पण खुणावत असतात पुरुषातील पुरुष सौंदर्य असतं, ते म्हणजे पुरुष जिगर, हिम्मत, पुरुष बाणा! अनादीअनंत काला पासून हे चक्र चालू आहे… ह्या भाव विभोरातून […]
माझ्या मलमली मिठीत तू सख्या विरघळावे, घेता जवळ घट्ट तू मजला चांदणे आकाशी बहरावे मखमली स्पर्श तुझा होता रोमांचित तन मन व्हावे, बेधुंद तू हो जरासा मग अलगद मी मोहरुन यावे मोह पडला तुझ्या मिठीचा नकळत भाव गुंतून गेला, मी लुटले पुरती मोह भावात या तू दूर जाशी उलगडून जाणिवा ओठ मलमली मोहक माझे घे टिपून […]
का कुणास ठाऊक मन आज शांत शांत आहे, रिक्त क्षण सारे भवतीचे हृदय बावरे जरासे आहे सांज सावली ही गूढ गहन भासतं आहे, मी कोण खरी माझेच प्रतिबिंब विचारत आहे पडले प्रश्न मनात कितीक काहूर अंतरी दाटले आहे, दूर देवळात होतो घंटा नाद मन कुठे अवचित हरवले आहे पडले प्रश्न कित्येक ते उत्तर कुठलेच न मिळतं […]
चला तोडूया या कोषाला मुक्त करूया सुरवंटाला अंतरंगातुन घेऊ उर्मी उडुदे स्वच्छन्द फुलपाखराला होऊ सोबती मीच मजला नकोशी गर्दी हवी कशाला एकले आपण येती जाती कशास क्षणिक कुणी धुंडाळा ठेऊन साक्षी परमात्म्याला सोड भार वाही चरणाला पंखा कुठे रे चिंता उद्याची घास चोची देई चाऱ्याला नको गाठोडी भविष्याला गाठ बसे, सुटेना जीवाला तू मी सारे येरझारे […]
अबोल गोड मिठी तुझी गुंतते मी पुन्हा पुन्हा, मन गुंतले मोहक मिठीत न कळली तुला अंतरी वेदना.. कितीक तोडशी तू मज कठोर पुरुष हृदय मना, का स्त्री गुंतते मुग्धशी फरक स्त्री पुरुष भावनेचा हा.. पडला मोह तुझा तो स्पर्श तुझा मलमली व्हावा, ओढ तुझ्या आवेगाची घे ओढून तू अबोल मना.. किती किती दूर जाता आठवतो तू […]
कोकीळ गातो गाणे चैत्राची चाहूल बाई कैऱ्यांच्या आडून दडणे तो दिसत द्वाड नाही हुरहूर उठवी जाणे कुजने अंगांग शहारे येई तो बोलावतो का कोणे साद पल्याड ऐकू येई तप्त धरणी आणि राने नकोशी कामावरची घाई वाटे झुलून हिंदोळ्याने थंड झुळूक शांतता देई पळस – बहाव्याचे सोने पानपानांवर बहरत जाई गूढ ग्रीष्म ऋतूचे येणे रानफळांची रेलचेल होई […]
प्रत्येकाचा पाऊस वेगळा असतो!! मनाला आनंदाने स्पर्शून जाणारा असतो! पाऊस कसा असतो ? घन भरुन आभाळी दाटून येतो. मेघातून किरणे सोडत सरीतून बरसतो!! प्रियकर प्रेयसीच्या डोळ्यांत चिंब भिजून असतो!! पाऊस सगळ्यांचा असतो. लहान,थोर स्त्री, पुरुष प्रत्येकाचा पाऊस वेगळा असतो. पाऊस वेल्हाळ असतो. नवं तारुण्यातील युवतीला बेफाम बनवतो! स्त्रीला अवखळ बनवतो. निरागस बलिकेला अल्लल्ड बनवतो!! पाऊस तन […]
तुझ्यासाठी दाही दिशा जाशी तू कुठेही माझ्यासाठी फक्त तूच आशा तू ने सवे कसेही आहेचं कुठे मज आकांक्षा स्वप्नात रमते तुझ्याही विणते नव्याने कोषा तू दे आकार कसेही प्रांतप्रांतातील मुक्त देशा आवडे शोधण्या मलाही या मजपुढे काही रेषा आखून जा जरी पुढेही ही अव्यक्त मौन भाषा न ऐकू ये कुणाही तरी ओतते तप्त शिशा नित्य लाही […]
Copyright © Marathisrushti.com 1995-2025 | Technology Partners : Cybershoppee | GaMaBhaNa | Smart Solutions