नवीन लेखन...

भाव व्याकुळ मनाचा

भाव व्याकुळ मनाचा एक ढग तरंगत आहे, भाव मन कल्लोळात तो ही गडगडत आहे.. थिजलेल्या अश्रुत एक सौदामिनी अंधारुन आहे, निःशब्द घाव सारे अबोल विद्युलता आकाशी चमकत आहे.. एक अबोध रात्र अवेळी हरणी व्याकुळ भयचर आहे, पुरुष तू उन्मत होशी कधीही वासनेत बळी तिचा जात आहे.. एक गाय करुण अशी हंबरुन वात्सल्य मायेत आहे, एक स्त्री […]

संत सखया पांडुरंगा

संत सखया अगा पांडुरंगा कां? रे रंग तुझा हा काळा ।।धृ।। अयोध्येचा रघुनंदन सावळा गोकुळीचा यदुनंदन तो नीळा म्हणुनी तुच कां रे विठुसावळा।। नीलांबरी, घनमेघ ते सावळे प्रांगणी खेळतो नीळासावळा लोचनी तूच विश्वरूपी सावळा।। निष्पाप रंगले, रुप हरिहराचे द्वैत, अद्वैत एकरूपची झाले वाळवंटी, रंगला स्वर्गसोहळा।। भूधरी ध्वजपताका वैष्णवांच्या नादती टाळमृदंग झांजचिपळ्या विठ्ठल विठ्ठल गजर दंगदंगला।। — […]

सांज

रात दिसाशी जोडली सांज कौतुके विसावली गार झुळुकेत अंब्याच्या उन्ह घराकडं परतली मावळती रंगांनी माखली सोन्याचा गोळा पंखाखाली दडवे जशी माय द्वाड बाळास कुणी सांगू नका कागाळी पाखरं शुभ्र आणिक काळी परती सोबत कातरवेळी दाणा पाणी झाले आज उद्याचे पाहू उद्या सकाळी केशर काजळ छाया काळी दाटून येते अशी संध्याकाळी राती उमलत रातराणी चांदणं रातीच्या केसांत […]

डोळ्यांत अश्रू जमला

डोळ्यांत अश्रू जमला तरी तो धुळीने तरळला, अस हसत सांगते ती स्त्री च असते.. वेदना विसरुन साऱ्या संसारात साखरेसारखी अलगद अशी विरघळते ती स्त्री च असते.. स्वतःकडे नंतर पण नवरा मुलांचं सार आधी आवर्जून बघते ती स्त्री च असते.. स्वतःच्या भावना मन वेळप्रसंगी न पाहता, संसारात इतरांना जपते ती स्त्री च असते.. आवडी निवडी माहेर सवयी […]

नाते

विसरून आठवांच्या पाऊली तू असा येतोस कां? तुझे नी माझे नाते आतातरी सांगशील कां?।। दिवस हे चालले असे ऋतु हे प्रसवती जसे श्वास हे जगता जगता आंसवे ही झरतात कां?. जल जीवनी वाहिले असे मनभाव सारे विरले जसे निर्माल्य सहज होता होता भावतरंग मनी जागतात? दैवयोगे, मनप्रीत उमलता मूकमनभाव गुंतता गुंतता प्रीतसुगंध दरवळता दरवळता भावकळ्या तू […]

परदेश

रुक्या टक्यात मोजावा तो काळ आता सरला डोलरात बाळ सांगे किती रुबाबे मजला आमी येडे नि बावळे करे त्याचा फुगीर आकडा रुपयात किती भेटे याचा हिशेब हा एवढा… तरी वाटे बरे आहे माझा लेक परदेशात सांगतो मी अभिमाने नाणं खणखणीत माझं पण खरं सांगू वाटे इथे हवे रे कुणी बाळा पैसा कामी येतं नाही पुरे क्षण […]

एका लयीत बद्ध

एका लयीत बद्ध प्रणय धुंद गारवा, चांदण टिपूर नभी छेडतो हलकेच मारवा.. स्पर्श तुझा मोहक लाडिक तुझी अदा, ये प्रिये जवळ तू छेडतो मज चांदवा.. मलमली मिठी तुझी नयन कटाक्ष मदनबाण हा, घायाळ करी तू अशी जीव वेडा होई असा.. लाजते तू अशी मधुर चंद्र ही पाहतो तुला, रोमांच उठे हलकेच मिठीत तू घट्ट येता.. गात्र […]

आत्मानंद

जीवनात अचानक कधी असा क्षण येतो । सारे स्तब्ध नीरव शांत होते । ब्रम्हांड गोठल्याचा भास होतो । साऱ्याच संवेदना संपुष्टात येतात । उरतात फक्त निर्विकार स्पंदने । हा जन्म अन मृत्यु मधील अंतीम थांबा असतो । हाच शून्यावस्थेतील अचेतन अखेरचा जीवन सूर्यास्त । जो शाश्वत मृत्यु, अंत! जीवनातील अंतीम अटळ कटुसत्य । जन्मताच मृत्युचही वरदान […]

भिंती

ऐका गं भिंतींनो ऐका माज गाऱ्हाणं ऐकून बी समजून घील असं न्हाई कोण इथं शानं परत्येक जण गढलाय जगाच्या कुटाळक्यांत कुटं कोण लढत्यात तर कुटं कोण जागा लढवित्यात खोपीतला छुपा वडवानल कुणालाच दिसतं न्हाई समदं पाह्यजे आलबेल कुणालाबी परवा न्हाई भिंती तेवड्या निब्बर नायत दारं, झडपांनी मोकळं हुत्यात ल्हाही ल्हाही जळत ऱ्हातं काळजा अल्लद फुंकर घालत्यात […]

खेळ उन सावल्यांचा

जन्म दान त्या विधात्याचे दृष्टांत सुखदु:ख वेदनांचा खेळ जणु उन सावल्यांचा साराच भोग तो प्राक्तनाचा।। ऋतुऋतुंचे, खेळ मनोहर नभी सडा चंदेरी नक्षत्रांचा नित्य लपंडाव उषानिशाचा खेळ, जणु उनसावल्यांचा।। जन्मासंगे मृत्युचीच सावली हा साक्षात्कार जीवसृष्टिचा कधी शांतता, कधी तप्तता खेळ, जणु उनसावल्यांचा।। जगणे असते आपुल्या हाती धरूनी हात विवेकी बुद्धिचा प्रत्येकाच्याच जीवनी असतो हा खेळ नित्य उनसावल्याचा।। […]

1 50 51 52 53 54 437
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..