नवीन लेखन...

जगा लेकोहो

आज थोडी भाकरं अन कोरड्यास खरडा सुगीवाचून कसं मिळंल खायाला खमंग हुरडा उद्याचे दान काय उद्याच्याला सोडा आज कशापायी ओढता उगा गाडा इतभर खळगी भरून कशाला हाती घेता गाडगा झोपाया थोडी लागलं चारखणी वाडा चारखणी वाड्यातबी निस्ता आरड ओरडा कुठं कुणा सुख टोचे ईर्षा आणि पाय निसरडा उगा खेचू नाही वाईच तुमी हेका सोडा समजून उमजून […]

तनमन ओले अधीर व्हावे

तनमन ओले अधीर व्हावे का मोहाचे धागे गुंतावे? का जीव हळवा व्हावा का मोह कुणाचा मोहरावा.. का भावनांचे फुलणे व्हावे डोळ्यांत चांदणे बहरावे, देहाचा होम का पेटावा हलकेच मनाचा गुंता व्हावा.. जीव व्याकुळ शीण व्हावा नजरेत वेदनांचा पूर सांडावा, कसला मोह हा तनुभर ल्याला का चांदण्यांनाही मोह पडावा.. श्वास हलका अधर व्हावा हा मोह मनास बधिर […]

जगण्याचे मर्म

हरवुनी जाता क्षण श्वासासंगे आयुष्य, विलया जात आहे जीवसृष्टीची जरी ही सत्यता मुक्ती जीवाची मन:शांती आहे।। क्षणोक्षणी, शिकत जगावे गतं न शोकं! सिद्धांत आहे जे जे चांगले,ते नित्य स्मरावे दुःख, वेदनां प्रारब्धभोग आहे।। जीवनी, पेलुनिया आव्हानांना संघर्ष करणे हाच पुरुषार्थ आहे जन्म मानवी, कृपा दयाघनाची तोच एक सद्बुद्धी देणारा आहे।। विवेकी, सत्संगात सदा रहावे मीत्व सोडुनी […]

कधी कधी थकत जातं मन

कधी कधी थकत जातं मन विचारांच्या अगणित काहूरात तरीही उरतात अनेक प्रश्न सारे अर्धवट अनाकलनीय गूढ आवर्तनात मनाला क्षीण होतो हलकासा आणि विखुरतात आवेगांचे वारु पडझड होते अनंत कथांची उरतात मागे वेदनांचे तेच वारु खोल तळाचा गाभा अंधारुन जातो उध्वस्त मनात काट्याचा घाव बोचतो तरीही राहतात अनेक प्रश्न अनुत्तरित काही उत्तरांची काजळ रेघ निसटते त्या घनगंभीर […]

वात्सल्य

मी मुलांनो, वाट तुमची पहाते वात्सल्य, ओघळूनी गहिवरते जीव माझा, लेकरांत गुंतलेला प्रतिक्षेत सारेच मी भुलूनी जाते तुम्हावीण, मीच इथे एकटी जडावलेले तनमन कातर होते तुम्ही सारे पाहुण्यासारखे येता काळजातुनी, मातृत्व पाझरते अधीर व्याकुळ शीणली काया तरीही, तुमच्यासाठी मी जगते सुरकुतलेल्या या हातांनीही जे जे तुम्हा आवडते ते ते करते तुमचे येणे, माझे भाग्य सुखाचे वृद्धत्वात […]

सख्या

एक रस्ता हवा सख्या तुझ्या हाती हात गुंफून अव्याहतपणे तुला शोषत राहण्यासाठी तहानलेला भ्रमर जणू मी, तू एक मस्तवाल मोठ्ठालं फुल दिमाखदार नि साजर, थोडस बुजरं एक अथांग क्षितिज हवं सख्या अधीर अनुरक्त होऊन कवेत सामावण्यासाठी तू एक खगेंद्र, उंचच उंच झेप घेऊन एकटाच मत्त दूरवर काही शोधणारा एक थिजलेला काळ हवा सख्या मनाच्या द्वंदातील अनंत […]

अशी कशी तुझ्या प्रेमात मी पडले

अशी कशी तुझ्या प्रेमात मी पडले व्याकुळ आठवणीत काहूर उठले येते तुझी आठवण रोज क्षणोक्षणी डोळे ओले होतात तुझ्या साठवणीत अशी कशी तुझ्यात मी हलकेच गुंतले तुझ्या मिठीचे चांदणे अलगद मज लुटले असे कसे मन तुझ्यासाठी आतुर होते तुला नाही कळले ते भाव ओले हळवे असा कसा तू मोह सांडून दूर गेला अलवार तुझ्या मिठीचा स्पर्श […]

मुखवटा

मुखवटेच सारे रंगबिरंगी खेळ, लीलया भावनांचा भेटतात मुखवटे पांघणारे हा अनुभव या जीवनाचा। अनभिज्ञ, सारीच मनांतरे नात्यातही भाव संभ्रमाचा निकोप, निर्मलता संपली स्वार्थी, हव्यास जीवनाचा। भेटो, निरपेक्ष सत्य मुखवटे दरवळावा गंध प्रीतभावनांचा हीच सुखदा सदानंदी चिरंतन रुजावा, बीजांकुर मानवतेचा। — वि.ग.सातपुते. (भावकवी) 9766544908 दिनांक :- १२ – ४ – २०२२

येरझार

सोसे दुख सांगू न्हाई झाडापरी व्हावं मुकं दयाव घ्यावं वला शबूद ऐकू न्हाई कदी कौतुक जगू दे रे मनाठायी फळं फुलं ओलं सुकं पडे पदरात जे काही मान हेच सार सुख साचून का डबके होई दे कि सोडुन सारं खळखळ वाहे सरितामाई फुलवं अंगातील वावरं मुखी वाणी कशापायी इचार करिशी थांबून वाया नगं रं आटापिटा कर्म […]

काही शब्दांचे ओरखडे हृदयी उमटतात

काही शब्दांचे ओरखडे हृदयी उमटतात कळत नाही निःशब्द घाव कधी बसतात कुणी येत अवचित वसंत पालवी लेऊन आयुष्यात स्थिरावत अलगद सावली बनून मन भरुन झालं की भावनांचा खेळ होतो कोण मग हलकेच अंतरी रडवून जातो इथे तिथे शब्दांचे फटकारे सारे बसतात स्त्रीला संयमाचे धडे सहज मिळतात कुणी आयुष्य अलगद व्यापून जातं आईचं बोलणं शब्दांत शहाण करुन […]

1 51 52 53 54 55 437
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..