नवीन लेखन...

पदर नात्यांचे

चालले, चालले, चालले आयुष्य चालले, चालले सर्वात, जीव हा गुंतलेला शोधित सुखा मन दंगलेले ऋणानुबंध, हे गतजन्मांचे जपता,जपता दिवस संपले आठवांचे, आभाळ लोचनी भावनांचे ओघळ ओघळले किती स्मरावे किती उसवावे नात्यांचे पदर,आज विरलेले या मनाला किती समजवावे जग सारे मृगजळी हरवलेले दृष्टांत हा वास्तव जीवनाचा भौतिक सुखात मन रमलेले — वि.ग.सातपुते. (भावकवी) 9766544908 रचना क्र. ११०. […]

सवय तुझी मनाला मोहक झाली

सवय तुझी मनाला मोहक झाली आठवण तुझी अंतरी व्याकुळ करुन गेली इतकं कस रे सहज सार तुटलं बावर मन अलगद तुझ्यात बहरल सुन्या आकाशात चंद्र ही लपला तुझ्या आठवणीत भाव ओलावला अशी कशी रे तुझी ओढ आल्हाद लागली त्या राधेची प्रीत फक्त कृष्णालाच कळली इतकं कस मन तुझ्यात अलवार गुंतल तुला तरीही अंतरी प्रेम नाही कळलं […]

सत्संग

जगती, नित्य सदविवेके चालत रहा, चालत रहा मुलमंत्र, हाच जीवनाचा सत्कर्म, सदा करीत रहा।। विधिलिखित सारे जीवन प्राक्तनाच हा भोग आम्हा सुखदु:खांच्या सावलीतूनी स्वानंद,समाधान घेत रहा।। जन्मी, भाळी जे जे लाभले त्यात समाधान मानीत रहा निराशावादी कधी राहु नये मनी, आशावाद जपत रहा।। सत्संगे, पापांचे होते क्षालन उतम सहवासात, सदा रहा जीवन, खेळ कठपुतळीचा प्रभुरामाचे रामनाम […]

धग

धरणी तापली कोपली कष्टानं रापली काया लाज ठिगळात लपली न्हाई जरीची कि माया बाईचं जिणं एकली न्हाई सोबती सहाया वेणा तिलाच सोसली न्हाई गड्यास कळाया घामघामानी नटली उभी चिंब देह न्हाया किती उगाळू राहिली तिचा चंदन झिजाया चुलीत धुनी पेटली घातला जलम शिजाया चटके बसून शोधली भाकर हाय का खळगीला आता सरली सरली म्हणू आलीस उरकाया […]

सहज फुलं झाडावरील

सहज फुल झाडावरील अवचित सुकले मनाचे बांध काहूर मनी कसे तुटले चुकल्या अक्षरात कुठे मग शब्दांचे खेळ अनामिक रंगले तुटल्या काजळ वेदना भावनांचे गहिवर तुटले कोण कोणास बोलले बंधाचे बांध अलगद फुटले ओल्या सांजवेळी कोण हृदयस्थ अलवार झाले काळीज तोडून कोण हलकेच दूर दूर गेले मिटल्या कळ्यात काही पाकळ्यांचे गजरे गुंफले मनात मोहर कुणाचा पानगळीत पर्ण […]

भाग्यरेषा

भाग्यरेषा तळहाती आज या उमलावी पैलतीर येता, साद त्या राघवाची यावी।।धृ।। घरटयात सुखाच्या, ओढ़ प्रीतीची असावी स्पर्शता निष्पाप प्रीती, वेदना उरिची हसावी कण कधी अमृताचेही, ओघळावे आसवी।।१।। जीवनी उनसावल्यांचा, खेळ नित्य चाले सागरी भरती – ओहोटी, भिजते चांदणे अंधारताच वाट त्या दिनकराची दिसावी ।।२।। थैमान वादळी छळते, कधी नीरव नीरवता शीणतो जीव क्षणी, कधी चंदनी शीतलता […]

आभाळीच्या देवराया

आभाळीच्या देवराया कां ? पेरितोस रे माया अवचित येसी, घेवूनी जासी कां ? रुजवितोस रे माया कां ? निर्मिलास रे निसर्ग उध्वस्त क्षणात सारे व्हाया निष्ठुर करिसी तू पंचभूते कुठेच न उरे आसरा जगाया. कां ? जाळलिस रे लंका कां? बुडविलिस द्वारका तूच रे निर्माता अन त्राता तूच आभाळीचा देवराया चैतन्य तुझेच रे हे सारे घाल […]

शाबासकी

मी तरुणाईत शिरलो तेव्हा – समोर मातीचे ढीग होते. त्यांनी सांगितले – ” यातून तुम्ही घडवा ” क्षणभरासाठी मी विश्वकर्मा झालो इतरांसारखा -इतरांबरोबर ! सोबतीला मेहनतीचं पाणी होतं अक्षरांची बीजे पेरायला खडू होते आणि चुकलेलं पुसायला डस्टर ! पहिल्या दमाने मी मूर्ती घडवायला बसलो पण मनासारखी निर्मिती होईना कोठेतरी ,काहीतरी चुकलं होतं. वारंवार तपासलं तरी न […]

लव्हाळ्यापरी जगावे

जरी लाभली उंची महानता पाय जमिनीवरतीच असावे पुरात महावृक्ष कोलमडती लव्हाळ्यापरी, नम्र जगावे हाच सत्य, दृष्टांत निसर्गाचा मीत्व, आत्मप्रौढत्व टाळावे व्यक्त व्हावे जगती सुसंवादे सदा सर्वदा सर्वास उमजावे जो तो जगतो स्वांतसुखाय त्यास थोड़े, उल्हसित करावे जगती श्रेष्ठ आधार शब्दांचा निरपेक्षी, सकला देत रहावे कुणाचाही उपहास करु नये मनामना, नित्य जपत रहावे क्षणभंगुर असते हेच जीवन […]

अभिलाषा

माणसांच्या या गर्दीतूनी मी माणूस शोधतो आहे कधी कधी मलाच वाटते मीच, रस्ता चुकलो आहे चेहरे तसे सारे ओळखिचे पण सारेच संभ्रमात आहे मनात, सारीच साशंकता सत्य, असत्य कोणते आहे जगणे, कसरत तारेवरची वाटते सारे, मृगजळ आहे आज नां कुणावरी भरवसां बेभरोशी नित्य जगणे आहे. सभोवती दुरापास्त मानवता जग स्वसुखातची मग्न आहे नाती निरागस आज संपली […]

1 52 53 54 55 56 437
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..