लव्हाळ्यापरी जगावे
जरी लाभली उंची महानता पाय जमिनीवरतीच असावे पुरात महावृक्ष कोलमडती लव्हाळ्यापरी, नम्र जगावे हाच सत्य, दृष्टांत निसर्गाचा मीत्व, आत्मप्रौढत्व टाळावे व्यक्त व्हावे जगती सुसंवादे सदा सर्वदा सर्वास उमजावे जो तो जगतो स्वांतसुखाय त्यास थोड़े, उल्हसित करावे जगती श्रेष्ठ आधार शब्दांचा निरपेक्षी, सकला देत रहावे कुणाचाही उपहास करु नये मनामना, नित्य जपत रहावे क्षणभंगुर असते हेच जीवन […]