ब्रह्मानंदी टाळी
मी तुका चाललो पंढरीला पायी लोचनी ब्रह्म ते विठ्ठल रखुमायी।।धृ।। वेचुनिया संतांच्या सद्गुणी गुंफितो मी भावफुलांची वेणी ।।१।। रांगलो, खेळलो, धावलो पाऊली या साऱ्याच , विश्वाच्या अंगणी ।।२।। नुमजली मजला संसाराची खेळी मी अज्ञानी ऐकितो संतांची वैखरी ।।३।। लावूनी टिळा गंध अबीर कपाळी मी दंगतो भारूडी,अभंगी, कीर्तनी ।।४।। मी रचिता गाथेत जीवनाची भैरवी मजला लागते ती […]