चैतन्य
हवी कशाला चिंता आता जिथे सावरणारी साथ आहे रोज निरनिराळी आव्हाने तुझे चैतन्य, सामर्थ्य आहे जरी विरोध पावलोपावली सत्यार्थी! मी निश्चिन्त आहे आकांत जीवनी जरी माजला तुझीच, कृपावंती साथ आहे जपाव्या कोमलांगी भावनां ती सुखाची फुलवात आहे सांगा साध्य कोणते जीवनी मूल्य मानवतेचे जपणे आहे कसला, कुठला दुजा भाव सत्य! क्षणभंगुर जीव आहे — वि.ग.सातपुते. (भावकवी) […]