खरं सांगू तुझ्या विना
खरं सांगू तुझ्या विना जीवन जसा एक थंड तवा आणि भुकेला एक मुलगा भाकरी शोधीत फिरावा , चंद्र अर्धा आहे एका मुलीला कमी मार्क्स मिळाले आहेत ती रडत आहे, आणि सूर्य एखाद्या आळशी शिक्षका प्रमाणे सर्वा देखत घोरत पडला आहे, आशा एखाद्या पुजारीन प्रमाणे थकून पायरीवर बसली आहे, आणि मंदिरात देव पारोसे पूजे विना राहिले आहे, […]